मासे २८) करंदी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2011 - 05:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ही आहे करंदी. खर तर कोळणीकडून साफ केलेले वाटेच घेतले पण करंदीचा पुर्ण फोटो हवा म्हणुन तिच्याकडून थोडी न सोललेली करंदी घेतली.

करंदी साफ करुन म्हणजे तिला पुर्ण सोलुन घ्या.

१ ते २ कांदे चिरुन
लसुण पाकळ्या ७-८ ठेचुन
हिंग
हळद, मसाला
मिठ,
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
टोमॅटो किंवा कोकम किंवा कैरी
तेल

क्रमवार पाककृती: 

भांड्यात तेल गरम करा मग ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या. आता त्यावर चिरलेला कांदा घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला आणि घालुन ठवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. मिठाबरोबर कोकम किंवा कैरी आणि कोथिंबीरही घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.
ही बघा तयार झालेली सुकी करंदी.

वाढणी/प्रमाण: 
आवडीवर आहे.
अधिक टिपा: 

उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम
करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात.
आळुवडीतही करंदी घालतात.
करंदी पुलावही चांगला होतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केश्विनी, तू खाणार नाहीस ना करंदी घातल्यावर म्हणून यावेळी तिने मुद्दाम तशीच लिहिलेय पाककृती. स्पेशली तुझ्यासाठी. Proud
जागु, मी स्वतः सीफुड मुळीच खात नाही. पण नवर्‍याला मात्र तुझ्या माश्यांचे फोटो दाखवत असते. Happy

अल्पना Proud

अगं पण या रेसिपीत ती करंदीच घातली नाही तर कांद्याची भाजी होईल ती. विसरलीय ती, आल्यावर बदलेल Happy

जागु तुझी क्रमवार पाकृ वाचताना माझ्या तोंडात क्रमवार पाणी साठत गेले..... मस्ट डू पाकृ. आंब्याची कढी पण टाक ना इथे. म्हणजे तुझे कॉम्बो आम्ही पण ट्राय करतो.

ह्म्म्म. आवडता प्रकार. पण दादा म्हणाले तसे, साफ करायला किचकट. आणि कोळणींकडील साफ केलेले वाटे घ्यावेसे वाटत नाही कारण बरेचदा त्या फ्रोजन आणुन मग त्याचे वाटे लावतात. या रविवारी आणतोच आणि मांडी ठोकुन मीच साफ करतो.

धन्यवाद जागु! Happy

माडी ठोकुन मीच साफ करतो.

आयला, अनुस्वार राहिला वाटते.. अनुस्वार द्याहो राव नाहीतर माडी ठोकुन करंदी साफ करताना डोकी आणि शेपटे ताटलीत टाकाल आणि मधली करंदी कच-यात...

मला १ला फोटो जास्त आवडला. करंदी अगदी मस्त गुलाबी नी ताजी फडफडीत दिसयेत.

एकदम यम्मी !
जागु कधी चुकुन माकुन तुम्हारे रामगढ मे आयाच तो ,एक तो सी फुड डिश उकळेंगाच.
दक्षी अजुन कशी टपकली नाही इथं. Proud

जागुतै आज काही खरे नाही... पहिला वडा, नन्तर करंदी.....

आज कसेही करुन मासे खायचे आमंत्रण मिळवावे लागणार असे दिसतेय.....

अरे बोलवा कुणीतरी.....

अरेच्चा! माझा नं उशिरा की काय? असो पण अश्वी आहे की शाकाहार्‍यांची रिप्रेझेंटेटिव्ह... Proud
जागु, फायनल छायाचित्रं इंटरेस्टींग दिसतंय.... फक्त तो न सोललेला आणि सोललेला वाटा सोडून.

आता जावच करंदी आणायला Wink
>>>आळुवडीतही करंदी घालतात.<<< वा ! काय आयडिया आहे !
दुसर फोटो लईच झ्याक Happy फोडणित टाकू काय ?

आंब्याची कढी दोन दिवसांत टाकते साधना.
भ्रमर आमच्याकडील कोळणी वाटे करुन साफच करत बसलेल्या असतात त्यामुळे फ्रोझन करंदीच टेंन्शन नसत.
शैलजा, रोहित धन्स.
वर्षा, गब्बर, गिरिविहार, पराग तुम्ही आलात की ताटात वाढतेच.
अवल अग लसुण टाक.
दक्षे आलिस का ग मार्केटमधुन ?

करंदी कोलंबीसारखीच लागते ना ? मी खाल्ली आहे एका मैत्रिणीकडे करंदी घातलेली बिर्याणी. मस्तच होती !
रच्याकने, करंदी, कोलंबीचे सोललेले वाटे मिळतात म्हणून घरी आणून करायला सोपे वाटते. बाकीचे मासे खूप आवडले तरी नीट साफ करायला जमत नाही Sad

जागू करंदी घातलेल्या आळूवडीची आठवण कशाला केलीस? करंदी काही नशिबात नाही तेव्हा कोलंबीचे कालवण केले.
अगो, बाकी मासे पण साफ करुन घ्यायचे कोळणीकडून.

अगो, बाकी मासे पण साफ करुन घ्यायचे कोळणीकडून. >>> नवख्या गिर्‍हाईकांना कोळिणी फार फसवतात हो Sad शिळा / ताजा, किंमत, साफ करुन देणे अशा सगळ्याच बाबतीत. माहीतगाराबरोबर जाणे चांगले. पण ते नेहेमी जमतेच असे नाही.

Pages