पॉम्फ्रेट कोळीवाडा

Submitted by वर्षू. on 2 May, 2011 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मुंबईत राहणार्‍या प्रत्येक मासे प्रेमींनी फिश कोळीवाडा हा प्रकार चाखलाच असेल..
काल खूप मस्त पॉम्फ्रेट मिळाली आणी नॉस्टेल्जिया जागृत झाला.
चव आठवून आठवून केला. मस्त जमला..

१ मोट्ठा पॉम्फ्रेट मासा (सर्व एक्स्पोर्ट झाले नसतील तर मिळतात कधीकधी )
दीड गड्डी सोललेला लसूण
१ टेबल स्पून भरून ओवा(गरम पाण्यात एक तास भिजवून ठेवा)
दोन इंच आलं-
लाल तिखट,मीठ- स्वादानुसार
खाण्याचा रंग
गरम मसाला- १ टी स्पून
बेसन -१ टेबलस्पून
(तांदळाची पिठी-१ टेबलस्पून -ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

पॉम्फ्रेट चे उभे तुकडे चिरून घ्या. तो स्वच्छ धुवून घ्या.
आलं,लसूण,ओवा एक जीव होईस्तोवर (ओवा भिजवलेलं )पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
हा वाटलेला मसाला,मीठ,तिखट,गरम मसाला,खाण्याचा रंग ,तांदूळाची पिठी तुकड्यांना नीट चोळून लावून एक तास मॅरिनेट करा.
मोठ्या ताटात बेसनघ्या. त्यात थोडेसे मीठ,तिखट घालून ,पाणी मिक्स करून अगदी पातळ घोळ तयार करा.
पसरट पॅनमधे तेल खूप गरम करून ,पॉम्फ्रेट चे तुकडे बेसनाच्या घोळात बुडवून,छान लाल रंगावार कुरकुरीत तळा.

रेडी टू ईट- आता बिना भोकाची स्लाईस मिळवण्याकरता चढाओढ.. Happy

वाढणी/प्रमाण: 
तीन खवैय्यांकरता..
अधिक टिपा: 

तांदूळाच्या पिठीमुळे मासे कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
सायन चा कोळीवाडा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षु
एकदम मस्त रेसिपी... पण तुझी स्टाईल निराळी आणि मासा पण वेगळा निवडलास.. Happy
मासे टाकतेयस तोपर्यंत ठिक आहे. Happy
:विविध चायनीज प्राण्यांच्या पाकृ यायला लागतील की काय अशी भीती वाटणारी बाहुली: Proud

वॉव, वर्षू आम्ही हॉटेलात गेलो कि भाचे मंडळींची फर्माइश हिच असते. कोळी लोकांत मासे डिप फ्राय केले जातात, बाकि लोक शॅलो फ्रायच करतात.
कोळीवाड्याचे ऑफिशियल नाव आता, गुरु तेग बहादुर सिंग नगर असे झालेय. थोडक्यात जीटीबी नगर. स्टेशनला पण तेच नाव दिलेय. पण उल्लेख मात्र कोळीवाडा असाच करतात.

पण काय ग हे, पहिली प्रतिक्रिया शाकाहारी मंडळींची !!

दिनेश दा.. Happy गुरु तेग बहादूर.. ? वॉव !हे तर मला माहितच नव्हते. कोळीवाड्यात आधिकतर सरदार राहतात. मला वाटतं फिश कोळीवाडा हे फिश अमृतसरी चं बंबईया रूप असावं Happy
जागुतैमाता.. प्रसन्न.. !!! Happy
भ्रमर.. Lol एकाचसाठी लिहायचं होतं रे.. पण जनास्तव तीन जणांसाठी लिहिले.. Wink

मस्त !! टेस्टी असेल एकदम.. आम्ही दुसर्‍या माश्यांचं करून बघू असच..

बाय द वे.. रेसिपी सार्वजनिक करा कृपया... सर्चमध्ये येत नाही नाहितर आणि ऐनवेळी सापडत नाही..

वर्षू नील
एवढे मोठे पापलेट आता दिसायला देखील कमी आणि दिसले तर खिशाला परवडत नाहीत.
तूझ्या मागच्या खाऊगल्ली पेक्शा ही पोस्ट खूप आवडली.

काय मस्त दिसतय. इथे द्या ते ताट. Happy

पापलेट मिळतात इथे मोठी तेव्हा हे करायलाच पाहिजे.

असे कोळंबीचे पन छान लागते. मोठी कोळंबी तिचे.

@ पराग..मलाही हा प्रॉब्लेम बर्‍याचदा येतो रे..पण सार्वजनिक कसं करायचं ते माहित नाही. मग मी हितगुज मधे जाऊन आहारशास्त्र आणी पाककृती मधे शोधते. जरा लौकर सापडायला मदत होते.

यस्स्स... रावस,किन्वा इतर कुठलेही एका काट्याचे मासे,कोळंबी अश्या पद्धतीने केलेले यम्म लागतात.
चातका.. सॉर्री.... नेक्स्ट टायमाला तुला लिन्क पाठवीनच Happy

मस्स्त! Happy

वाढणी ३ जणांसाठी कशी पुरेल? भुकेपोटी हे सगळं मी यकटी संपवीन. चिनी पापलेट खरंच भलेथोरले दिसतायत. Wink

आलं,लसूण,ओवा एक जीव होईस्तोवर>>>> मी जीव जाईस्तोवर वाचलं... Happy

प्रचि सुरेख.... रविवारी काय खायचं याची चिंता मिटली....

वर्षू, एकदम मस्त रेसिपी. मी कोरड्या बेसनात घोळून बोंबिल फ्राय केलेत, अप्रतिम अशी चव लागते. पण बेसनाचा घोळ बनवुन मासे कधी फ्राय केले नाहीत. अर्थात एवढी मोठी पापलेटे खिशाला मोठ्ठे भोक पाडतील, त्यामुळे लहान आणुन प्रयोग करेन. तसाही हा प्रयोग इतर माशांवरही करण्यासारखा आहे.

इतकं सगळं तुमच्यापैकी बरेच जण एकटे संपवू शकता

अगं, कळतंच कुठे संपले ते?? परत घ्यायला हात पुढे करावा तर ताट रिकामे, तेव्हा लक्षात येते की मासे संपले Sad माझी लेक तर तळलेले मासे तसेच उचलुन खाते, सोबत चपाती, भात काहीही नाही, त्यामुळे ताट संपवणे अजिबात कठिण जात नाही. (मांदेलीचे दोन वाटे तिच्या एकटीसाठी आणि त्यातल्या दोन मांदेल्या माझ्यासाठी अशी विभागणी असते घरी)

पराग..मलाही हा प्रॉब्लेम बर्‍याचदा येतो रे..पण सार्वजनिक कसं करायचं ते माहित नाही

रेसिपी संपादनमध्ये सगळ्यात खाली जाऊन पहा, गृप आणि सार्वजनिक असे दिसेल त्यात सार्वजनिकवर टिक करायची. धागा फक्त गृपमेंबर्साठी असला तर सगळ्यात तळाला दिलेल्या सर्च इंजिनला तो सापडत नाही. त्यामुळे धागे नेहमी सार्वजनिक करावा (तसेच कारण नसले तर)

मस्तच ग वर्षुताई. काय सुरेख दिसतायत त्या तुकड्या.

वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरच्या मार्केटात त्या चपलांच्या दुकानांच्या शेजारी 'जय जवान' स्टॉलवाला असे प्रॉन्स कोळीवाडा बनवायचा. यम्मी!

@ साधना.. Happy ..बेसनाचा घोळ अगदी पात्तळ कर.. आणी हो सार्वजनिक केलाय गं हा धागा..
तुझी पोरगी मस्त पटाईत दिसतीये मासे खाण्यात. खाणारे असले तर करायला अजूनच उत्साह येतो नै??
मा>>मी... ''जय जवान' स्टॉलवाला''.......किती गं नॉस्टेल्जियाला घेऊन गेलीस!!!!!! Lol

मस्त. एकदम तोंपासु Happy इतके मोठे पापलेट म्हणजे खापरी / कापरी ( नक्की काय आहे शब्द ? ) पापलेट का ? मी खाल्ले आहेत एकदोनदा.

आम्ही दुसर्‍या माश्यांचं करून बघू असच >>> सेम हियर >>> दुसरे मासे म्हणजे वांगी का ? Proud

माशाची खापरी, कळपुट असे पण प्रकार असतात ना ? (जाणकारांनो ..)
पुर्वी अगदी दोन इंची पापलेटाची पिल्ले पण असायची विकायला. तसे सुकवलेले पण मिळायचे.
साधारणपणे सगळेजण असेच तूकडे करतात. पण माझा पुतण्या सांगतो ( तो ५ स्टार शेफ आहे ) कि खास गोर्‍या लोकांसाठी, फिले करताना पापलेट आडवा कापतात. त्यात अजिबात काटा असत नाही.
असा पापलेट चेंबूरला वैशाली होटेलमधे मिळतो.

लोकप्रभामधे आणखी एक प्रकार वाचला. बांगड्यासारख्या माशाचा काटा ओढून अख्खा काढायचा. मग हळूवार हाताने मालिश करत, सगळे मास बाहेर करायचे. ते कांदा लसणात परतून परत माश्याच्या पोकळीत भरायचे. मग तो मासा पावाच्या चुर्‍यात घोळवून, तेलात तळायचा. बहुतेक तुर्की प्रकार होता तो.

लक्ष्मीबाई धुरंधरांच्या, गृहिणीमित्र अर्थात हजार पाकक्रिया, या पुरातन पुस्तकात एक मजेशीर उल्लेख आहे.

"बगळ्याचे हाडाची पूड करून ती माश्याच्या आतून चोळल्यास काटा विरघळतो, असे ऐकून आहोत. पण प्रत्यक्ष अनुभव घेता आला नाही. तरी आमच्या शिकारीबंधूनी अनुभव घेऊन कळवावे. "

दिनेश दा.. अतिशय रंजक माहिती..
बगळ्याचं हाड काढल्यावर बगळ्याचं काय करायचं ???????????
इथे ही तळहाताएव्हढी पापलेटं मिळतात.. पण दोन इंची?? फारच पिल्लू नै???
पण इतकी मोठी क्वचितच मिळतात. Happy

Pages