पॉम्फ्रेट कोळीवाडा

Submitted by वर्षू. on 2 May, 2011 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

मुंबईत राहणार्‍या प्रत्येक मासे प्रेमींनी फिश कोळीवाडा हा प्रकार चाखलाच असेल..
काल खूप मस्त पॉम्फ्रेट मिळाली आणी नॉस्टेल्जिया जागृत झाला.
चव आठवून आठवून केला. मस्त जमला..

१ मोट्ठा पॉम्फ्रेट मासा (सर्व एक्स्पोर्ट झाले नसतील तर मिळतात कधीकधी )
दीड गड्डी सोललेला लसूण
१ टेबल स्पून भरून ओवा(गरम पाण्यात एक तास भिजवून ठेवा)
दोन इंच आलं-
लाल तिखट,मीठ- स्वादानुसार
खाण्याचा रंग
गरम मसाला- १ टी स्पून
बेसन -१ टेबलस्पून
(तांदळाची पिठी-१ टेबलस्पून -ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

पॉम्फ्रेट चे उभे तुकडे चिरून घ्या. तो स्वच्छ धुवून घ्या.
आलं,लसूण,ओवा एक जीव होईस्तोवर (ओवा भिजवलेलं )पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
हा वाटलेला मसाला,मीठ,तिखट,गरम मसाला,खाण्याचा रंग ,तांदूळाची पिठी तुकड्यांना नीट चोळून लावून एक तास मॅरिनेट करा.
मोठ्या ताटात बेसनघ्या. त्यात थोडेसे मीठ,तिखट घालून ,पाणी मिक्स करून अगदी पातळ घोळ तयार करा.
पसरट पॅनमधे तेल खूप गरम करून ,पॉम्फ्रेट चे तुकडे बेसनाच्या घोळात बुडवून,छान लाल रंगावार कुरकुरीत तळा.

रेडी टू ईट- आता बिना भोकाची स्लाईस मिळवण्याकरता चढाओढ.. Happy

वाढणी/प्रमाण: 
तीन खवैय्यांकरता..
अधिक टिपा: 

तांदूळाच्या पिठीमुळे मासे कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
सायन चा कोळीवाडा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, माझी वहिनी एक आठवण सांगते. खुप वर्षांपुर्वी तिच्या ग्रुपने रेल्वेतून प्रवास केला होता. त्यांनी चिकन मागवले तर त्यातली मान जास्तच बाकदार होती म्हणे.

कुलाब्याचा एक प्रसिद्ध कबाबवाला, तर कावळे मारत असे.. अशी अफवा उठली होती मधे.

बांगड्यासारख्या माशाचा काटा ओढून अख्खा काढायचा. मग हळूवार हाताने मालिश करत, सगळे मास बाहेर करायचे. ते कांदा लसणात परतून परत माश्याच्या पोकळीत भरायचे

जाड कातडीचा मासा लागेल ना यासाठी?? तुर्कीतच मिळेल मग असला मासा. पापलेट, बांगडा यांची कातडी अतिशयच पातळ असते. धुतानाही जोरात घासले तर निघुन येते.

कुलाब्याचा एक प्रसिद्ध कबाबवाला, तर कावळे मारत असे

ही अफवाच असणार..कबाबासाठी मांसल भाग लागतो. कावळ्यात कुठुन एवढे मांस?? तो अगदी स्लिम नी ट्रिम असतो. कुत्राबित्रा असेल तर ठिक.. आमच्या भागात तरी खाऊन माजलेले कुत्रे खुप आहेत. हाडकुळे कुत्रे जवळजवळ नाहीच.

बरीच पिल्लु पापलेट आणुन त्याचे तुकडे करायचे. तेलात (भरपूर) कांदा,खोबरं,कोकम,हळदीचं पान घालुन (मीठ, तिखट,हळद अर्थात आलंच) त्यात पापलेटाचे तुकडे घालुन शिजवायचे. झक्कास 'कळपुटी' (किंवा कोशंबिर) तय्यार! Happy

आम्ही दुसर्‍या माश्यांचं करून बघू असच >>> सेम हियर >>> दुसरे मासे म्हणजे वांगी का ? >>>> Lol अगो.. गूड वन.. पण वांगी नाही सिंडी फ्लॉवरचे करेल बहूतेक.. Proud
मी एच मार्ट मधून मासे आणायचं धाडस करेन मोस्टली कोळीवाडा करण्यासाठी.. Happy

पराग,मृ. - कसे झाले ते कळवा नक्की Happy
भ्रमर -धन्स रे ..रेसिपी छानै तुझी..
परदेसाई- - Lol
साधना.. बाप्रे..कावळा,कुत्रा.. नेक्स्ट टायमाला कोलाबा ला जायचा प्लॅन रद्द!! Uhoh

Pages