तळण्यासाठी :
कडकड्या च्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
मिठ
तेल
लसुण पाकळ्या (ऑप्शनल) ठेचुन
कालवणासाठी
तुकड्या४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला
मिठ
चिंचेचा कोळ
वाटण (ऑप्शनल) : पाव वाटी ओल खोबर, आल, लसुण, कोथिंबिर, १-२ मिरच्या सर्व बारीक वाटून.
चेंज म्हणून थोडा कढीपत्ता, पुदीनाही घालु शकता त्यामुळे रोजच्यापेक्षा थोडी वेगळी चव येते रश्याला
तळण्यासाठी :
तेल सोडून तळण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र तुकड्यांना कालवुन घ्या.  तवा गॅसवर चांगला गरम करा. तवा जर निट तापला नसेल तर तुकड्या चिकटतात.  मग तव्यात तेल सोडून हव्या असल्यास लसुण पाकळ्या टाकुन त्या बाजुला सारुन तुकड्या सोडा. हात सांभाळा तेल कधी कधी पटकन तुकडीतल्या पाण्यामुळे सरसर करत उडत. पाच मिनीटांनी तुकड्या उलटून दुसर्या बाजुने तळा. गॅस बंद करुन त्यातली एक तुकडी जेवण्याच्या आधीच मटकवा (तळे राखी तो पाणी चाखे ह्या म्हणीप्रमाणे) ही चव जेवणातल्या तुकडीपेक्षा भारी असते.
कालवण :
भांड गॅसवर ठेउन त्यात तेलावर लसूणाची खमंग फोडणी द्या. आता त्या तेलावर हिंग, हळद, मसाला घालुण वाटण, चिंचेचा कोळ, तुकड्या घाला.  मग मिठ घाला. ५-७ मिनीटे उकळू द्या. मग गॅस बंद करा.
कडकड्या च्या नावाप्रमाडे तो काही कडक किंवा कडाकड आवाज करणारा नसतो.  साधारण रावस, घोळीच्या जातितलाच हा मासा.  ह्याला खवले असतात.  नेहमीप्रमाणेच डोके आणि शेपटाकडचा भाग कालवणासाठी वापरावा व मधला भाग तळण्यासाठी.
जर जास्त लोक असतील जेवण्यासाठी तर वाटण वापरल्याने रस्सा जास्त होतो.
 
 
काय मजेशीर नाव आहे कडकड्या.
काय मजेशीर नाव आहे कडकड्या. फोटो कुठे आहे?
जागुतैSS फोटो दे गं लवकर
जागुतैSS फोटो दे गं लवकर
हा आहे कडकड्या. बाजारात जाऊन
हा आहे कडकड्या. बाजारात जाऊन कोळणीने वाटा लावलेला तिथेच मोबाईलमधुन फोटो काढल्याने क्लियर नाही आला.

तळण्यासाठी मिठ, मसाला लावुन सज्ज झालेल्या तुकड्या

ह्या मस्त खमंग मटकावण्यासाठी तयार झालेल्या तुकड्या

हे आहे तयार झालेले कालवड अगदी कडकडीत.

गॅस बंद करुन त्यातली एक तुकडी
गॅस बंद करुन त्यातली एक तुकडी जेवण्याच्या आधीच मटकवा >>>> मी असे वांग्याचे काप मटकवते
जागु मस्त वाटले बीबी वाचून..
जागु मस्त वाटले बीबी वाचून..

मासे बनवण्याची साधारण कृती एकसारखीच असते का गं?
हं... आता जराजरा कल्पना आली
हं... आता जराजरा कल्पना आली 'कड्कडेरावांची'.
रस्सा..स्स्स्स्सस्स्स भारीय....घर आठवलं....च्च्ं..!
ही चव जेवणातल्या तुकडीपेक्षा भारी असते. >>> अगदी बरोब्बर
वा वांग्याचे काप आणी
वा वांग्याचे काप आणी कडकडेराव......
कडकड्या ह्या नावाचा मासा
कडकड्या ह्या नावाचा मासा पहिल्यांदाच ऐकला आणि पाहिला.
रावस.घोळीच्या गटातला आहे म्हणजे काटेरी नसणार.
जागु, नव्या मुंबईत सी फूड रेस्टॉरंट काढावं का आपण दोघांनी मिळून?
जागू,हे ढोमी मासे आहेत का?
जागू,हे ढोमी मासे आहेत का?
अश्विनी तुमच्या तुकड्या
अश्विनी तुमच्या तुकड्या म्हणजे तेच ना ग.
दक्षे हो ग आपण पालेभाज्या कश्या एकाच कृतीने बनवतो किंवा वेगवेगळ्या आमट्याही साधारण सारख्याच असतात. त्याप्रमाणे कालवण आणि तळण्याच्या कृति साधारण सारख्याच असतात. फक्त बोंबलाला त्याच्या गुळगुळीत पणामुळे पिठ लावावे लागते तळताना व कालवणात खोबर घालत नाहीत.
बाकी चव म्हटली तर प्रत्येक माश्यला वेगळी वेगळी चव असते.
अखि, चातक धन्स.
आशुतोष चालेल साधनाच्या भाजीच्या दुकानाच्या बाजुलाच टाकुया. म्हणजे माबोकरांना सोप्प जाईल. व्हेजी वाले साधनाच्या दुकानात आणि नॉनव्हेज वाले आपल्या.
म्हणजे ढोम्यासारखा/खी काय
म्हणजे ढोम्यासारखा/खी काय बसलायस्/लीयस हा वाक्प्रचार यावरुनच आलाय का? हे मासे आळशी असतात का?
डॉ. कैलास नाही नाही ढोमी
डॉ. कैलास नाही नाही ढोमी वेगळी. त्यांना फारशी चव नसेत जरा पाणचटच असतात. आणि थोडी सोनेरी छटा असते त्यांना.
माझ्या एका भाच्याला आम्ही
माझ्या एका भाच्याला आम्ही लहानपणापासुन ढोम्या म्हणतो.
"ढोम्या".., डुआयड्यांसाठी
"ढोम्या".., डुआयड्यांसाठी मस्त नाव.
 डुआयड्यांसाठी मस्त नाव.
मी परत परत त्या तुकड्या पहायला येतोय
जागू, शक्य असल्यास या अपरिचित
जागू, शक्य असल्यास या अपरिचित माशाची चव कशी वेगळी, ते पण लिही ना.
अशा शेपचा मासा, नेहमी अक्वेरियम मधे दिसतो.
चव कशी ते कस सांगु ? पण काटे
चव कशी ते कस सांगु ? पण काटे नसतात ह्याला घोळी प्रमाणे.
मला तर बरेचसे मासे सारखेच
मला तर बरेचसे मासे सारखेच दिसतात. कडकडे ओळखणं कठीण दिसतय.
जागू, धन्य बाई तुझी काय काय
जागू, धन्य बाई तुझी काय काय मासे शोधून काढते हे नाव कधी ऐकले नव्हते अन हा मासा कधीच पाहिला नव्हता ! माझ्या कडून तुला माशातली पीएच. डी
 हे नाव कधी ऐकले नव्हते अन हा मासा कधीच पाहिला नव्हता ! माझ्या कडून तुला माशातली पीएच. डी 
अमे कोळणीला विचारायचे. अवल
अमे कोळणीला विचारायचे.
अवल पि.एच्.डी. बहाल केल्याबद्दल धन्स.
जागुतै , तुम्हाला मासे तरी
जागुतै , तुम्हाला मासे तरी किती माहीत आहेत??????????????
चव कशी ते कस सांगु ? >> तयार
चव कशी ते कस सांगु ? >> तयार 'पाककृति' पार्सल कर्....
मनावर घेत असशील तर, पत्ता देतो 
 
जागुतै , तुम्हाला मासे तरी किती माहीत आहेत?????????????? >>> हे तिलाच माहीत नसेल
चातकला अनुमोदन ! माझाही पत्ता
चातकला अनुमोदन ! माझाही पत्ता पाठवते
हेलो
हेलो
जागु, मस्तच गं एकेक मासे
जागु, मस्तच गं एकेक मासे तुझे.... हा मासा रावसाच्या पिल्लांसारखा दिसतोय. त्यामुळे चवही चांगली असेल असे वाटतेय.
जागू, शक्य असल्यास या अपरिचित माशाची चव कशी वेगळी, ते पण लिही ना.
हे कसे करायचे?? गवारीच्या भाजीची चव आणि फरस्बीच्या भाजीची चव या दोघांमध्ये फरक आहे. पण त्यांची चव कशी आहे ते शब्दात कसे पकडणार?? फारतर गवार तुरट आणि फरस्बी जर्राशी पाणचट म्हणता येईल, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. कोण्या दुस-याला वेगळे शब्द सुचतील. परत त्यात जे मसाले/इतर जिन्नस घालु त्याप्रमाणे चवीत फरक पडणार, जसे शेंगदाणे घातले तर वेगळी चव आणि खोबरे घातले तर वेगळी चव आणि त्यामुळे मुळ भाजीच्या चवीतही जरासा फरक.
पण मासे/चिकन्/मटण यांना इतर मसाले लावले तरी त्यांची स्वतःची चव लपत नाही. करली/बांगडा/पापलेट्/हलवा/रावस इ. माशांना एकमेकांपासुन खुप वेगळी अशी चव आहे. त्या त्या वर्गातल्या माशांच्या चवी साधारण सारख्या असुही शकतात. जसे रावस्/घोळ्/जिताडा/सुरमई यांच्या चवीत थोडेफार साम्य आहे पण तरीही वेगळेपण ओळखू येते. पापलेट/सरंगा/हलवा यांच्या चवीतही साम्य असले तरी वेगळेपण आहेच. बांगडा आणि कर्ली हे दोन्ही मासेच पण यांच्या चवीत प्रचंड फरक आहे.
मी जागुचे मत्स्यपुराण वाचुन बाजारात जो मासा दिसेल तो उचलुन आणायचा सपाटा लावलेला मध्यंतरी (आता परत सुरू करायला पाहिजे हा उद्योग). मासा आणला की मी आणि लेक दोघेही फटाफट कामाला लागुन तळलेला मासा ताटात घेऊन उत्सुकतेने खायला बसायचो. पहिला घास तोंडात घातला नी चावला की एकमेकींकडे पाहायचो. हा मासा चांगला नाही/चालणेबल आहे/मस्तच आहे हे न सांगताच कळायचे एकमेकींना. पण तरीही आम्हाला चांगली/चालणेबल्/वाईट चव शब्दात पकडता येणार नाही..
आशु, हाटेल बिटेल उघडले तर इतरांना खायला काही उरेल याची गॅरँटी आहे काय?? मी तर माझे खाऊन झाल्यावरच बाहेर येईन किचनच्या. त्यात परत एखादा अगदी चांगला मासा मिळाला तर तो स्वतःच पुरवुन पुरवुन खायचा मोह होईल. कोणा दुस-याला देणे अगदी जीवावर येईल रे,  (माझ्या तरी)
  मी तर माझे खाऊन झाल्यावरच बाहेर येईन किचनच्या. त्यात परत एखादा अगदी चांगला मासा मिळाला तर तो स्वतःच पुरवुन पुरवुन खायचा मोह होईल. कोणा दुस-याला देणे अगदी जीवावर येईल रे,  (माझ्या तरी)
आह्हा.. कडकड्या पण मस्त
जागु.. माश्यांची विंग्रजी नावं पण टाकत जा गं.. म्हंजे इकडे शोधायला सोपं होईल..
वा, साधना, हेच हवे होते मला.
वा, साधना, हेच हवे होते मला. साधारण हा मासा चवीला कसा, त्याची कल्पना आली.
आता जागूला एक करता येईल.
चव, साफ करण्यासाठी लागणारा वेळ, खाण्यासाठी सोपा असे काहि निकष लावून माशांची प्रतवारी करायची. मग हे सगळ्यांनी स्वतंत्रपणे करायचे. सगळ्यांची सरासरी काढली म्हणजे आपल्याला चविष्ठ मासा कुठला ते कळेल.
>> अमे कोळणीला विचारायचे.
>> अमे कोळणीला विचारायचे. >>
पण कोळणी बरोबर सांगतात का?
एकदा मी आणि नवरा मासळी बाजारात गेलो. मला तरी काही मासे माहीत आहेत, त्यांची पाटी तर या बाबतीत पुर्ण कोरी आहे. एका कोळणीला मी एका माशाचे नाव विचारले तर ती म्हणाली 'तो म्हावरा आहे'. माझा नवरा मला म्हणाला की 'अगं ती सांगतेय की तो म्हावरा मासा आहे'. मला इतकं जोरात हसू आलं की बस्स... मी त्यांना मग सांगितलं की म्हावरा हे त्या माशाचं नाव नाही... मासे या शब्दाचा समानार्थी शब्द म्हावरा आहे. ':)
त्यावरून मला कळले की, काही वेळा त्या नाव सांगतही नसाव्यात... चुकीचे सांगून मासे विकतही असाव्यात.
त्यावरून मला कळले की, काही
त्यावरून मला कळले की, काही वेळा त्या नाव सांगतही नसाव्यात... चुकीचे सांगून मासे विकतही असाव्यात.
 मीही कोळणींनाच विचारते नावे. जागूचे फोटो असतातच डोळ्यासमोर तरीही खात्री करुन घेते.  पुर्णपणे अपरिचित माशांची नावेही त्यांनी जागूने दिली तीच सांगितली आहेत
  मीही कोळणींनाच विचारते नावे. जागूचे फोटो असतातच डोळ्यासमोर तरीही खात्री करुन घेते.  पुर्णपणे अपरिचित माशांची नावेही त्यांनी जागूने दिली तीच सांगितली आहेत 
अगं त्या कोळणीला कळलं नसेल तुझा नवरा काय विचारतोय ते..
दिनेश, तुमची कल्पना सुंदर
दिनेश, तुमची कल्पना सुंदर आहे. काम सुरू करायला हवे यावर. जागू आणि इतर मत्स्यप्रेमींनी पुढाकार घेऊन..
सगळ्यांची सरासरी काढली म्हणजे आपल्याला चविष्ठ मासा कुठला ते कळेल.
यासाठी मात्र वरचा उपद्व्याप करायची गरज नाही हं.. आम्हाला माहीत आहे कुठला मासा कसा लागतो ते....

आणि त्यात प्रत्येकाच्या चविष्टपणाच्या व्याख्या वेगळ्या असतात ना. मला कर्ली चविष्ट लागतो, माझ्या लेकीला विचाराल तर ती मांदेलीला टॉपरँकिंग देईल
तोंपासु! आज आमच्याकडे
तोंपासु! आज आमच्याकडे कॅटफिशचे कालवण!
Pages