राजहंसाचे चालणे... अर्थात, आणखी एक ब्लेग
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
95
आज एकदम जाणवलं की माझे इथे बरेच ब्लेग्स झालेत. ज्या ब्लॉगमध्ये वाचकांकडून काही माहिती मागितली जाते, वाचकांचा सहभाग हा प्रतिक्रियांपेक्षा जास्त अपेक्षित असतो त्याला ब्लेग म्हणतात (blog that begs). जुनी सवय. तर आणखी एक ब्लेग.
असे म्हणतात की हेमिंग्वेने एक अतिलघुकथा लिहिली होती : "For sale : Baby shoes, never worn." सहाच शब्द, बस्स ! त्याच्या सर्वोत्तम साहित्यात ती गणली जाते म्हणे.
तेव्हा 'राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?' या न्यायाने आपणही असे काही लिहावे असा विचार आला. तेव्हा हा ब्लेग आपल्या सर्वांच्या अतिलघुकथांसाठी खाली तुमच्या अ.ल.क. लिहा. शक्यतो एका ओळीपेक्षा मोठी नसावी एवढीच अपेक्षा. म्हणजे हे थोडेसे गद्य हायकूसारखे होईल. सुरूवात माझ्या दोन प्रयत्नांनी करतो.
विषय:
प्रकार:
शेअर करा
हे हल्ले अधूनमधून सातत्याने
हे हल्ले अधूनमधून सातत्याने होतायत साइटवर.. आपण ’धाव घेई अॅडमिन/ वेमा आता चालू नको मंद!' असा धावा करायचा फक्त.
नी, बर्याच बीबींवर ह्या
नी, बर्याच बीबींवर ह्या आयडीचे वेगवेगळे प्रतिसाद दिसतायत आज. काल तू केलेला धावा वाचला होता.
अॅडमिन/वेमा ह्या प्रकाराकडे लक्ष देणार कां प्लीज?
तो उदास बसलेला.. काळोख्या
तो उदास बसलेला.. काळोख्या सरोवरा काठी.. क्षीण.. - आज अमावस्या..
.
.
मस्त धागा
मस्त धागा
Pages