सख्खी भावंडं

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ह्या खेपेच्या भारतभेटीत ओरीसाची ट्रीप केली. केवढं पहाण्यासारख आहे नाही आपल्या देशात?. पुरी, कोणार्क, चिलका लेक, भुवनेश्वर - प्राचीन शील्पांपासून निसर्गाचं सौंदर्य - सगळ्याचीच भरपूर रेलचेल. ह्या खेपेला सगळीकडेच ट्रेंड गाईडस घेतले होते त्यामुळे ट्रीप एकदम माहितीपूर्ण आणि मस्त झाली.

ट्रिपमधलं एक वैशिष्ट्य म्हणजे नंदनकानन सँक्च्युरीची भेट. तेथेपण एक सँक्च्युअरीचा गाईड घेतला होता. त्याला बर्ड कॉल्स, अ‍ॅनिमल कॉल्स येत होते त्यामुळे त्याने सगळ्या प्राण्यांशी संवाद साधला. प्रत्येक प्राण्याला अगदी प्रेमाने बोलवायचा आणि ते यायचेपण. काहीं पक्शांकडून गाणी म्हणुन दाखवली. मोराकडून नाचून दाखवलं. अस्वलाला घरातून बाहेर यायला सांगितलं. आणि ते आलंपण. खूप मजा आली.

त्या नंदनकाननमधलं टिपलेलं हे खास दृष्य. काय ऐटित बसली आहेत न भावंडं?

Tigers- Nandankanan.jpg

अजून टाकायचीस ना प्रचि Happy

या सख्ख्या भावंडांना एकाच ताग्यातल्या कापडाचे कपडे नाही वाट्टं शिवले? एकाचा ड्रेस शेडेड आहे.

आर्च - धन्यवाद.
प्लीज टुरची माहिती देशील का?

आमच्या एका प्राध्यापकांनी मुलांची नावे नंदन आणि कानन अशी ठेवली होती. Proud
त्यान्यायाने मी संजयगांधी किंवा नागझिरा ठेवली तर मुलं मोठी होऊन केस करतील काय पॅरंटल अ‍ॅब्युज म्हणून. ? Proud

सगळ्यांना धन्यवाद.

खर तर फक्त हा फोटोच खूप आवडला म्हणून टाकायचा होता. एकाच आईवडिलांची मुलं म्युटेशनमुळे एक पांढरा वाघ आणि एक नॉर्मल रंगाचा. निसर्गाची किमया म्हणून फोटो पोस्ट केला.

रैना, आम्ही आमचेच गेलो होतो. ट्रॅव्हल एजन्सी थ्रू हॉटेल्स आणि कार बूक केली होती. म्हणजे आपल्याला हवं तेंव्हा आणि हवं तेथे आणि हवं तसं भटकता येत. चार रात्र आणि ५ दिवस. टूर घेतली तर arrive in Bhubaneshwar, relax in Bhubaneshwar, shopping in Bhubaneshwar असा उगीचच वेळ काढतात मग बघणं कमी होतं असं आपलं माझं मत होतं. आम्ही पुरीला राहून जगन्नथ देऊळ, कोणार्क आणि चिलका लेक केलं. कोणार्कला जाताना चंद्रभागा वगैरे ठिकाणं केली. चिलका लेकवरून राजहंस संगम वगैरे बघता येतं. ओरीसात ७-८ सेंचुरीतल्या देवळांची रेलचेल आहे. शिल्पकाम अगदी बघण्यासारखं आहे. पण प्रत्येक ठिकाणी लोकल गाईड घ्यावाच. सगळ्या देवळांच्या कथा ऐकायला मिळतात. मजा येते. पण किती आणि कोणची देवळं बघायची तेपण आपलं आपल्याला ठरवता येतं. पुरी मस्त आहे. होटेल गावापासून दूर पण अगदी समुद्र काठावर त्यामुळे तीन दिवस स्मुद्रावरचा सूर्योदय बघायला मिळाला. कोळी मासे पकडायला जायला किनार्‍यावरून होड्या कशा पाण्यात नेतात आणि त्यात चढतात ते तर एकदम बघण्यासारखं.

भुवनेश्वरवरून धौली, पिपली, उदयगीरी, खंडगीरी, मुक्तेश्वर, लिंगराज, नंदनकानन वगैरे केलं. आणि हो भुवनेश्वरमध्ये ओरीसाचं शॉपिंग. कपडे ते काजू. मुंबईहून भुवनेश्वर आणि परत जेट एअरवेज आणि एअर इंडियाने प्रवास. एअरइंडियात अजून बर्‍यापैकी खायला देतात बाकी सगळ्या एअरलाईन्समध्ये विकत घ्या. पण सगळ्या फ्लाईट्स अगदी वेळेवर निघाल्या आणि वेळेवर पोहोचल्या. सगळ्या म्हणजे ह्या खेपेला यु एस हून दिल्लीला उतरून - जम्मू - वैष्णोदेवी - जम्मू - दिल्ली - मुंबई अशीही ट्रीप केली त्याही सगळ्या फ्लाईट्स अगदी वेळेवर.

ड्रायव्हर लोकल असल्यामुळे टिपिकल ओरीसा जेवणाची मजा घेता आली. आणि हो, चिलका लेकवर गेल्यावर श्रींम्प्स खायला विसरू नका. एकदम टेस्टी. तुमच्या देखत छान स्टरफ्राय करून देतात जास्त मसाले न घालता.

अजून काही माहिती हवी असली तर जरूर विचारा.