लाघवी...

Submitted by विशाल कुलकर्णी on 14 April, 2011 - 01:05

तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!

अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त, त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !

कधी जमणार ? तुझ्या मनात डोकावणं....
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !

विशाल...

गुलमोहर: 

कधी जमणार ? तुझ्या मनात डोकावणं....
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !

हीच सीमा (लक्ष्मण रेषा) रेषा आहे, म्हणून हे काव्य आहे. त्यापलिकडे रामायण असतं................ असो.....

छान Happy

विशल्या छान कविता... Happy
म्हण आहे, सागराचा तळ एक वेळ गाठता येईल, पण स्त्रीचे मन जाणता येणार नाही.

मस्तच !
एकदम लाघवी कविता !
(कविताही त्या मुलीसारखीच... वरवर कळते, पण तिचं मन जाणता येत नाही)

छाने Happy

मस्त Happy

Happy

नाखु फक्त एक वाक्य अ‍ॅड केलय मित्रा, कुठलं ते तुझ्या लक्षात आलं असेलच ! Wink
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!

Pages