ता.क.

Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:50

पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..

ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उमेशजी, Happy ओके.. धन्यवाद..

विशालजी, Happy

आनंदयात्री, जे सुचलं ते असं सुचलं. Happy

सर्वांचे खूप खूप खूप आभार.. Happy

OH MY GGGOOOOODDDD!!!!!!!
अफाssssssssssट!
स्तुती करायला शब्द सापडतील / आठवतील / सुचतील इतपतच लिहा की तुम्ही!!
Happy

Pages