Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:50
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..
ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
गुलमोहर:
शेअर करा
भिडली........
भिडली........
उमेशजी, ओके..
उमेशजी,
ओके.. धन्यवाद..
विशालजी,
आनंदयात्री, जे सुचलं ते असं सुचलं.
सर्वांचे खूप खूप खूप आभार..
व्वाह !!!!!!!!!!!!
व्वाह !!!!!!!!!!!!
भारी
भारी
अल्टी!!!
अल्टी!!!
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
ता. क. खल्लास!
ता. क. खल्लास!
Killer..
Killer..
मस्त ! अन ता. क. - तर भन्नाटच
मस्त !
अन ता. क. - तर भन्नाटच ! वा ! क्या बात है |
वंदना, rutuved खूप खूप आभार..
वंदना, rutuved
खूप खूप आभार..
अवल, खूप दिवसांनी आपला प्रतिसाद आला कवितेला.. आभार..
सुंदर
सुंदर
नेहमीप्रमाणेच खूप छान.
नेहमीप्रमाणेच खूप छान. पुलेशु मुक्ता.
OH MY
OH MY GGGOOOOODDDD!!!!!!!

अफाssssssssssट!
स्तुती करायला शब्द सापडतील / आठवतील / सुचतील इतपतच लिहा की तुम्ही!!
अप्रतीम !! बाकी शब्दच नाहीत
अप्रतीम !! बाकी शब्दच नाहीत
सर्वांना अनेकानेक
सर्वांना अनेकानेक धन्यवाद..!
हितचिंतक,
Pages