ता.क.

Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:50

पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..

ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं.."

"पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय..."

....... छान.

मुक्ता,
फारंच सुंदर... Happy
काल इथे पुण्यात अस्साच पाऊस पडला. त्यामुळे सगळं पटकन रिलेट करता आलं.
थोड्याफार फरकाने, प्रत्येकाच्या मनातला पाऊस छान मांडलायंस. Happy

पुलेशु!!!

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

उमेश... Happy :-?

अमित, Happy

दक्षिणा, Happy मी पण पुण्यातच रहाते.. या कवितेत कालचाच पाऊस आहे..

हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..>>>
आणि मग हळुहळु दरवळणं सुटतच.. नेम़कं मांडलयस..!!

waah.

>>ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...>>भन्नाट
जियो
Happy

ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...

आईशप्पथ.. !!

सलाम....

मुक्ता...सुंदर!! सुंदरच!! सुंदरच!!! Happy
पण -
मी पहिल्या प्रेमाचा अर्थ घेतला..आणि मला त्यात "रडून झाल्यावर वाटतं तसं.." ही ओळ खटकली...
बाकी थेट!
अभिनंदन! Happy

आईशप्पत..

>>>>अरे हो...पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलयं...खरच रुतलं काळजात..!

ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय... >>> खल्लास. खल्लास.

फारा दिवसांनी असं काही भिडलं. Happy

Pages