Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:50
पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..
आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं..
बाकी ठिक..
ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
गुलमोहर:
शेअर करा
"आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त,
"आता कसं स्वच्छ वाटतय, मस्त, मोकळंमोकळं..
रडून झाल्यावर वाटतं तसं.."
"पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय..."
....... छान.
>>पहिल्या पावसानंतर मातीने
>>पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
जीवघेणी ओळ...
मस्तच..खूप सुंदर ( आज पाऊस
मस्तच..खूप सुंदर
( आज पाऊस पडला )
(No subject)
सुंदर.. शेवट अगदी जबरदस्त..
सुंदर..
शेवट अगदी जबरदस्त..
व्वा ! अप्रतिम.. शेवटच्या
व्वा ! अप्रतिम.. शेवटच्या ओळीने तर .......
प्रतिसादास कारण की... आपली
प्रतिसादास कारण की...
आपली हरेक कविता अप्रतिम असते..
तशी ही देखील..!
मुक्ता, फारंच सुंदर... काल
मुक्ता,

फारंच सुंदर...
काल इथे पुण्यात अस्साच पाऊस पडला. त्यामुळे सगळं पटकन रिलेट करता आलं.
थोड्याफार फरकाने, प्रत्येकाच्या मनातला पाऊस छान मांडलायंस.
पुलेशु!!!
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
उमेश...
:-?
अमित,
दक्षिणा,
मी पण पुण्यातच रहाते.. या कवितेत कालचाच पाऊस आहे..
(No subject)
हल्ली तुझे विचार विरतात असेच
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..>>>
आणि मग हळुहळु दरवळणं सुटतच.. नेम़कं मांडलयस..!!
waah.
waah.
ता.क. घुसळलंस!
ता.क. घुसळलंस!
>>ता.क. अर्रे हो, सांगायचच
>>ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..

पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...>>भन्नाट
जियो
अ प्र ति म!!! आवडली कविता!
अ प्र ति म!!!
आवडली कविता!
सुंदरच ग
सुंदरच ग
सुरेख ! मी तो पाऊस मिस केला
सुरेख ! मी तो पाऊस मिस केला याच मात्र वाईट वाटतय.
आईशप्पथ.. !!! झाडला अनुमोदन..
आईशप्पथ.. !!!
झाडला अनुमोदन..
खूप खूप आवडली.
खूप खूप आवडली.
ता.क. अर्रे हो, सांगायचच
ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय...
आईशप्पथ.. !!
सलाम....
अरे क्या बात है... एकदम मस्त
अरे क्या बात है... एकदम मस्त जमलीय....जियो ... !!!
अप्रतिम
अप्रतिम
सर्वांचे खूप खूप खूप
सर्वांचे खूप खूप खूप आभार...
आशूडी,
ता.क. घुसळलंस! >>
म्हणजे सुंदरच. शेवटच्या ओळी
म्हणजे सुंदरच. शेवटच्या ओळी क्लास!
सुरेखच ! कालच तुझ्या ब्लॉगवर
सुरेखच !
कालच तुझ्या ब्लॉगवर वाचली होती....!!
मुक्ता...सुंदर!! सुंदरच!!
मुक्ता...सुंदर!! सुंदरच!! सुंदरच!!!

पण -
मी पहिल्या प्रेमाचा अर्थ घेतला..आणि मला त्यात "रडून झाल्यावर वाटतं तसं.." ही ओळ खटकली...
बाकी थेट!
अभिनंदन!
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही.. >> छान !
आईशप्पत.. >>>>अरे
आईशप्पत..
>>>>अरे हो...पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलयं...खरच रुतलं काळजात..!
ता.क. अर्रे हो, सांगायचच
ता.क. अर्रे हो, सांगायचच राहिलं..
पहिल्या पावसानंतर मातीने दरवळणं सोडलय... >>> खल्लास. खल्लास.
फारा दिवसांनी असं काही भिडलं.
छान!!!!!!!!!!!!!!!
छान!!!!!!!!!!!!!!!
Pages