आंबेवाले काळे

Submitted by आयडू on 10 February, 2011 - 03:47

AK1.jpg

आंबेविक्री हा अवधूत काळ्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय! घरच्याच आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळं कलम कसं लावायचं, आंबा कसा पिकवायचा ह्याची माहिती त्यांना होती. पण पहिल्यापासूनचा ट्रेन्ड असा की पिकवलेला साधारण ४०० ते ५०० पेटी कच्चा आंबा वाशी मार्केटमध्ये विकायला आणायचा. ९२ सालापासून अवधूत काळे "काळे बंधू आंबेवाले - देवगड" ह्या नावाने आंबेविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याशी झालेल्या बातचितीतून त्यांच्या व्यवसायाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

व्यवसायात सुरू करताना -

१९८८ - ८९ ची गोष्ट. अवधूतच ग्रॅज्यूएशनपर्यंतच (बी. कॉम.) शिक्षण झालं, पण त्यावेळी गावी नोकरी मिळत नव्हती. काहीतरी आपलं स्वतःचं करायचं ह्या हेतूने मग अवधूतने पाच गुंठे जागेत वांगी लावली. अन् साधारण हजार किलो वांगी छानसं पॅकिंग करून विकली. ही क्लुप्ती यशस्वी झाली अन् मग आणखी काहीतरी वेगळं / मोठ्ठं असं करायला म्हणून अवधूत रत्नागिरीस गेला. अर्थात तिथं काही स्वतःची अशी जागा नव्हती की हाती भांडवलही नव्हतं.म्हणून मग कोल्हापुरातून घाऊक प्रमाणामध्ये उदबत्त्या विकत आणून त्या घरोघरी किरकोळ स्वरूपात विकल्या. ह्या व्यवहारात साधारण २५०/- दिवसाचे मिळत होते. महिनाखेरीस ५०००/- सुटायचे. पण कायम उदबत्त्या विकायच्या अथवा ह्या धंद्यात शिरायचं अवधूतच्या मनात नव्हतं. म्हणून मग आणखी काहीतरी करण्यासाठी अवधूतने मुंबईस जाण्याचा निर्णय घेतला.
१९९१ साली - अवधूत (डोंबिवलीत) मुंबईला नातेवाईकांकडे आला. मुंबईची काहीच माहिती नसल्याने सुरुवातीला एक वर्ष ठाण्यातल्या पॅकेजिंग इंडस्ट्रीमधल्या एका कंपनीत पर्चेस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. तिथे नवनव्या माणसांच्या ओळखी झाल्या. हा नोकरीचा अनुभव घेऊन झाल्यावर एक मात्र कायमच ठरवलं की आयुष्यभर नोकरी करायची नाही.

DSC00012.jpgव्यवसायाची मुहूर्तमेढ -

घरच्या ज्या आंब्याच्या बागा होत्या तिथला आंबा वाशी मार्केटला विकायला पाठवत होतो, तोच जर आपण स्वतः इथंच विकला तर? असा विचार मनात आल्यावर सुरूवातीलाच जास्त जोखीम नको म्हणून १०० पेटी आंबा स्वतःहून विकायचा ठरवलं. अन् म्हणून मग ठाण्यात राम मारूती रोडला १९९२ साली दुकान टाकलं. [गावी उपळ्याला म्हणजे राजापूरपासून १८ किमीवर प्रकाश काळे (भाऊ) ह्या व्यवसायाची दुसरी बाजू सांभाळतो. तो बागा सांभाळणं यापासून ते मुंबईला माल पोहचवण्याची व्यवस्था पहातो.] त्याकाळी फोन वगैरे नव्हता. साहजिकच पहिले ठरल्याप्रमाणे केवळ १०० पेटी आंबा ठाण्यात विकण्यासाठी पाठविला गेला. खरं तर १०० पेटी आंबा विकणं हे लक्ष्य कधीच साध्य झालं. अन् मग मागणीनुसार पहिल्याच वर्षी ३५० पेटी आंबा विकला गेला. पहिल्या वर्षातच येवढा आंबा विकला जाणं हे खूप होतं आत्मविश्वास वाढायला. आंब्याच्या सिझननंतर काय करायचं म्हणून अवधूतने गावकडचे ताजे मासे विकायचे ठरवले. विजयदुर्गवरून कोर्टनाक्याला (ठाण्यात) लक्झरीतून माश्यांची पेटी यायची. त्यासाठी पहाटे २:३० पासून वाट बघायला लागायची. 'भटाच माश्यांच दुकान' एकाच वर्षात फार फेमस झालं. पण ह्या सगळ्यात एकट्या अवधूतची प्रचंड ओढाताण झाली. अपु र्‍या मनुष्यबळामुळे मासे व आंबे दोन्ही विकण कठिण झालं होतं. अन् मग त्याचा परिणाम आंब्याच्या सिझनवर झाला असता तो तसा होऊ नये म्हणून शेवटी अवधूतने मासे विकायचे नाहीत असं ठरवून टाकले. ह्या मासेविक्रीचा फायदा आंब्याच्या सिझनमध्ये खूप झाला. मासे खाणारे लोक पुढच्या सिझनला आंबे विकत घेण्यासाठीही आले.

व्यवसाय विस्तार -

ह्यानंतर आंबा विक्रीवर संपूर्ण लक्ष्य केंद्रीत केलं. क्वालिटी प्रॉडक्टमुळं झालेल्या माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ठाण्यातली शाखा जोरात चालू होतीच. १९९९ साली डोंबिवलीतही आंबा विक्री चालू केली. आता डोंबिवलीची शाखा आसावरी काळे अवधूतची पत्नी सांभाळते. ठाणे, डोंबिवली परिसरात आमच्या दुकानातून तसेच पुण्यातही आम्ही आंबा पुरवतो. आगामी काळात मुंबई बाहेर शाखा विस्तार करायची योजना आहे.

नफ्यापेक्षा समाधान महत्वाचं!

२००४ मध्ये दुबईतल्या निर्यातदाराला एक कंटेनर आंबा निर्यातही केला पण तो एकदाच. अर्थात दुबईला एक्सपोर्ट करून मिळणारा पैसा आणि इथं मिळणारा पैसा ह्यात खूप फरक असेल असं वाटलं होतं का? ह्या प्रश्नावर अवधूतच ठाम मत असं की आंबा विकतानाच समाधान फार महत्वाच! मिळणा र्‍या नफ्यात फार काही फरक नाही. अन् त्याहून जास्त महत्वाचं हे की ह्यात काही पर्सनल टच नाही! शिवाय एवढ्या प्रमाणात क्वालिटी प्रॉडक्ट देणंही तेंव्हा शक्य नव्हतं जे आजही फार कठिण आहे.
२००४ नंतर आजपर्यंत एकदाही आंबा एक्सपोर्ट न करता इथल्याच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याला अवधूत जास्त महत्व देतो. तोडीपासून ते विक्रीपर्यंतची सारी प्रोसेस जातीने बघणारा अवधूत आपला व्यवसाय वृधिंगत करण्याचाही मनसुबा राखून आहे. ह्या धंद्यातल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अवधूतच्या मते - क्वालिटी प्रॉडक्ट, तत्पर सर्व्हिस पुरेशी आहे.
तसेच त्याच्या मते, चांगला आंबा मिळवण्यासाठीच्या आवश्यक बाबींवर व्यापारी लक्ष न देता फक्त विक्रीवरच लक्ष जास्त केंद्रीत करत असल्याने ग्राहकांना चांगली किंमत देऊनसुद्धा योग्य आंबा खाता येत नाही! ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी उत्पादित खर्च जास्त येत असल्याने बागायतदार या गोष्टीपासून दूर राहतात. आणि दलालामार्फत विक्री होत असल्याने त्यांना ग्राहकांचे घेणे देणे काही नसते. पण आम्ही स्वतः विक्री करत असल्याने ग्राहकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुरूवातीपासून ते आंबा विक्री होईपर्यंत स्वतः जातीने लक्ष देतो. त्यामुळे येणारा ग्राहक हा डोळे बंद करून आमच्या आंब्याला पसंती देतो. असा आंबा खाल्यानंतर ग्राहकाला इतरांपेक्षा वेगळ्या चवीची, दर्जेदार आंब्याची खात्री पटते. हीच आमची जमेची बाजू!

AK3.jpg

टीपः मराठी उद्योजक या ग्रूपमधला हा सार्वजनिक मजकूर आहे. या व्यतिरिक्त ग्रूपमधे इतर अनेक धागे आहेत जे फक्त सभासदांपूरते मर्यादित आहेत. http://www.maayboli.com/node/13459 या पानावर मराठी उद्योजक ग्रूपचे सभासद होण्यासंबंधी माहिती आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डुआय, चांगली माहिती दिलीस. आंबविक्री केवळ दोन, जास्तीत जास्त तीन महिने चालत असेल, त्यानंतर आंब्याचं कॅनिंग, इतर उत्पादने वगैरे काही जोडधंदे आहेत का यांचे?

आणि मराठी उद्योजकाबद्दल माहिती देणार्‍या लेखात सिझन, क्वालिटी प्रॉडक्ट, एक्स्पोर्ट, सर्व्हिस यांसारखे इंग्रजी शब्द टाळले पाहिजेत हे माझं मत. Happy

डु आय,

यू डू ऑर नॉट,
मी त्यांचे आंबे चाखले आहेत. सुरेख उपक्रम आहे त्यांचा.

छान लेख! आवडला!!

दिपक,चांगला लिहिलायस.

एक गोष्ट लक्षात येतेय कां?? अजुनही "भटाचं माश्यांच दुकान" सुरु होऊ शकतं आणि तेदिखिल तयार ग्राहकवर्गासहित!! ठाण्यातील होऊ घातलेल्या उद्योजकांपैकी कुणी ईच्छुक असेल तर चांगली संधी आहे. Happy

धन्स लोकहो Happy

भ्रमर, होय पण आता ती बाजारपेठ निव्वळ त्यांचीच रहिलेली नाही! संधी आहे हे नक्कीच.

मंजूडी, मत लक्षात घेतलं आहे.

शिल्पा, अमेरिकेत पाठवतील का? ते मी विचारून सांगेन. साधारण किती हवेत?

छान डुआय. Happy इथे उपस्थित केले गेलेले प्रश्न काळेंना विचारून उद्योजक ग्रूपसाठी छोटेखानी मुलाखत इथे टाकू शकतोस.

पुण्यात आंबा पाठवता येईल. कमीत कमी ऑर्डर ३ पेट्या / ६ डझन असावी.

डोंबिवली अ‍ॅड्रेस -'Dedhiya Niwas', Opp.Pitre Building, Near Nehru Maidan, Dombivli(e)

ठाणे अ‍ॅड्रेस - 'Uday Niwas' , Opp.Wamanrao Oak Blood Bank ,Near Ghantali Temple ,Thane(W)

मस्त माहिती. मंजूडीच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून भेटीचा साग्रसंगीत वृत्तांतच टाक नंतर.

डुआय, अमेरिकेत पाठवतात का ह्याचं उत्तर मलाही हवंय. उत्तरावर बाकीचे प्रश्न अवलंबून.

सायो, यूएसच सध्या कठिण आहे तरी सांगतो लवकरच. Happy

पुण्यात अन् नाशिकमध्ये आंबे मिळतील.

शैलजा, आंबा खराब असेल तर? बदलून देणार का? >> हो. एखादा आंबा खराब निघाल्यास रिप्लेसमेंट मिळेल.

रेव्यू, नाशिकमध्येही आंबे मिळतील. कमीत कमी ऑर्डर ३ पेट्या / ६ डझन असावी.

माबोच्या संपर्क सुविधेतून म्हणजेच duaaay@gmail.com ह्या इ मेलवर संपर्क साधा / ऑर्डर द्या.

मंजू,

कॅनिंग वगैरेच्या धंद्यात काळे नाहीत. सद्य परिस्थितीत तरी तसा विचार नाही! ह्याच मुख्य कारण अपुरं मनुष्यबळ!

आंब्याच्या मोसमात (सिझन) आंबे व आंबरसाबरोबरच इतर उत्पादने विकतात उदा. पापड, कुरडया, लोणची, मसाले, काजू, डाळीची पिठं इ. इ. आपण भेटू शनिवारी तेंव्हा सविस्तर सांगतो.

मणि, शनिवारी भेट की Happy

आणि अधिक आंबे खराब निघाले तर? कारण पुण्याहून आंब्यांची ऑर्डर दिली तर पाहून घ्यायचा ऑप्शन नसेल ना? पेटीमध्ये जे असतील तसे घ्यावे लागणार ना? म्हणून विचारते आहे.

शैलजा, शक्यतो आंबा खराब निघणार नाहीच अन् निघालाच तर बदलून द्यायची हमी आहेच. अधिक माहितीसाठी / ऑर्डर देण्यासाठी ह्या नंबरवर संपर्क साधा -

९८१९५९७१४५ - दीपक कुलकर्णी (डोंबिवली / ठाणे)
९८१९१६९२१८/ ९८१९४५८४०५/ ९८६७५६२८७३४ - अवधूत काळे (ठाणे)
९८१९४५८४०५ - आसावरी काळे (डोंबिवली)
९२२१३४४४५२ - योगेश (ठाणे)

उविकु, माबोवर स्वागत आहे Happy लवकरच परत भेटूया.

प्राजक्ता _ शिरीन, डोंबिवलीच्या दुकानात आंबा विक्री चालू झाली आहे. तुम्ही सध्या डोंबिवलीत आहात काय?

रेव्यु, फळागणिक, आकारागणिक भाव बदलत असतो Happy अधिक माहितीसाठी वर दिलेल्या फोनवर संपर्क साधा.

ध्वनी, होय. फोनवरही ऑर्डर घेता येते. तुम्हाला नक्की कुठे आंबा हवा आहे? हे सांगितल्यास बरे होईल.

दिपक कुलकर्णी यांनी अधिक माहिती आणि फोन दिला आहे. त्याहीपेक्षा अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा.