हॉटेल कॅलिफोर्नियातला किरवाणी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ईगल्स या रॉक ग्रुपानं गायल्या-वाजवलेल्या 'हॉटेल कॅलिफोर्निया' ह्या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या भारतीय संगीताशी असलेल्या साधर्म्याबद्दल एक भन्नाट दुवा मध्यंतरी सापडला. 'ध्वनि' या कृष्णा जानकीरामन यानं चालवलेल्या ब्लॉगावर त्यानं हॉटेल कॅलिफोर्नियातल्या आणि किरवाणीतल्या साधर्म्याबद्दल श्राव्य क्लिपेसह एक पोस्ट खरडलंय. कर्नाटक संगीतात आणि हिंदुस्तानी संगीतात प्रचलित असलेल्या या रागातल्या सुरावटी हॉटेल कॅलिफोर्नियातल्या गिटाराच्या स्वरांवर ओव्हरलॅप करून त्यानं दाखवलेलं प्रात्यक्षिक जरूर ऐकण्याजोगं आहे.

हॉटेल कॅलिफोर्निया (अकूस्टिक गिटार)
हॉटेल कॅलिफोर्निया (इलेक्ट्रिक गिटार)
किरवाणी (कर्नाटक संगीतातली क्लिप)
किरवाणी (हिंदुस्तानी संगीतातली क्लिप)

प्रकार: 

कर्नाटक संगीतातल्या किरवाणी रागातल्या अजून दोन सुश्राव्य क्लिपा सापडल्या :
ओ.एस. अरुण यांचा किरवाणी - १ - गायन आणि विवेचन
[video:"http://www.youtube.com/watch?v=J5G4gCiT6GM"]

ओ.एस. अरुण यांचा किरवाणी - २
[video:"http://www.youtube.com/watch?v=rBxVx-63bCI"]

या दोन्ही क्लिपांमध्ये ओ.एस. अरुणांनी कर्नाटक शैलीने गायलेला किरवाणी अगदी सुबोध पद्धतीने मांडलाय. Happy पहिल्या क्लिपेत साधारणतः दुसर्‍या मिनिटाच्या शेवटी त्यांनी गुलाम अलींच्या 'ऐ हुस्न बेपर्वाह् तुझे' या गझलेतला किरवाणीही उलगडून दाखवलाय. किरवाणीचा फिल्मी संगीतातला उपयोग विशद करताना त्यांनी इलय्याराजाचं 'कात्रिल् येंदन गीदम्' हे गाणं उल्लेखलंय. त्याच गाण्यावरून 'और एक प्रेम कहानी' या हिंदी चित्रपटात आशा भोसल्यांच्या आवाजातलं 'नैना बोले नैना' हे गाणं आलंय.

कात्रिल् येंदन गीदम् (तमिळ चित्रपट : जॉनी (१९८०); संगीत : इलय्याराजा; गायिका : एस्. जानकी)
[video:"http://www.youtube.com/watch?v=LXoGUB7l63w"]

नैना बोले नैना (हिंदी चित्रपट : और एक प्रेम कहानी (१९९६); संगीत : इलय्याराजा; गायिका : आशा भोसले) ** श्राव्यमात्र क्लिप **
[video:"http://www.youtube.com/watch?v=vfAayCsc2B0"]

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ, interesting माहिती. धन्यवाद. Happy

स्वाती, ध्वनिवरच्या त्या पोस्टीवरून ही रंजकता उलगडत गेली. खरंच अफलातून प्रात्यक्षिक मांडलंय त्यानं! Happy
त्या पोस्टीने डोक्यात किडा सोडून दिलाय. ओ.एस. अरुणांच्या वरच्या क्लिपांमधली 'ब्रह्मनोडू सेवी' ही रचना ऐकताना काल असाच डोक्यात दिवा पेटला - बाबूजींनी गायलेलं 'जो तो आपापला येथे कुणी ना आधार; मनाचिया घावावरी मनाची फुंकर' हे मराठी गाणंही अशाच सुरांमध्ये खेळतं.. हे गाणंही बहुधा किरवाणीतच असावं.

बरं, सध्या यूट्युबावर क्लिपा धुंडाळत-ऐकत असताना अजून एक कौतुकास्पद क्लिप आढळली - प्रशांत राधाकृष्णन् नामक सॅक्सोफोनिस्टानं सॅक्सोफोनावर कर्नाटक शैलीत किरवाणी उभा केलाय.. जबरी!

[video:"http://www.youtube.com/watch?v=y2BwXm0YkGI"]

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ, धन्यवाद. छानच माहिती आहे. हॉटेल कॅलिफोर्निया माझे आवडते गाणे आहे. संध्याकाळी घरी जाउन ऐकते सर्व Happy

किरवाणी तसा अरेबिक गाण्यात पण दिसतो. रुस्तम सोहराब या सिनेमातले लताचे, ए दिलरुबा नजरे मिला, हे अति अवघड चालीतले गाणे याच रागात आहे.
रफीचे, याद ना जाये, किशोरचे मेरी भिगी भिगीसी, तलतचे चल दिया कारवा, लताचे मेरा दिल ये पुकारे आजा, हि सगळी गाणी याच रागातली.
मराठीत, आकाश पांघरोनी हे सुमनचे गाणे आणि सुरसुख खनि तू विमला, हे नाट्यगीत या रागातले, याच नाट्यगीताच्या चालीवर, उषाने तू नसता मजसंगे वाट हि उन्हाची, असे भावगीत गायलेय, तेही याच रागातले. हि सगळी गाणी गुणगुणून बघा, राग खुप ओळखीचा वाटेल.

ईंट्रेस्टींग... छान माहीती दिलीत !

हॉटेल कॅलिफोर्निया ऑल टाईम फेवरेट Happy