कथा - कॉस्टयुम डिझायनर !!!!

Submitted by Dipti Joshi on 21 March, 2011 - 06:41

कॉस्टयुम डिझायनर !!!!!

सकाळी सकाळी विशाखा ताईंचा फोन आला, त्यावेळेस साडेनऊ झाले होते, म्हणाल्या "वहीनी, सुजाने कॉस्टयुम डिझाईन केलेला सिनेमा आज गोपी मॉलला रिलिज होतोय. मी पासेस आणले आहेत, तुला तीने आग्रहाच आमंत्रण केले आहे. ती कामासाठी बाहेर गेलीय. त्यामुळे तिला नाही येता येणार.....आणि चित्रपट सृष्टीतील बरीच मंडळी येणार आहेत म्हणे....पहील्या शो ला....!! हो कां!! मी पण एक्साईट झाले. पण तरी म्हटलं, "अहो काल कां नाही केलात फोन? आता कसं जमतय बघते." "अगं, इतकी कसली कामं, साडेबाराचा शो आहे, येत असशील तर तुमच्या कॉम्प्लेक्स वरुन घेते रिक्शा", "तसं नाही हो, माझे दोन प्रॉब्लेम आहेत......एक म्हणजे नवरात्रीतली अष्टमी आहे त्यामुळे गुरुजी येणार आहेत सप्तशतीचा पाठ वाचायला. त्यांना अकरा पर्यंत बोलावलय....पाठ दोन तास चालतो आणि दुसरं म्हणजे आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी साडेतीन वाजता नवरात्री निमित्त "नऊवारी साडी" स्पर्धा आहे......मी भाग तर घेतला आहेच, पण सगळ्या कार्यक्रमाच नियोजनही माझ्याकडे आहे.

"पाठाला त्या ’शेंडीवाल्या" श्री गुरुजीला सांगीतलय ना? तो ताईच्या नंणदेचा मुलगा.....मग काय काम असतं ग त्याला....रिकामाच तर असतो....लगेच फोन करुन लवकर यायला सांग", विशाखा ताईंच्या सुचना चालल्या होत्या. गुरुजींबद्दल केलेलं अस वक्तव्य मला अजिबात आवडल नाही....हे गुरुजी त्यांच्याकडे जायला तयार नसायचे ना म्हणुन वैयक्तीक आकसापोटी हे ताशेरे. "आणि नऊवारी साडीचच म्हणशील तर तु साडी नेसुनच निघ....आपण अगदी वेळेवर पोहोचु म्हणजे पटकन थिएटर मध्ये गेलं की कुणी नाही बघणार....आणि सोसायटीच्या मैत्रिणींना फोन करुन, तु साडे तीन पर्यंत येतेयस म्हणुन कळवुन टाक....पण तु ये ग......." त्यांनी त्यांच्याकडुन माझे सगळे प्रॉब्लेम्स सोडवले होते. आता इतक आग्रहाचं आमंत्रण नाही कसं म्हणणार? शिवाय डोळ्यासमोर चित्रपटातील मान्यवर मंडळीचे चेहेरे येत होते.....त्यामुळे वाटेल ती अडचण आली तरी जायचेच....हे नक्कीच ठरवले होते. आता हातातली कामं टाकुन मला हे सगळे फोन करायला हवे होते. पहीला फोन गुरुजींना लावला....त्यांनी लवकर यायला लगेचच हो म्हटल.....मला खुप विशेष वाटल.....एवढा डिप्लोमा इंजिनियर, पण मध्ये कंपनीत प्रॉब्लेम झाला नोकरी गेली, घाबरला नाही, सरळ पौरोहित्याचे शिक्षण घेतले आणि भिक्षुकी चालु केली. आमच्या सगळ्यांचाच तो "परमनंट गुरुजी" होता. नंतर ’मुन्नी’ला फोन लावला. ही ’मुन्नी’ म्हणजे आमची ’डोअर-स्टेप ब्युटीपार्लर’ वाली आमच्याकडे फुलके करणा-या भाभींची मुलगी. लग्नानंतर हा व्यवसाय सुरु केलेला.....ब्युटीपार्लरची सर्व्हीस घरी येऊन देणारी......फेशियल, हेअर मसाज, मेहेंदी....काय पाहीजे ते "अ‍ॅट यूअर डोअरस्टेप!!" आता ती एवढी तंदुरुस्त, तिचा ’आकारही’ एवढा मोठा तरीही तिचं नांव मुन्नी कां? मला आजपर्यंत न उलगडलेले कोडे...आमच्या घरात अगदी घरच्या सारखी वावरते.....तिला तेरा प्रकारच्या साड्या नेसवायला येतात, म्हणुन तिला बोलावल होत, नऊवारी साडी नेसवायला. आता तिच्याशी बोलायच म्हणजे तिच्या टिपेतल्या आवाजातल्या प्रश्नांना उत्तरं द्यायची...तरी लावला फोन..."मुन्नी, जरा दुसरा काम निकल आया है, तु तिन बजेके बदले बारा बजे आयेगी क्या?.....हा चलेगा!! तिन असं म्हटल आणि माझा जिव भांड्यात पडला. मनात एक विचार तरळला....तिथे ’फर्स्ट डे फर्स्ट शो ला’ सगळी मोठी मोठी मंडळी येणार....आणि मी काय हे ध्यानासारख नऊवारी नेसुन जायच....पण काही इलाजच नव्हता. कॉम्प्लेक्स मधल्या कार्यक्रमाच नियोजन, संकल्पना माझीच होती त्यामुळे गुगली देण शक्यच नव्हत, मग सोसायटीच्या मैत्रीणींनाही लगेचच निरोप देऊन टाकला. सगळी ’फिल्डींग’ बरोबर लागली.....मग विशाखा ताईंना फोन करुन येतेय म्हणुन सांगीतल.

केशरी रंगाच्या साडीला हिरव्या रंगाचे काठ आणि हिरवं ब्लॉउज. मुन्नीने झकास नेसवली साडी. वरती केसांचा खोपा....!! ऑंटी बहोत अच्छी लग रही हो आप"!! मुन्नीने तिच्या टिपेतल्या आवाजात कॉमेंट दिली. मी म्हटल, "कुछ भी"!! अस म्हणतेय तेवढयात विशाखा ताईंचा फोन..."खाली उतर, पाच मिनिटात येतेय कॉम्प्लेक्स पाशी" त्यांच्या ऑर्डर्स एकदम खणखणीत आवाजात असतात....वन्स ना!! बापरे साडीमुळे सॉलिड कॉन्शस व्हायला झालं होतं. मी पटपट नऊवारीवर घालायचे दागिने....ठुशी....मोहनमाळ.....नथ....खोप्यावर लावायचे फुल सगळं पर्स मध्ये घातलं, आम्ही दोघी खाली उतरलो तर समोरच रिक्शा आणली होती. नेहेमीच्या स्वत:च्या पायावर धोंडा पाडुन घ्यायच्या सवयीप्रमाणे मुन्नीला म्हटलं, तु पण वेस्टला रहाते ना चल गोपी मॉल पर्यंत.....त्याबद्दल विशाखा ताईंच्या चेहे-यावर उमटलेली नाराजी मी टिपली. मग अगडबंब देहाची मुन्नी, मी, विशाखा ताई आणि त्यांची छोटी नात...’ननू’ सुजाची मुलगी. अशी आमची वरात वेस्टला गोपी मॉलला निघाली. खुपच वेळेवर निघालो होतो, सिनेमा चालु होऊन जातो की काय याचं दडपण आलं होतं "श्रेयनामावली" बघायची होती ना....त्यामुळे रिक्शावाल्याच्या पाठीमागे दर पाच मिनिटांनी, "भय्या, जरा जोरात चालव रे.....तो ’भय्याच’ ना त्यामुळे तो त्याच्याच पद्धतीने चालवत होता....वर त्याच्या खास ’भय्या’ भाषेत ’डोंबिवलीच्या खडड्यांवर प्रवचन देत होता...."इह खड्डांसे कैसे स्पीडमें चलाउ रिकसा.... जानसे काहे को खेलना!!! आम्हाला "भिक नको पण कुत्रा आवर" या म्हणीच्या चालीवर "हळु चालव पण प्रवचन नको" असं झालं होतं. एकदाचा आला गोपी मॉल. विशाखा ताई ननू ला घेउन वरच्या मजल्यावर पळत निघाल्या. मी ही माझ्या नऊवारीला सांभाळत त्यांच्या मागे धावले. तिकिट काउंटरला पास जमा करुन तिकिट घ्यायची होती. आम्हा पुर्वेकडील मंडळीच पश्चीमेकडे येणं होत नाही,....त्यामुळे गोपी मॉल होऊन बरेच दिवस झाले होते, पण बघायचा योग मात्र आत्ता आला होता..... त्यामुळे थिएटरचा दरवाजा कुठे आहे समजतच नव्हते. तिथल्या सिक्युरिटीने आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही तिघीही धावतच लिफ्टमध्ये शिरलो....एन्ट्री गेट जवळ आलो.....गेटवरच्या माणसाला विचारले...."सुरु झाला का?"......तो पण बहुतेक ’भय्याच’ असावा, एक जांभाई देत म्हणाला...."हां, अभी शुरु हुआ है!! तिघीही लगबगीने पाय-या चढत होतो......अन समोरच स्क्रीनवर श्रेयनामावली झळकत होती......"वेषभूषा - सुजा सामंत", विशाखा ताई भान विसरुन जरा मोठया आवाजातच बोलल्या, "वहीनी, ते बघ सुजाच नांव" आम्ही अंधारात ते पडद्यावरच नांव वाचल आणि "याच साठी केला होता अट्टाहास!!" असे सुर मनात आळवत धप्पदिशी मिळेल त्या खुर्चीवर जाऊन आदळलो.....आता पुढच्या श्रेयनामावलीशी आमचं तस काही देणं घेणं नव्हत. सकाळची फोनाफोनी आणि धावपळ यामुळे दमायला झालं होतं......मग आम्ही आमच्या बॅग मध्ये काय काय खायला आणले होते त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली.....वेफर्स....बटाटा कचोरी.....आता आमची पिकनिक सुरु झाली होती. त्यात ननूची बडबड सुरु होती, "विशाखा आजी, हा मम्माचा पिक्चर नां ग, मग मम्मा दिसत नाही याच्यात कुठे??? ननूच्या तोंडात एक भले मोठे चॉकलेट देऊन तिचे तोंड बंद केले.....मस्त खाण्याचा सपाटा लावला होता.....मधुन मधुन सिनेमा पण बघत होतो. आता अंधाराला डोळे सरावले.....आजुबाजुच्या ब-याच खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. सगळी मान्यवर मंडळी बहुतेक पुढे बसली असतील. विशाखा ताईंचा क्लास चुडिदार....आणि माझी नऊवारी!!! बापरे!!! मनातल्या विचारांना बाजुला सारुन थोडं सिनेमावर लक्ष केंद्रीत केलं. लो बजेट सिनेमा दिसत होता......"कॉस्टयुम डिझाईन" नावाची गोष्ट काय होती समजतच नव्हते......सिनेमाची हिरॉईन सबंध सिनेमाभर सुजाच्याच दोन साडया नेसुन वावरतांना दिसत होती....."विशाखा ताई, या सुजाच्याच साडया दिसताय", मी त्यांच्या कानात कुजबुजले...."बहुतेक, तु बघ ग शांतपणे सिनेमा", त्यांना जरा फणकारा आल्यासारखा वाटला.बरीचशी खादाडी करत, चुळबुळ करत.....ननूने बडबड केली की तिच्या तोडांत चॉकलेट कोंबत, एकदाचा सिनेमा संपला....थिएटर मध्ये लाईट लागलेत........आणि काय आश्चर्य!!! थिएटरमध्ये इनमिन ’साडेचार’ व्यक्ती!!! "मी, विशाखा ताई, ननू (अर्धी), खुप अंतरावर पुढे.....सिनेमाची हिरॉईन आणि तिची आई. आम्ही दोघी तिला भेटायला गेलो, ती विशाखा ताईंशी छान बोलली, पण माझ्या अवताराकडे मात्र विचित्र नजरेने बघत होती...एखाद्या झुरळाकडे बघाव तसं....मला उगीचच माझ्या वॉर्डरोबमधले डिझाईनर चुडिदार आठवत होते, "छान झालय तुमच काम" असं म्हणत मी तिला हात मिळवायला गेले पण तिने शेकहॅन्ड केलाच नाही. जाऊदे गेली उडत, कुठे मोठी हिरॉईन वाया चाललीय....थिएटर तर रिकाम पडलय, तरी एवढा शिष्टपणा!! मनातले संवाद चालु होते.

बाहेर पडलो तर माझ्या नऊवारी साडीचा पार बोजवारा उडाला होता. सकाळपासुनची धावपळ आणि ते नऊवारीच बुजगावणं....आता मात्र डोळ्यात पाणी यायला लागलं होतं....इकडुन, तिकडुन सुटायला लागलेल्या साडीला आवरणं मुष्किल झालं होतं. "थांब, वहीनी, मी तुला सगळीकडुन निट पिना लाऊन देते." मग आम्ही कॅरिडॉर मधल्या एकांत असलेल्या भागात सटकलो. विशाखा ताईंनी सगळीकडे सेफ्टी पिना लावल्यात. आम्ही अवघडलेल्या अवस्थेत बिल्डिंग मध्ये पोहोचलो.....मी रिक्शातुन उतरले तर सगळ्या बायकांनी मला गराडा घातला, "अगं होतीस कुठे, तुझीच थीम आणि तु गायब? काय हे? तुझं नांव तीनदा पुकारुन झालय. जा लवकर स्टेजवर. पर्समधले सगळे दागिने पटपट अडकवले आणि मी स्टेजवर पोहोचले.....दहा मिनिटे तिथे काय गोंधळ घातला माहीत नाही पण परफॉरमन्स संपवुन स्टेजच्या खाली आले आणि मैत्रीणींना म्हटल, अगदी पंधरा मिनिटात घरी जाउन येते...घरी आले....इथे..तिथे टोचलेल्या सेफ्टी पिना काढल्या....फराफरा साडी काढुन फेकली. छान आंघोळ केली, डोक्यावरचा तो घट्ट खोपा सोडला. हलकासा मेक-अप केला. माझा आवडता ’लक्की’! पांढरा आणि बेबी पिंक कॉंबिनेशनचा चुडिदार घातला, केसांना दोन नाजुक हेअरक्लिप्स लाउन मोकळे सोडले, छानसा परफ्युम उडवला....गरम चहा घेऊन खाली उतरले. दिडशे स्पर्धक होते....स्पर्धा संपायला आली होती....निकाल यायला निदान एक तास लागणार होता.....मग बिल्डिंगचा भोंडला झाला. मी शांतपणे खुर्चीवर बसले होते. मान्यवरांच्या हातात निकाल आला होता. रोटरीच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा "राधिका सप्रे" याच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. आणि मग उत्कंठा वाढवत वाढवत त्यांनी पुरस्कार जाहीर केले......आजचा हा प्रथम पुरस्कार जाहीर होतोय...सौ........................बापरे!!! माझं नांव ऐकलं आणि आश्रर्याचा जबरदस्त धक्का बसला मला.....मान्यवर बोलत होत्या......"यांच्या नऊवारी साडीचं प्रेझेंन्टेशन म्हणजे.....’जुन्या आणि नव्या काळाचा संगम’ त्यांची साडी, दागिने, केसांची स्टाईल ही जुन्या पद्धतीची होती...पण त्यांचा स्टेजवरचा "वॉक"!!! तो मात्र नविन काळातला..........प्रत्येक पावलागणीक बदलणारे चेहे-याचे हावभाव!!!

मी जोरात डोक्याला हात लावला....मनात म्हटल....कप्पाळ माझं....अहो मॅडम......पायाजवळ लावलेली एक सेफ्टी पिन उघडली होती....आणि प्रत्येक पावलागणीक पोटरीला टोचत होती, त्यामुळे उगीचच तिरप पडणार पाउल......आणि प्रत्येकवेळी पिनेच्या टोचण्यामुळे होणारा त्रास आणि त्यामुळे चेहे-यावरचे बदलणारे भाव!!! शतश: धन्यवाद ग तुमच्या परिक्षणाला आणि तुमच्या नव्या जुन्याच्या फ्युजनला!!

पण तरीही, नऊवारी नेसुन सहजपणे काम करणा-या सासुबाई.......एखादी तरुण मुलगी जीन घालुन जितक्या सहजतेने वावरेल तितक्या सहजतेने वावरणा-या आत्येसासुबाई.....अन नऊवारी साडी नेसुन घोडयावर बसून हातात ढाल तलवार घेऊन लढाई करणारी झांशीची राणी!! आणि सगळ्यात....लाल जरी काठी....सोनेरी बुंदक्यांच नऊवारी नेसुन दहाही हातांमध्ये शस्त्रे घेउन, व्याघ्रावर बसुन जगाच रक्षण करणारी ती अंबामाता....आदीमाता!! सगळ्यांची आठवण झाली आणि मी त्यांना मनोमन वंदन केलं.

गुलमोहर: 

प्रतिसादांमधील अतिरेकी कडवटपणा अपरिपक्वता व दुराभिमान दाखवतो. वाटेतील खाचखळग्यांमध्ये घसरून न पडता पुढे चालत राहायला हवे असे मला वाटते. पब्लिक फोरममुळे अनेकांना आणखीन लिहायची इच्छा होते तर अनेकांना लेखन बंद करायची! या दोन्ही इच्छा बहुतांशी मिळालेल्या प्रतिसादांमुळेच होतात. कुणी लिहायला लागलेच आणि कोणत्यही कारणाने आपल्याला त्याचे लेखन आवडत नसलेच तर त्या माणसाला किती नाउमेद करायचे यावर पब्लिक फोरमची पॉलिसी नसतेच, तो शेवटी ज्याच्या त्याच्या स्वभावाचा व मॅच्युरिटीचा प्रश्न आहे.

-'बेफिकीर'!

(वर झालेल्या वादांनंतर मला व्यक्तीश: माझा हा प्रतिसाद अवांतर वाटत नाही. )

दिप्ती जोशी, असु दे हो. तुम्ही लिहित रहा. शिकतो माणूस त्यात काय. कोण कुठे आकाशातून पडत नाही सगळे घेवून. Happy

इथे आपला एक गट तयार करा.. मग मिळतील प्रतिसाद. नाहितर इथे मायबोलीवर टिपरीभर घरगुती कथा मिळतील(घरगुती स्वंयपाकाचे किस्से ते कल्पनिक स्वप्ने अश्या कथांची उदाहरणे हवी असतील तर मिळतील इथेच काहिंची) पण लिहिणार्‍यांचे गट असल्याने त्यांना एकट्यानेच असे "टप्पा टप्पा खेळायला" लागत नाही.;)

तुमचे सध्या नशीब खराब आहे समजून नवीन काहितरी लिहायला घ्या.

(वरती 'असु दे' हा आयडी बद्दल बोलत नाहीये.. नाहितर कोणीतरी पां. विनोद करतील सवयीनुसार. )

बेफिकिर ह्यांना अनुमोदन
दिप्ती
तुम्ही अत्यन्त प्रगल्भ लेखिका आहात! दुमत नाही...

मला एखादेवेळी वाटतं, कथा गुम्फणे "पाक" आहे... दरवेळेस उत्तमच जमावा असा अट्टहास नसावाच मुळी!

आणि दिप्ती, आपण लोकांचा कडवटपणा नाही कमी करु शकत, अशांना "दुर्लक्षित" ठेवलेलच बरं!
तुम्ही नकात त्रास करुन घेउ.....

पुले मनापासून शुभेच्छा...!!

(तुमच्यासारख्या उत्तम लेखिकेला उगाच असे अभिप्राय मिळालेत, पाहुन वाईट वाटलं)

दिप्ती,
अगं नीधपचं फारसं मनावर घेऊन नकोस. (आता ती मलापण झोडपेल बघ!)
तुझ्या कथा आम्हाला आवडतात.
लिखान चालु ठेव.
पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.

फारच कीस पाड्लाय ,एखाद्या शब्दाचे उच्चारण हे ज्या त्या माणसाच्या उपलब्ध माहितीवर अवलंबुन असते, वानगिदाखल bruscheta हा इटालियन पदार्थ ज्यांना माहित नाही ते ब्रुशेटा असे उच्चारतात, जाणकार ब्रुस्केटा असं उच्चारतात. हे केवळ एक उदा. झाले, असे अनेक शब्द असतात्,सो त्याचा इतका बाऊ करण्याची काहीच गरज नाही. आक्षेप नोंदवताना समोरच्याला माहिती करुन देणे हा उद्देश असावा, त्या माणसाची जाण किती कमी आहे हे दाखवुन द्यायचे काहीच प्रयोजन नाही .

दिप्ती , तुम्ही छान लिहिता .कटु प्रतिसादाकडे फार ल़क्ष देऊ नका.मी मायबोली वर नियमित येत असते .पण कधी प्रतिसाद देत नाही.आज अगदीच रहावले नाहि म्हणुन्.पुलेशु.

कथा आवडली. हि खर तर कथा नसुन एक विनोदी ललीत आहे.
तुम्हाला एक सल्ला देते दिप्ती ताई, माबोवर पहीले येवुन वेगवेगळ्या बाफ वर जाउन आपला एक कंपु तयार करायचा. वाहते पान, हितगुज, पाककृती, असल्या वाष्फळ बाफ वर पहिले जाउन रिकामटेकड्या गप्पा मारायच्या. मित्रमैत्रिणी गोळा करायच्या. झालच तर त्याम्ना प्रत्यक्ष भेटायचे, अजुन मैत्री वृद्धिंगत करायचीं. मग बघा प्रतिसादांचा पाउस पडतो कि नाही ते. हो आता हे करण्यासाठी तुमच्याकडे भरपुर रिकामा वेळ हवा हि गोष्ट वेगळी.

मी तर माबोवर आजकाल फक्त प्रतिसादच वाचतो. जास्त करमणुक होते आणी लेख वाचायची गरजच भासत नाही. >>>>>>>>>
मायबोली च मुक्तपीठ व्हायला लागलय का आता??????

मायबोली च मुक्तपीठ व्हायला लागलय का आता?????? >>>

आता ? पुर्वी नव्हते असे वाटते का तुम्हाला ?

असो.

नवीन शब्द मिळाला काल - कॉश्च्युम , कॉस्टयुम आणी कॉस्चुम - तीन झालेत. अजुन कोणाला माहित आहे का ?

काही म्ह्ण्जे काहीही...आम्ही इथे मोन्ट्रेअल(Montreal is kind of fashion industry of Canada ) मधे तरी कोस्ट्युम(ला कोस्त्युम/ले कोस्त्युम) असेच बोलतो..आम्चे डिझाइन डिरेक्टर पन आणि Business Analyst पण..आता मी त्या industry मधे आहे का? तर to some extent हो..Virtual Mannequin i guess is related to Fashion Industry..
रच्याक्..दिप्ति कथा आवडली..पुलेशु..

छान deeps . Add करतो. Proud

कॉश्च्युम , कॉस्टयुम , कॉस्चुम आणी कोस्त्युम Proud

कथा ठीक आहे. अशा बर्‍याच कथा असतात माबोवर..
प्रतिक्रिया मात्र महान Happy

एखाद्या कथेत एखादा खेडुत (किंवा अशिक्षीत किंवा तत्सम) कुणीतरी " या डॉक्टरला काय कळतंय? अमक्याच्या आशिर्वादाने फरक पडेल" असल्या अर्थाचे वाक्य बोलला तर समस्त (माबोकर) डॉक्टर त्यावरुन कथालेखिकेची अक्कल काढत नाहीत किंवा कथानायिका कसली मठ्ठ आहे म्हणत नाहीत. नेहमी काय सर्व विषयांवर तज्ञ असणारी पात्रं असतात काय कथेत? इनफॅक्ट कथेतल्या पात्राला मिनिमम किती विद्वान असावे/कुठल्याही विषयाची कितपत माहिती असावी असा काही नियम ही नाही. उदा. माझ्या कथेतल्या नायकाला प्रोग्रॅमिंग ची काहीही माहिती नसल्याने तो उगाच काहीही तारे तोडत असेल (ते पात्रच तसे असेल), पण याचा अर्थ असा नाही की मला प्रोग्रॅमिंग कळत नाही (मी कथा लिहित नाही, ही वेगळी गोष्ट).

अजून एक, कुठल्याही शब्दाचा करेक्ट उच्चार काय आहे हे कुणीतरी सांगू शकतो. पण जगात कुठेही केला जात नाही हे कसे कळले? Uhoh
बरेच भारतीय volkswagon ला वोल्क्सवॅगन म्हणतात, जर्मन लोक फोक्सवॅगन म्हणतात, जपानी काहीतरी अगम्य उच्चार करतात.असो.

costume शब्दाचा बरोबर (पण अमेरिकन) उच्चार ऐकण्यासाठी खालील लिंक बघा:
http://www.macmillandictionary.com/pronunciation/american/costume

दिप्ती, तुझी (एकदम अगं-तुगं वर आलेय) शैली आवडली. ओघ आहे, जे काही लिहिलय त्याला. कथा-बीज म्हणून इतकं इवलं आहे... तरीही तुझी शैली आवडलीच.
लिही गं. लिहिती रहा. इथे आलेल्या प्रतिक्रियांमधून शिकण्यासारखं तितकं घेता आलं की जिंकलोच... आणि तुझी तीच वृत्ती दिसतेय.
पुढल्या लेखांची वाट बघते. खूप शुभेच्छा.

उच्चार चुकीचा म्हणजे काय असते नेमकी?

जगातील विभिन्न प्रांतातील लोकं इंग्रजी शब्दांचा वेगवेगळा उच्चार करतात. जपानी, चिनी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, इटालियन, अरब वगैरे. अनेक देश, अनेक भाषा आणि त्याप्रमाणे त्यांचे इंग्रजी शब्दोच्चार वेगवेगळे आहेत.

education ह्या शब्दाचा उच्चार एज्युकेशन असा न करता 'एडुकेशन' असा देखिल अनेक तरुण socalled convent educated मुले करतात.

अमेरिकेत schedule (शेड्युल) चा उच्चार स्केडयुल असा देखिल करतात. अशी अनंत उदाहरणे आहेत.

इटालियन, अरब लोकांना 'ट' 'ड' हे उच्चार माहीत नाहीत त्यामुळे ते 'ट' ला 'त' म्हणतात.
अरबांना 'व' पण माहीत नाही, त्यामुळे ते वर्षाला 'बर्शा' म्हणतात. Happy

बा द वे 'नताशा एक फूल' तुमची सर्व पोस्टच एकदम बरोबर , सहीच आहे Wink

चिमण चा एक लेख होता 'उच्चारांवर' , एकदम सही होता तो.

आता सहज ही चर्चा वाचली. मी कॉस्टूम, कास्टूम असा उच्चार ऐकला आहे. तसच कॉस्चूम, कॉस्च्यूम असंही ऐकलं आहे. हे merriam-webster चं स्पष्टिकरण बघा.

1cos·tume noun
\ˈkäs-ˌtüm, -ˌtyüm also -təm or -ˌchüm\

जेव्हा कॉस्टूम म्हणतात तेव्हा त्या ट वर जास्त जोर देत नाहीत आणि काहीसा ओझरताच म्हणतात "स्टूम".
सॉरी वर्षा, तुमची पोस्टं मी लिहीत असतानाच आली.

साधी सरळ कथा आहे की. त्यावर एवढे वाद होण्याचं खरंतर कारणच दिसत नाहीये. लेखिकेने एक छोटा अनुभव फुलवून लिहिलाय. काही टेक्निकल गोष्टी चुकल्याही असतील - असोत बापड्या.

उच्चार तर जगभर कधीही एकसारखे मिळणार नाहीतच.

रच्याकने : एक उच्चारावरून किस्सा आठवला तो सांगते.
आमचे एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले मेंबर होते. ते आमच्या उच्चभ्रू चेअरमनशी बोलायला लागले की माझा बॉस म्हणायचा. "I am sure, both of them are not understanding what the other is speaking because both of them are talking in English." Happy

'कॉस्ट्युम' हा शब्द चुकिचा नक्किच नाही. असा उच्चार अगदी नक्कीच करतात.
जगात कुठेच असा उच्चार करत नाही असं म्हणणं म्हणजे अगदीच कुपमंडूक मनोवॄत्तीच्गे उदा आहे. इग्नोरन्स चे लिमीट आहे.

माझ्यामते ते कॉश्च्यूम की कॉस्ट्यूम हे आता सोडून द्यायला पाहिजे.

नीधप यांनी नंतर अवाक्षर लिहीलेले नाही आहे.

कथा वाचावी व प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा मी व्यक्त करणे हा 'कदाचित' विनोद वाटू शकेल.

-'बेफिकीर'!

कथेचा मूळ विषय अगदी बारकुसा आहे . लघुकथा चालली असती. कथेला पूरक नसलेले बारकावे कितितरी आहेत. शिवाय शुद्धलेखन , अवतरण चिन्हे यांच्याकडे दुर्लक्ष झालेय. ... चा (एलिप्सिस) अति अन गैरवापर. वाचताना अडखळायला होतंय त्याने.

शिवाय आजपर्यंतच्या सगळ्या लेखनात नायिका तेव्हडी सोज्वळ, हुशार, कर्तव्य तत्पर, वगैरे सूर आहे तोही यात आहेच. एकाच साच्यातल्या कथा वाचून वाचून कंटा़ळा आला.

उच्चाराचं फारच स्तोम माजवलेलं दिसतंय. आता कित्येक उच्चार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कोणी ट्यूसडे म्हणतं तर कोणी च्यूसडे. कोणी शेड्यूल म्हणतात तर कोणी स्केड्यूल. त्यापेक्षा कथा तिच्या मेरीटवर तपासाना. असो. काही जणांना मायबोली अ‍ॅडमिनकडून इतरांच्या लिखाणाला मनसोक्त झोडपायचं लायसन्स मिळालं आहे याची इथले काही प्रतिसाद वाचल्यावर पुन्हा एकदा खात्री पटली.

>>प्रतिसादांमधील अतिरेकी कडवटपणा अपरिपक्वता व दुराभिमान दाखवतो. वाटेतील खाचखळग्यांमध्ये घसरून न पडता पुढे चालत राहायला हवे असे मला वाटते. पब्लिक फोरममुळे अनेकांना आणखीन लिहायची इच्छा होते तर अनेकांना लेखन बंद करायची! या दोन्ही इच्छा बहुतांशी मिळालेल्या प्रतिसादांमुळेच होतात. कुणी लिहायला लागलेच आणि कोणत्यही कारणाने आपल्याला त्याचे लेखन आवडत नसलेच तर त्या माणसाला किती नाउमेद करायचे यावर पब्लिक फोरमची पॉलिसी नसतेच, तो शेवटी ज्याच्या त्याच्या स्वभावाचा व मॅच्युरिटीचा प्रश्न आहे. --

खुप छान लिहिले आहे बेफिकीर यांनी.
बाकी कथा/किस्सा आवडला.

dipti tai,

Anubhav bara mandala ahes,
Var je kahi war challay tuzya choooootyashya kathewarun, tyawarunach samajatay tuzya anubhav rupi kathela mahatva kiti ahe.... Aso me lihit nahi Ma Bo var, fakta wachate tyamule lihinyasarakh uttam kam karanarya konalahi salla dyayachi mazi layaki nahi...

tarihi comments wachun konihi khachun jaiien mhanun eawadhach mhanate,,,Naumed hou nakos,

Pudhil likhanasathi anek shubhecha...

Priya Tikakar,

Nirthak bhuta-khetanchya tantrik mantrik amanavi shakti wagere peksha ha anubhav kadhi hi bara,
Kahi lok ashya avirbhavat ahet ki Dipti ne ethe yeun chuk keli, asha ek ek comments ahet, aso Ma Bo warchi pratyek katha uttamach ahe ka? mag etakya tokachya tika ka?

Bahutek pahili tika karanaryach katha wchatanacha mood kahi jast changala navhata... Proud

eka comment rupi shankech nirsan, passes related,
maze one of the relative invertor supplier ahe, tyane jar natak, cinema, live shows related kontyahi vyaktishi deal kel ki tyala related shows che passes milatat... pass milane hi kahi faar awaghad gosht nahi...

Ani shewati jara dyan pajalate...... sorry mhanate adhich tyasathi... Happy

Ghetala tar tichya anubhav roopi kathecha arth khup chaan ahe, Nayika savata costume Designer hoti ardhya kathet, Nauwari ha ticha costume hou shakato... ti nauwarit wavarali te hi mall madhe, ti sambhaltana tichi zaleli fajiti, tyatun tine kadhalela pahila number ani shewatachya para madhe nauwari ghalun lilaya wavaranarya junya kalatalya striyanna tine thokalela salam, ha ashay nighu shakato, pan katha tyamule uttam ahe asahi hot nahi, kinwa agadi waya hi nahi...

Pages