डेली सोप

Submitted by UlhasBhide on 5 April, 2011 - 01:13

डेली सोप

अदृष्य लेखक,
अज्ञात कथा…
आपण,
साधायचा संवाद
परिस्थितीच्या विसंवादाशी;
आपल्या अर्ध्या-मुर्ध्या पटकथेतून.
...…बेअरिंग सांभाळत,
वठवायची
पदरी पडलेली भूमिका.......
आणि इच्छेने, ईर्षेने
वा अनिच्छेने
सुरू ठेवायचे
एपिसोड मागून एपिसोड…..
चॅनेलकडून ’बंद’ चा आदेश येईपर्यंत.

.... उल्हास भिडे (४-४-२०११)

गुलमोहर: 

सुंदर विचार....!

खूपच आवडली (काहीशी 'प्रेडिक्टेबल' होते सुरुवातीच्या काही ओळींनंतर, पण तरीही,
खूप छान कविता आहे !)

अधांतरी दरबार !
त्यापेक्षा फक्त ५२ भागांतून आधीच्या लोकांनी कित्ती जास्त आनंद दिला !
तसं काहीतरी बंधन हवंच होतं.

उल्हासजी,
'डेली सोप' वाचून मन अंतर्मुख झाले. प्रतीकात्मक परिस्थितीचे यथार्थ वर्णन. आपल्या या रचनेनंतर
म्हणावे वाटले कि...
" मागे तरी काय उरते नावापुरती कथा कि कथेपुरते नाव
नावासाठी हसत हसत झेलावे लागतात वर्मावारचे घाव "

खरच काका, ती ई टीव्ही वर 'चार दिवस सासुचे' 'या गोजिरवाण्या घरात' या मालिका तर संपायचच नाव घेत नाहीयायत... छान झाली कविता Happy Happy