लक्ष्मीचा मुखवटा

Submitted by अवल on 29 March, 2011 - 07:10

9.jpg
मागच्या आठवड्यात माझ्या भाच्याचे लग्न झाले. त्याच्या लक्ष्मी पूजनासाठी तयार केलेल्या शाडूच्या मातीच्या मुखवट्याची घडण .

१. चौकोनी फळीवर लाकडाचा चौकोनी ठोकळा बसवला. अन त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून त्यावर शाडूची माती चेहर्‍याच्या आकारात लावली.
1_3.jpg

२. त्यावर कपाळाची पट्टी तयार केली. अन डोळे, कान, नाक, ओठ यांच्या जागा निश्चित केल्या.
2_2.jpg

३. आता भुवयां तयार करून चिकटवल्या.
3_3.jpg

४. डोळ्यांसाठी बदामाचे आकार चिकटवले अन मग त्यांना पापण्यांनी झाकले.
4_1.jpg

५. आता नाकाचा त्रिकोण चिकटवला अन त्याला आकार दिला.
6_1.jpg

६. मग ओठ, कान, केस, मुकुट तयार केले. भुवया, केस यांना टेक्श्चर दिले. बेसीक मुखवटा तयार झाला.
7_0.jpg

७. या मुखवट्याला पूर्ण रात्र सुकू दिले. अन मग दुसर्‍या दिवशी त्याला रंगवले.
8.jpg

८. अन मग त्याला थोडे सजवले.
9.jpg

हा मुखवटा सुपात तांदूळ ठेउन मग त्याची पुजा करायची असल्याने तो उभा न करता त्याचा बेस आडवा केला होता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगला झालाय. नाक छान झालंय. Happy
डोळे आणि ओठ हे फीचर्स थोडे बदलले असते तर चेहरा अजून feminine दिसला असता असं वाटतं.

Pages