लक्ष्मीचा मुखवटा

Submitted by अवल on 29 March, 2011 - 07:10

9.jpg
मागच्या आठवड्यात माझ्या भाच्याचे लग्न झाले. त्याच्या लक्ष्मी पूजनासाठी तयार केलेल्या शाडूच्या मातीच्या मुखवट्याची घडण .

१. चौकोनी फळीवर लाकडाचा चौकोनी ठोकळा बसवला. अन त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून त्यावर शाडूची माती चेहर्‍याच्या आकारात लावली.
1_3.jpg

२. त्यावर कपाळाची पट्टी तयार केली. अन डोळे, कान, नाक, ओठ यांच्या जागा निश्चित केल्या.
2_2.jpg

३. आता भुवयां तयार करून चिकटवल्या.
3_3.jpg

४. डोळ्यांसाठी बदामाचे आकार चिकटवले अन मग त्यांना पापण्यांनी झाकले.
4_1.jpg

५. आता नाकाचा त्रिकोण चिकटवला अन त्याला आकार दिला.
6_1.jpg

६. मग ओठ, कान, केस, मुकुट तयार केले. भुवया, केस यांना टेक्श्चर दिले. बेसीक मुखवटा तयार झाला.
7_0.jpg

७. या मुखवट्याला पूर्ण रात्र सुकू दिले. अन मग दुसर्‍या दिवशी त्याला रंगवले.
8.jpg

८. अन मग त्याला थोडे सजवले.
9.jpg

हा मुखवटा सुपात तांदूळ ठेउन मग त्याची पुजा करायची असल्याने तो उभा न करता त्याचा बेस आडवा केला होता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर Happy

पण लालूला अनुमोदन. तसेच बुब्बुळांच्या खाली डोळ्यांचा पांढरा रंग राहू दिला नसतास (म्हणजे बुब्बुळं खालच्या पापणीच्या रेघेला टेकलेली किंवा किंचित खाली झाकलेली दाखवली असतीस तर थोडे प्रेमळ भाव दाखवता आले असते. नाकात लाल चांदण्यांऐवजी खोटी नथ लावली असतीस तर अजून मस्त वाटले असते. बाकी नाक, चिकबोन्स वगैरे झक्कास.

ओठ विलग दाखवल्याने काहीतरी बोलतेय असं वाटतं Happy

छान

धन्यवाद !
अश्विनी, पुढच्यावेळे साठी तुझी, लालूची टिप नक्की लक्षात ठेवेन , धन्स Happy

मस्त Happy

Pages