Submitted by ठमादेवी on 29 March, 2011 - 03:46
गुरू बंकेईला एका विद्यार्थ्याने विचारलं, माझ्यातला क्रोध जाण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.
गुरू म्हणाला, दाखव बरं कुठे आहे तुझा तो क्रोध...
विद्यार्थी म्हणाला,,, आत्ता नाहीये तो माझ्याजवळ... मग कसा दाखवू?
गुरू- तो जेव्हा तुझ्यात येईल ना तेव्हा दाखव
विद्यार्थी- तेही नाही जमायचं.... कारण इथे येईपर्यंत तो अदृश्यच होईल...
गुरू- म्हणजे? हा क्रोध तुझ्या प्रकृतीचा अंश नक्कीच नाही. बाहेरून येऊन तो तुझ्यात घुसतो आणि तुला छळतो... पण यावर मी तुला एक छान उपाय सांगतो... तो येईल तेव्हा एक काठी घेऊन स्वत:ला चांगलं झोडपून घे... हा आगंतुक क्रोध मार न सोसून नक्कीच पळून जाईल...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम कथा
उत्तम कथा
खरे आहे.. पण क्रोध हा आगंतुक
खरे आहे..
पण क्रोध हा आगंतुक आपल्यात कधी घुसतो ते कळतच नाही
चांगली आहे
चांगली आहे
छान कथा. कोमल अग मागच्या लिंक
छान कथा.
कोमल अग मागच्या लिंक पण टाकत जा लेखनात.
बुक्क्यांचा मार. सर्वोत्तम
बुक्क्यांचा मार.
सर्वोत्तम कथा.
जागू विसरले... टाकते...
जागू विसरले... टाकते...
ठमे, हा उपाय आपल्या
ठमे, हा उपाय आपल्या सगळ्यांनाच करावा लागणार बहुतेक !!
दिनेशदा...
दिनेशदा...
आवडली.
आवडली.
उपाय खरच भारी... चुकुन
उपाय खरच भारी... चुकुन लेकाने वाचले तर लगेच मला दाखवेल
कोमल, तु स्वतः रोज कितीवेळा
कोमल, तु स्वतः रोज कितीवेळा स्वतःच्या बुक्यांचा मार खाशील?
वर्षे तो तुलाच मारेल, तुझा
वर्षे तो तुलाच मारेल, तुझा शिष्य आहे ना... :p
ठमे हि ठिक आहे..
नितीन, मोजता येणार नाहीत...
नितीन, मोजता येणार नाहीत... कदाचित किमान एकदा....
छान
छान
मला वाटले... "झेन कथा, १२
मला वाटले... "झेन कथा, १२ उपाय"
आनंद
आनंद
छान आहे कथा ठमे.
छान आहे कथा ठमे.
(No subject)
मला काही खास लोकांचा राग
मला काही खास लोकांचा राग घालवायला आवडेल या पद्धतीने
छान
छान
कोमुतै, रामबाण उपाय आहे
कोमुतै, रामबाण उपाय आहे
दुसर्यावर प्रयोग करायला जास्त आवडेल.
बाबुवा, तूही स्वतःला खासच रे!
बाबुवा, तूही स्वतःला खासच रे!
(No subject)
आवडली
आवडली
व्वा ! याला म्हणतात "सलाम
व्वा ! याला म्हणतात "सलाम करावा" असे वाटणारी बोधकथा. जी गोष्ट दोन हजार पानाचे ग्रंथ वाचून समजणार नाही, ती गोष्ट वरील दोनच वाक्ये करून दाखवितात. सर्वच थरातील व्यक्तींनी जाणीवपूर्वक अंगिकारावी अशी शिकवण गुरू बंकेई यानी दिली आहे.
धन्यवाद ताई.
छान कथा. मला रागच येत
छान कथा. मला रागच येत नसल्याने हा उपाय करावा लागणार नाही.
एक शंका...
राग येणे इतके वाईट असतानाही आपल्या पुराणांमधे श्रेष्ठ गणाल्या गेलेल्या बर्याच रुषी मुनींनी वारंवार धिंगाणा घातल्याचा उल्लेख येतो. कुणावर पाणी फेक... कुणाच्या चेहर्यावर खड्डे पाड... देव तर सारखे कुणाला ना कुणाला तरी शाप देत फिरतात. "राग वाईट्ट अशीतो" असे सांगणार्यांनाच रागवायचा अधिकार असावा काय?