झेन कथा १२ उपाय

Submitted by ठमादेवी on 29 March, 2011 - 03:46

गुरू बंकेईला एका विद्यार्थ्याने विचारलं, माझ्यातला क्रोध जाण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा.

गुरू म्हणाला, दाखव बरं कुठे आहे तुझा तो क्रोध...

विद्यार्थी म्हणाला,,, आत्ता नाहीये तो माझ्याजवळ... मग कसा दाखवू?

गुरू- तो जेव्हा तुझ्यात येईल ना तेव्हा दाखव

विद्यार्थी- तेही नाही जमायचं.... कारण इथे येईपर्यंत तो अदृश्यच होईल...

गुरू- म्हणजे? हा क्रोध तुझ्या प्रकृतीचा अंश नक्कीच नाही. बाहेरून येऊन तो तुझ्यात घुसतो आणि तुला छळतो... पण यावर मी तुला एक छान उपाय सांगतो... तो येईल तेव्हा एक काठी घेऊन स्वत:ला चांगलं झोडपून घे... हा आगंतुक क्रोध मार न सोसून नक्कीच पळून जाईल...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आनंद Rofl

व्वा ! याला म्हणतात "सलाम करावा" असे वाटणारी बोधकथा. जी गोष्ट दोन हजार पानाचे ग्रंथ वाचून समजणार नाही, ती गोष्ट वरील दोनच वाक्ये करून दाखवितात. सर्वच थरातील व्यक्तींनी जाणीवपूर्वक अंगिकारावी अशी शिकवण गुरू बंकेई यानी दिली आहे.

धन्यवाद ताई.

छान कथा. मला रागच येत नसल्याने हा उपाय करावा लागणार नाही.

एक शंका...
राग येणे इतके वाईट असतानाही आपल्या पुराणांमधे श्रेष्ठ गणाल्या गेलेल्या बर्‍याच रुषी मुनींनी वारंवार धिंगाणा घातल्याचा उल्लेख येतो. कुणावर पाणी फेक... कुणाच्या चेहर्‍यावर खड्डे पाड... देव तर सारखे कुणाला ना कुणाला तरी शाप देत फिरतात. "राग वाईट्ट अशीतो" असे सांगणार्‍यांनाच रागवायचा अधिकार असावा काय?