Submitted by क्रांति on 23 March, 2011 - 14:04
केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !
देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !
तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !
जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !
कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !
खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !
गुलमोहर:
शेअर करा
खूपच मस्त !! तोंडावर
खूपच मस्त !!
तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !
आवडली.
आवडली.
मुद्द्लात तोटा झाला....सुंदर
मुद्द्लात तोटा झाला....सुंदर क्रांती
क्रांतिताई...... सॉलीड पंच
क्रांतिताई...... सॉलीड पंच
सुरेख.. लई भारी...
सुरेख.. लई भारी...
व्यापार हा शब्द वाचूनच
व्यापार हा शब्द वाचूनच विरोधभक्तीने (न्यूनगंडाने म्हणा) कविता पाहीली..
पण आइशप्पथ सांगतो जरा पण चूक नाही झाली. मस्त मस्त मस्त
खूप आवडली.
खूप आवडली.
>> खुळ्या मनाचं ऐकून दिलं
>> खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !>>
स्पेशल क्रांती टच. मस्त
अगं ही सत्या म्हणुन कुणीतरी स्वतःच्या नावाने टाकतोय! अॅडमीन लक्ष द्याल का प्लीज??
धन्यवाद मंडळी! [काही लोकांना
धन्यवाद मंडळी!
[काही लोकांना कविता इतकी आवडली की ती उचलण्याचा मोह नाही आवरला वाटतं!]
http://www.maayboli.com/node/24581 हे पहा!
क्या बात है... नेहेमीपेक्षा
क्या बात है... नेहेमीपेक्षा एकदम वेगळ्या बाजाची कविता क्रांती .. जियो !!!
त्या माणसाचा शोध घ्या रे
त्या माणसाचा शोध घ्या रे कोणीतरी.. आता रीप्लाय पण करत नाहीये चोरी करुनच्या करुन.. :-|
सत्याचे असत्य
सत्याचे असत्य
अप्रतीम....
अप्रतीम....
अॅडमिन आणि मित्रमंडळी शतशः
अॅडमिन आणि मित्रमंडळी शतशः धन्यवाद!
तुफान!! जबरदस्त क्रांति!!
तुफान!! जबरदस्त क्रांति!!
क्रांतिजी झक्कास कविता.....
क्रांतिजी झक्कास कविता.....
"केला सुखाचा व्यापार दु:ख
"केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !"
..... छान
नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीची कविता.
मस्त ग बायो
मस्त ग बायो
केला सुखाचा व्यापार दु:ख
केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !
व्वा क्या बात है....
खूप सुंदर कविता वाचली आज. बरं
खूप सुंदर कविता वाचली आज. बरं वाटलं.
खुपच छान....
खुपच छान....
खुळ्या मनाचं ऐकून दिलं आयुष्य
खुळ्या मनाचं ऐकून

दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला
वाह ! क्या बात है !