व्यापार

Submitted by सत्या on 24 March, 2011 - 07:58

ही कविता क्रांती यांची असल्याने हा धागा संपादीत केला आहे.

-अ‍ॅडमीन

गुलमोहर: 

चोराचं नशीब वाईट्ट. त्याने दुसरीकडे या कवितेचं अध्ययन केलं असणार, ती आत्मसात केली असणार आणि मुखोद्गत करून इथं म्हणून दाखवली असणार.. बिच्चा-यास काय माहीत मास्तरीण बाईंचा तास इथं पण असतो.

क्रान्तिसारख्या नामांकित आणि प्रतिभावंत कवयित्रीच्या कवितेची दिवसा ढवळ्या चोरी म्हणजे कमालच दिसतेय.
हा सत्या उर्फ सतिश कदम आहे तरी कोण?

येथे प्रतिसाद देण्याऐवजी प्रशासकांना सांगणे योग्य ठरेल का?

क्रान्ती,

तुम्ही आंतरजालाला उत्तम कवयित्री म्हणून ज्ञात आहात. या बाबींची काळजीच सोडून द्या. उलट हे झालं ही तुमच्या कवितेला सर्वात चांगली कॉम्प्लिमेन्ट म्हणावी लागेल.

अधिक उणे बोलले असल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफिकीरजी, अ‍ॅडमिनच्या विपूत लिहिलय मी. आत वाट पाहुया.

सत्यादादा, तु कापी करुन पास होणारा दिसतोस! एकदम सराईतच की रे.मानल गड्या.लयी झ्याक.
कापी टु कापी करणाराच्या *** **** **** (होळी स्पेशल आवाज करावा!)

बाप रे बाप..

मायबोली नगरीत चोरी ...?

गावकरी हो पंचायत बोलवा..... चोराला शिक्षा झालिच पाहिजे...

काय दिवस आले आहेत!!!
क्रांती.. चिल्ल माडी!! सत्याचं असत्य समजलंय..!

सत्या,

गुलमोहरमध्ये केवळ स्वतःचेच मराठीतील साहित्य लिहिणे अपेक्षीत आहे. तुम्ही नवीन सभासद दिसताय तसेच हा पहिलाच प्रकार असल्याने यावेळी फक्त वॉर्नीग देत आहे. पुन्हा असे घडलेले दिसले तर सदस्यत्व रद्द करण्यात येईल.

हा धागा प्रतिसादासाठी बंद करण्यात येत आहे.