मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीला (Molecular Gastronomy) योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा.

Submitted by अजय on 20 March, 2011 - 22:22

मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी (Molecular Gastronomy) ला मराठीत चांगला प्रतिशब्द नाही. रेण्विय पाककला हा खूप अवघड शास्त्रीय शब्द वाटतो ज्यामुळे याचा प्रसार होण्यासाठी मदत होणार नाही. झाली तर अडचणच होईल. आणि मुळात Molecular Gastronomy हा इंग्रजी शब्द योग्य आहे का याबद्दलही बरेच मतभेद आहेत.

तुम्हाला एखादा चांगला शब्द सुचतोय? या विषयात शास्त्र आणि कला या दोन्हीचाही संगम आहे. नुसती एक गोष्ट असून चालत नाही.
शास्त्रीय पाककला?
कलात्मक पाकशास्त्र?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> रेण्विय पाककला हा खूप अवघड शास्त्रीय शब्द वाटतो ज्यामुळे याचा प्रसार होण्यासाठी मदत होणार नाही. <<
मराठी भाषकांना विज्ञानाबद्दल भयगंड आहे, असा अपसमज करून घेऊन 'प्रायोगिक पाककला' असे चुकीचे शब्द प्रचारात आणायचे का ?

पाककला पेक्षा "पाकसिद्धी" हा शब्द जास्त बरोबर वाटेल का?

गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे - आर्ट अँड सायन्स ऑफ फूड - पाकसिद्धी ???

रेण्विय पाकसिद्धी???

रेणुविज्ञान पाककला???

रेणुज खाद्यसिद्धी???

Molecular Gastronomy हाच शब्द मुळात चुकीचा आहे हे यात काम करणार्‍या बर्‍याच जणांचे मत आहे. कारण यातल्या कुठल्या पाककृतीत रेण्वीय पातळीवर बदल होत नाहीत (आणि जेंव्हा होतात तेंव्हा त्यात इतर पाककृतींपेक्षा वेगळे काही नसते).
मग मुळातल्या चुकीच्या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधायचा कि भावार्थ लक्षात घेऊन जास्त चपखल शब्द शोधायचा?

यात वेगळं काय आहे तर नवीन पदार्थ, नवीन आकार, नवीन प्रक्रिया आणि त्यांच्या आंतरसंबंधातून केलेले नवीन प्रयोग.

आणि खरं तर नवीन प्रयोग आहेत का हा ही प्रश्नच आहेत. दिनेशदा यांनी दिलेल्या उदाहरणावरून असे दिसते की आपल्याकडे हे प्रयोग फार पूर्वीपासून चालू आहेत.

या प्रकारच्या पाकृंना 'मयखाना' म्हणता येईल का? मयसभा + खाना. मयसभेत जसे जे दिसायचे त्यापेक्षा वेगळेच असायचे.. तसेच आहे हे - हसवाफसवीचे पाकशास्त्र. Happy अ‍ॅक्च्युअली, हाही शब्द चपखल बसतोय की - हसवाफसवीचे पाकशास्त्र.

वेगळा ग्रूप झाला का, वा वा!

मामी Lol
'गॅस्ट्रॉनॉमी' ला डिक्शनरीत 'भोजनकला', 'मिष्टान्नशास्त्र' शब्द आहेत. 'रेण्वीय मिष्टान्नशास्त्र' Proud

खरं तर हे तंत्र आहे. मी मुलांना जादूच्या प्रयोगाचे किट मागवले आहे असे सांगितले होते.
'तांत्रिक पाकविद्या'

मुळातल्या चुकीच्या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधायचा कि भावार्थ लक्षात घेऊन जास्त चपखल शब्द शोधायचा?>>>>>>

या प्रश्नाचे, भावार्थ लक्षात घेऊन जास्त चपखल शब्द शोधायचा. हेच खरे उत्तर आहे.

म्हणूनच

"मूलगामी पाककला"

असा नवीनच अर्थवाही शब्द मला सुचवावासा वाटतो आहे.

मला नवान्न शब्द आवडला.
इथे तुम्ही लिहिलंय की गरीबांची भूक भागविण्यासाठी नविन प्रकारचे अपारंपारिक अन्न शोधण्याच्या प्रयत्नात हे मोलेक्युलर गॅस्त्रोनॉमीचे प्रकार पहिल्यांदा शोधण्यात आले,त्या दृष्टीकोनातूनही "नवान्न" शब्द योग्य वाटतोय.

"नैनो (nano) पाककला/पाकशास्त्र " द्या! नैनो हा शब्द आता जग्न्मान्य आहेच मराठी नसला म्हणुन काय झाले!

अपारंपारिक पाकसिद्धी / पाकशास्त्र
अकल्पित पाकसिद्धी / पाकशास्त्र
हे कसे वाटताहेत?