गझल सहयोगचा मुशायरा - वेदनेचा शौक - सस्नेह आमंत्रण

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2011 - 22:43
ठिकाण/पत्ता: 
छत्रे सभागृह, भरतकुंज वसाहत, गणेशनगर, पुणे (एरंडवणा विभागातील मेहेंदळे गॅरेजकडून नवसह्याद्रीकडे जायच्या रस्त्यावर उजवीकडे कर्नाटक हायस्कूलकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरील तिसर्‍या डाव्या गल्लीत हे सभागृह आहे.)

(सदर मुशायरा सायंकाळी पाच ते सायंकाळी आठ या वेळात आहे. काही कारणाने कदाचित वेळ वेगळी दिसत असू शकेल. )

(सर्वप्रथम मा. वेबमास्टर व श्री नंदन यांनी माझे पुणे ग्रूपला सदस्यत्व निर्माण करून हा धागाही माझ्या नावाने निर्माण केला यासाठी त्यांचे मनापासून खूप आभार! मी स्वतः प्रकाशित केलेला मूळ धागा मी आता अप्रकाशित करत आहे. याच निमित्ताने, ते दोघेही परदेशात असल्याची जाणीव असूनही प्रेमाने आमंत्रण करत आहे. इत वूड बी अवर ग्रेट प्लेझर टू हॅव देम हिअर!) (दुसरा मुद्दा - या निमित्ताने ' गझल सहयोगचा स्वरचित मराठी गझलचा मुशायरा' हा उपक्रमही मायबोलीचा एक उपक्रम झाला यासाठीही दोघांचे मनापासून आभार!)
=========================================================

गझल सहयोग, पुणे, आयोजीत करत आहे:

मराठी गझल मुशायरा : वेदनेचा शौक

===================================

कार्यक्रम पत्रिका:

पाच ते साडे पाच - बेफिकीर यांच्या एस एस एस व डिस्को या कादंबर्‍यांचे प्रकाशन

साडे पाच ते सहा - अल्पोपहार,चहा व पुस्तक विक्री

सहा ते सव्वा सहा - सहभागी गझलकारांचे व्यासपीठावर आगमन

सव्वा सहा ते सहा वीस - कवीवर्य सुरेश भटसाहेबांच्या एका गझल सादरीकरणाने मुशायर्‍याचा आरंभ

सहा वीस ते पावणे आठ - मराठी स्वरचित गझलांचा चक्री मुशायरा

==================================

चक्री मुशायर्‍यात सहभागी असलेले गझलकार

डॉ. अनंत ढवळे

श्री मिलिंद छत्रे

श्री अरुण कटारे

डॉ कैलास गायकवाड

श्री अजय जोशी

बेफिकीर

====================================

यावेळेसचा नवीन परिचयः

श्री सारंग भणगे

श्री विजय पाटील

===================================

गझल सहयोगच्या मुशायर्‍यांमध्ये कोणतेही भाषण, मानधन, औपचारिक समारंभ नसतात व कार्यक्रम वेळेवर सुरू होतो याची दखल घ्यावी. तसेच, गझल सहयोगचे गझल मुशायरे गझलकार व श्रोत्यांसाठी विनामूल्य असतात याचीही नोंद घ्यावी.

==================================

कार्यक्रमातील प्रवेश विनामूल्य आहे. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे. मात्र एक विनंती आहे. आपण येणार असल्याचे येथे जरूर कळवावेत. 'आपण येणार असल्याची नक्की माहिती आम्हाला असणे' हे या कार्यक्रमासाठी आवश्यक आहे.

======================================

गझल सहयोग संयोजक:

अजय जोशी व बेफिकीर

========================================

धन्यवाद

-'बेफिकीर'!

माहितीचा स्रोत: 
गझल सहयोग संयोजक: अजय जोशी व बेफिकीर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 19, 2011 - 17:00 to 20:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता इथे सगळे व्यवस्थित दिसू लागले आहे आणि जुना धागा अप्रकाशित झाला आहे !

कार्यक्रमाला जास्त नाव नोंदणी येण्यासाठी मायबोलीवरची एक युक्ती:
इथे अधून मधून प्रतिक्रिया येत राहिल्या तर कार्यक्रम वर दिसत राहिल. Happy

एक गोष्ट राहून गेली.

प्रकाशित होणार असलेल्या दोन्ही कादंबर्‍या प्रथम आंतरजालावर व मायबोलीवरच प्रकाशित झालेल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे असे साहित्य पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यास मायबोली प्रशासनाची हरकत नसते. मायबोली प्रशासन व वेबमास्टर यांचे मूळ प्रकाशनासाठी (मायबोलीवरील) व पुस्तक स्वरुपात प्रकाशन करण्यास हरकत नसण्यासाठीही आभार!

-'बेफिकीर'!

गझल सहयोगचा मुशायरा - वेदनेचा शौक - सस्नेह आमंत्रण
बेफिकीर | 14 March, 2011 - 08:13
तारीख/वेळ:
20 March, 2011 - 02:30 - 05:30
>>>
बेफिकीर, तुम्ही कार्यक्रमाची वेळ पाच ते आठ म्हणाताय पण वर काही वेगळीच वेळ आणि तारिख दिसतेय. जरा बघाल का?? Uhoh

कैलासराव,

वेळ मजकूरात ठळकपणे लिहीली आहे.

शुभांगी,

टाईम झोन कोणताच निवडलेला नाही मी! तशी काही प्रोव्हिजनच नाही आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर' !

(तसेच, शुभेच्छा देणार्‍यांचे मनापासून आभार! )

युक्तीने हा धागा पुन्हा वर आणलेला आहे. Happy

जे येणार आहेत त्यांचे नावनोंदणीसाठी आभार! इतरांनीही येऊन मुशायर्‍याची शोभा वाढवावी असे आग्रहपुर्वक आमंत्रण!

-'बेफिकीर'!

मी १९ ला ठाण्याला येतो आहे.
पण पुन्हा एकदा विचित्र आणि दुर्दैवी तारीख आणि वेळेचा योगायोग आला आहे.

पुण्याचा आणि ठाण्याचा - दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी आयोजित झाले आहेत.

त्यामुळे पुण्याला येणे शक्य होत नाहिये. Sad

गझल सहयोगचा मुशायरा - वेदनेचा शौक - सस्नेह आमंत्रण
बेफिकीर | 14 March, 2011 - 08:13
तारीख/वेळ:
20 March, 2011 - 02:30 - 05:30
ठिकाण/पत्ता:
छत्रे सभागृह, भरतकुंज वसाहत, गणेशनगर, पुणे (एरंडवणा विभागातील मेहेंदळे गॅरेजकडून नवसह्याद्रीकडे जायच्या रस्त्यावर उजवीकडे कर्नाटक हायस्कूलकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरील तिसर्‍या डाव्या गल्लीत हे सभागृह आहे.)
(सदर मुशायरा सायंकाळी पाच ते सायंकाळी आठ या वेळात आहे. काही कारणाने कदाचित वेळ वेगळी दिसत असू शकेल. )

मला पण असेच दिसतेय.

ज्यांना चुकीची वेळ दिसत असेल त्यांनी आपआपल्या व्यक्तिरेखेत जाऊन Default Timezone बरोबर लिहला आहे का त्याची खात्री करा. बरेच सभासद तो रकाना पूर्ण रिकामाच ठेवतात.
नसेल तर इतर सगळ्या माहितीप्रमाणे तुमचा तुम्हाला तो संपादीत करता येतो.

साठवताना एकच वेळ साठवली जाते पण दिसताना "जो जे Timezone, तो ते लाहो" प्रमाणे बदलून दिसतो. त्यामुळेच इथे प्रत्येकजण वेगळी वेळ दिसतेय असे म्हणत आहेत.

बेफिकीर आपल्या कादंबर्यां प्रकाशित होताहेत हे बघुन छान वाटलं, पेंढारकर आणि मॅडम या पण कादंबर्या लवकरच प्रकाशित होवोत..... शुभेच्छा....

हा मुशायरा व प्रकाशन समारंभ फार सुंदर पार पडले.

या प्रतिसादाच्या निमित्ताने पुण्याबाहेरून आलेल्या सर्व मायबोलीकरांचे व पुण्यातूनही आवर्जून वेळ काढून आलेल्या सर्व मायबोलीकरांचे मी मनापासून आभार मानतो.

या समारंभाची बातमी सकाळमध्ये आलेली आहे व त्या बातम्ची लिंक येथे:

http://72.78.249.107/Sakal/21Mar2011/Normal/PuneCity/Pune1Today/page7.htm

या पानावरील डाव्या बाजूला सर्वात खाली 'महिलांचे प्रश्न' या शीर्षकाखाली ही बातमी आहे.

तसेच, या धाग्याचे 'मायबोली कार्यक्रम'असे रुपांतर करणार्‍या वेबमास्टर व श्री नंदन यांचेही पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

(वृत्तांत मिलिंद उर्फ श्री भुंगा लिहिणार आहेत.)