एका पेक्षा एक - अप्सरा पर्व

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 01:00

झी मराठी वर एका पेक्षा एक चे "अप्सरा आली" सेलेब्रिटी चे पर्व सुरु झाले आहे. बर्‍याचशा डान्सर्स नृत्यकला शिकलेल्या वाटतात. त्यामुळे कार्यक्रम रंगतदार होणार यात शंकाच नाही. या पर्वावर चर्चा इथे करु या. Happy

या पर्वातल्या ९ सहभागी:
१) सुरेखा पुणेकर (प्रसिद्ध लावणी नृत्यांगना)
२) उर्मिला कानिटकर (असंभव ची शुभ्रा)
३) गिरिजा ओक (लज्जा ची मनु)
४) आरती सोळंकी (फू बाई फू फेम)
५) स्मिता तांबे (अनुबंध ची किटी)
६) नेहा पेंडसे (भाग्यलक्ष्मी ची काशी)
७) मृण्मयी देशपांडे (कुंकू ची जानकी)
८) नेहा जोशी (अवघाची हा संसार मध्ये प्रसाद ओक ची बहिण म्हणून काम केले होते हिने)
९) सोनाली खरे (चेकमेट मध्ये अंकुश चौधरी ची हीरॉईन होती.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हम "जाडे" हे तो क्या हुआ "पोट वाले" हे

अवांतर: काल मयुरी वैद्य आणि गीरीजाची मिठी अमळ लांबली होती असे नाही का वाटत कुणाला ?

>>काल कोणती अप्सरा बाद झाली?
दि ग्रेट आरती सोळंकी :)..... मुळात ती इथेपर्यंत कशी आली हाच प्रश्न आहे!

आता पुढच्या भागात गिरिजा जाईल... आणि महाअंतिम फेरीला उर्मिला, मृण्मयी आणि मृणाल रहातील!
विजेती अर्थातच उर्मिला Happy

ते पंचमहाभूत प्रकरण बंडल होतं. Sad

उगीच आपलं ५ जणी आहेत म्हणून पंचमहाभूतांना वेठी ला धरायचं. त्यातलं आरतीचं "झेंडा" वालं गाणं कोणत्या पंचमहाभूतासाठी होतं काय कळलं नाय ब्वा! Uhoh

आता पुढच्या भागात गिरिजा जाईल... आणि महाअंतिम फेरीला उर्मिला, मृण्मयी आणि मृणाल रहातील!
विजेती अर्थातच उर्मिला
>>>
सध्या झी वर ज्यांच्या मालिकांचा टीआरपी चांगला आहे त्याच जिंकतील... सहाजिकच, मृणाल / मृण्मयी किंवा गिरिजा.

ते पंचमहाभूत प्रकरण बंडल होतं.

निंबुडा.......२००% सहमत. झेंडा गाणं आगीसाठी होतं. म्हणजे आरती आग दाखवत होती. नाही का तिने केशरी कपडे घातले होते?
अरे काहीही! यालाच म्हणतात बादरायण संबंध.

त्यातलं आरतीचं "झेंडा" वालं गाणं कोणत्या पंचमहाभूतासाठी होतं काय कळलं नाय ब्वा!
>>>> ते नुसत्याच भुतासाठी - आग्यावेताळासाठी होतं वाट्टं.... मी नेमकं तेवढच पाहिलं अर्थात केवळ पहिल्या दोनच ओळी. मग मीच बंडाचा झेंडा हाती घेतला. Happy

पंचमहाभुतांचा कल्पनेचा नृत्यासाठी वापर करायला सुचवणारे खरोखरच ग्रेट. एखाद्या कथेवर जेव्हा शात्रीय नृत्य केले जाते तेव्हा बर्‍याच वेळा ते पारंपारिक असते. त्यात अनेक बदल करत करत ते उत्तम होते. इथे आठ दिवसात असे गाणे शोधायचे ज्यातुन पंचमहाभुते प्रकट होतील आणि त्यावर नृत्य बसवायचे हे सर्व अशक्य या प्रकारात मोडते.

तरीही प्रयत्न करणार्‍या नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शकांचे कौतुक करावे असे वाटते कारण त्यांना पर्यायच नसावा.

मी अस नेहा पेंडसे कडून ऐकलय की call back round आहे.
म्हणजे ही परत मद्रासी नाचणार ती दुसरी नेहा येणार, शिवाय ती तांबट आणि select होणार पुन्हा ती कौतुकाची कमळी आरती

खर सांगायच तर इथल वाचून मग मी तो कार्यक्रम बघतो खुप हसायला येत.

आता तर पुष्कर श्रोत्रीही नावडता होतोय. याना स्क्रीप्ट लिहून घ्यायला लाज का वाटते. काहीच्या काही बोलत बसतात. त्या भाऊजीना माझ्या एका मित्राने सुनावल होत की sponteneous वाटेल अशी तयारी कर.

एक एव्हढा प्रतिथयश नट दिग्दर्शक आणि काय हे लाजिरवाणे खेळ करतोय.
एव्हढा वेळ चित्रपटावर घातला असता तर...

गुगु Happy Happy
काल मी ई टिव्हीवर 'हल्ला बोल' पाहिलं 'एपेए' वेळेत.... काय अप्रतिम डान्स करतात सगळे आणि परीक्षक पण उत्तम आहेत...
एका मुलाने मायकल जॅक्सन सारखा डान्स केला मला आवडला पण एकाही परीक्षकाला आवडला नाही....
पण महागुरु असते तर लगेच नोटा घेवुन धावले असते... शेवटचा मंगेशचा डान्स अतिशय सुरेख होता..

मला तर वाटले होते की तो कार्यक्र्म एकतर संपला असेल किंवा संपवला असेल. बातम्यांमधून कळले की, तो गेल्या आठवड्यापर्यंत सुरू होता.

हो हो, गेल्या बुध-गुरू झाला शेवटचा भाग. महागुरूंनी लावणी पेश करून पर्वाची सांगता केली. १ मे ला अंतिम फेरीचं प्रक्षेपण आहे, पण निकाल आजच आलाय पेपरात.

मामी Rofl
असले कार्यक्रम स्पॉन्सर कोण करतो देव जाणे? Uhoh Sad
त्या पुष्कर श्रोत्रीचं अक्षरश: माकड केलंय कित्येक एपिसोडमध्ये. डान्सपेक्षा त्याच्या माकडचाळ्यांनी जास्ती मनोरंजन व्हायचं म्हणून मी अधून मधून धडकायची त्या चॅनलवर.. स्मिता तांबे, नेहा पेंडसे, गिरिजा ओक या त्यातल्या त्यात जास्ती हॉरिबल बायका... एक बरी अप्सरा होती त्यात.. पण तिचे पाय हे नुसते पाय नसून हत्ती पाय होते. कोण होती ती...... नाव विसरले.. Sad

तिचे पाय होते हत्तीसारखे>>> काय सांगतेस दक्षे? उर्मिला कानेटकरचे पाय आणि हत्तीसारखे???? Uhoh

देउदत्त, तुमची लिंक पाहिली... २००८ चे आर्टिकल असल्याने युनिकोडमध्ये नाहीये....तसेच जुन्या आर्टिकल्स साठीचे मिलेनियम वरुण आणि लोक असे दोन्ही फॉन्टस डाऊनलोड केले, तरीही वाचता आले नाही.... हे आर्टिकल वाचण्याची उत्सुकता आहे. तुमच्याकडे दिसत असेल तर कॉपीपेस्ट कराल का? धन्यवाद!

Pages