डाएट रेसिपीज

Submitted by दक्षिणा on 11 January, 2011 - 23:55

अलिकडे बर्‍याच मैत्रिणींनी शंका उपस्थित केली की वजन कमी करताना खायचं किती आणि नक्की काय? कशात फॅट्स जास्त? कशात कमी? मग कोणता लो कॅलरी पदार्थ खाल्ला तर पोटभर होईल? याची चर्चा करता करता रमा ने सुचवलं की एक डाएट रेसिपीजचा बीबी सर्वांसाठीच उघडू.
अखेर आज मुहुर्त लागला...

या बीबी वर तुम्ही केलेली/तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी, लो फॅट, लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा. ब्रेकफास्ट/लंच्/डिनर्/स्नॅक्स्/वन डिश मिल... काहीही चालेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा असं करायचे.
सकाळी चक्क मऊभात आणि तूप. मेतकूट मला आवडत नाही जास्त. आणि नुसता तूपभात आवडतो. मग एक कप कॉफी. (भारी आहे हे कॉम्बो Happy )

दुपारी डब्यात २ पोळ्या (घडीच्या पोळ्या), भाजी, एखादी चटणी किंवा लोणचं.
४ वाजता वगैरे स्नॅक्स हवंच असं नाही, पण ६ ला घरी आलं की एखादा लाडू, किंवा मग कधीतरी सामोसा आणऊन एखादा वगैरे...आणि अर्धा कप कॉफी.
रात्री ८ ल जेवण. दीड पोळी, भाजी, ताकभात किं वरण/आमटी भात. शक्यतो १२ महिने ताक पिते मी. दुपारच्या वेळसाठी बाटलीतून नेत असे. काही त्रास होतो म्हणून नाही, खूप आवडतं मला. अगदीच खूप सर्दी असेल तर नाही घेत. (मनाची नाही, जनाची ठेवायची म्हणून Happy )

आता हे मी करत नाही. पण आहार म्हणून उत्तम आहे.

रच्याकने,
पुण्यात फुले मंडईच्या इथे एक दुकान आहे, तिथे ताज्या भाजलेल्या बर्‍याच प्रकारच्या लाह्या वगैरे मिळतात. ते लोक लाह्या भाजतच असतात बहुतेक वेळा, तिकडून लाह्या आणून मी ऑफिसमधे नेत असे कधीतरी. एकदम हलक्या असतात, नुस्ता कुरकुरेसार्ख्या खायलापण मजा येते. पण हे दुकान अगदी कोपर्‍यात होतं. आता माहिती नाही.

अरे मस्तच. धन्स दक्षिणा, हा बीबी काढल्याबद्दल.
सध्या खूप्पच गडबडीत आहे. नुसती डोकावून जातेय.
नंतर निवांत वाचणार आणि रेसिपीज ट्राय करून बघणार. Happy

इथे कार्ब व कॅलरीची माहीती आहे भारतीय जेवणा बद्दल.:
जरी लिंक ही मधुमेहासाठी असेल तरी दिवसाला १००० कॅलरी असा आहार करायला मदत होइल.

http://www.diabetesindia.com/diabetes/indian_food_exchge.htm

अंडी,मोड आलेली कड्धान्य, सलाड, नटस, सुप, हर्बल टी/ ग्रीन टी, फ्रुटस हे सगळे मधल्या वेळेत खाण्याने भरपुर विटामिन्स, प्रोटीन्स मिळतात अणि जंकफुड पण टळतेच. Happy

@ reshmasandeep
तुम्हि जे दिलेय ते नेम्के कशासथि आनि कसे वापरावे?

काकडीची खमंग कोशिंबीर. भरपूर (लो फॅट) दही घालून खायची. चवीला मस्त लागतेच आणि कॅलरीज अतिशय कमी. शेंगदाण्याच्या कुटात ज्या काही कॅलरीज असतील तेवढ्याच. तर ते कमी टाकायचं.

मामी, लो फॅट दह्यातील बहुतेक सर्वच कोशिंबिरी लो कॅल. दाण्याच्या कुटाऐवजी मोहरी फेसून/ मोहरी पूड/ मिरपूड/ जिरेपूड घातली तर वेगळी व मस्त झण्ण चव येते. टोमॅटो / काकडी/ गाजर/ मुळा/ पालक/ स्वीट कॉर्न/ बीट इ. इ. इ.

मी आजच मुगाची खिचडी करून आणलिये office ला.
अगदि चमचाभरच तेलात मोहरी तडतडवायची... मग चिमूटभर गरम मसाला टाकायचा... तांदूळ धुवून थोडा वेळ ठेवायचे. नंतर मूग डाळ, तांदूळ एकत्र परतून पाणी घालून शिजवायचं.... मस्त खिचडी तय्यार!!!

लो फॅट दह्यातील बहुतेक सर्वच कोशिंबिरी लो कॅल>>>>> अगदी अगदी.... मी रोजच्या जेवणात कोशिंबीर करतेच.... कितीही गडबड असली तरी....

कोशिंबीर :
काकडी/ मुळा/ गाजर/ बीट / tomato यातली एक + दही...(बीटाला दही नाही घालत...)+नावापुरतं शेंगदाण्याचं कूट+ मीठ + चिमूटभर साखर + कोथिंबीर

वरच्या भाज्यांची combo कोशिंबीर पण मस्त लागते...
उदा. काकडी + कांदा + कोथिंबीर
कांदा + tomato + कोथिंबीर

सातु च्या पीठाची खीर पण खुप हलकी असते. रात्री च्या जेवणा ऐवजी घेतली तर छान वजन कमी होते.
गोडासाठी मध घालु शकता.

चविष्ट ओटमील : (एका व्यक्तीकरता)
थोड्या तेलात मोहरी, हिंग, लाल मिर्ची, हिरवी मिर्ची बारीक चिरून आणि कढिपत्ता घालून फोडणी करावी. दोन्-तीन टेबलस्पून ओटमील घालून जरा परतून घ्याव आणि दोन ग्लास पाणी घालावं. मीठ घालून शिजू द्यावं. मधून मधून जरा हलवावं लागतं. पाच मिनिटात पाणी कमी होतं. मग हवं तितकं दही आणि कापलेली ताजी कोथिंबीर घालून एक छोटीशी वाफ येऊ द्यावी. गरमागरम खायला मस्तच लागतं.

ज्यांना ब्लॅंड फूड आवडतं त्यांना खूपच आवडेल. नाहीतर लसणाची चटणी घालून खावं.

माझी लसणाची चटणी : भाजलेले बिनपॉलिशचे पांढरे तीळ अर्धा वाटी, एक वाटी भाजलेल्या आळशीच्या बिया, एक वाटी किंवा हवे तसे आक्रोड. हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यावे. मग त्यात हव्या तितक्या लसूण पाकळ्या, मीठ आणि लाल तिखट घालून पुन्हा बारीक करावे. अतिशय खमंग आणि पौष्टिक.

थँक्स, मामी. पॉरीज खावुन खावुन नॉशिया आला होता मला. आता alternate दिवशी पॉरिज आणि तुझी रेसिपी असं करेन.

चिऊ, मायबोलीवर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे हा. त्यामुळे त्यावर बरीच चर्चा झाली आहे.
इथे बघ:
http://www.maayboli.com/node/21003

आणि इथेही बाफला नाव नसले तरी बघ :

http://www.maayboli.com/node/9103

चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द एकत्र येतील असं कधी वाटल नव्हतं. आता तुमच्या रेसेपीने ओटमील करुन पहाते.

मामी, एक पप्पी तुला. अगं काय यम्मी लागलं ते तिखट ओटमिल. पॉरिज खावुन जीव कंटाळला होता ( कारण रोजचं डिनर ओटस असतं माझं). एकदम आयुष्यात रस निर्माण झाला माझ्या नाही तर फारच अऴणी, बेचव झालं होतं. Proud बरं करायलाही अगदी सोप्पं. पॉरिजको बाय बाय आता. रोजच तुझी रेसिपी. थँक्स. Happy

चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द एकत्र येतील असं कधी वाटल नव्हतं. >>> स्वाती, अगदी अगदी. पण ही मामीची रेसिपी भारी जमली.

धन्यवाद मनिमाऊ आणि इतर. मीही आता तेच खात खात वाचत आहे. Happy जरा हिंग, दही, कोथिंबीर इ. जास्त घातलं ना की मस्तच होते. फोडणीत डायरेक्ट दहीमिश्रीत पाणी घालून उकळी आल्यावर त्यात ओटमील घालून आणि मग जरा घट्ट झाल्यावर वाफ दिली तरी चालतं. पॉरीज कन्सिस्टन्सी ठेवा, नाहीतर उपम्यासारखं घट्ट करा ..... चॉईस आहे.

मी दिलेल्या पध्दतीनं लसणाची चटणी केलीस की नाही?

चटणी नाही गं केली. काल फार घाई झाली होती नविन टेस्टची. आता शनिवार्-रविवार सुट्टी तेव्हा बघते करुन.

Pages