बालकवी - ५ (वत्सला)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 21:59
मुलीचे नावः गार्गी कट्यारे
वयः ५.५ वर्षे
मायबोली आयडी: वत्सला


गडबड गुंडा गडबड गुंडा
ईकडे जातो तिकडे जातो
ईकडे जातो तिकडे जातो

आई शोधत बसते
आई शोधत बसते
चांगला मार देते
चांगला मार देते

बिचारा गडबड गुंडा
रडत बसतो
व्यॅव व्यॅव व्यॅव करत बसतो!
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बिचारा गडबड गुंडा
रडत बसतो
व्यॅव व्यॅव व्यॅव करत बसतो >>

व्यॅऽऽव व्यॅऽऽव व्यॅऽऽव Lol
का गं आई? व्यॅव व्यॅव व्यॅव करीपर्यंत मारतेस? Happy

थॅक्यु सगळ्यांना! - गार्गी

@शैलजा, मी नाही ग मारत, पण मधुन मधुन म्हणत असते , चांगला मार दिला पाहिजे!

@लालु, हो ग ही गणपतीची गोष्ट सांगणारी गार्गी आहे!

ताई काहीतरी करतेय म्हटल्यावर राधाला गप्प बसवेना. त्यामुळे तिने पण बाय बाय करुन टाकला!
गार्गीसाठी मायबोली म्हणजे काहीतरी आपलं असल्यासारखं आहे. मधुन मधुन ती मला विचारत असते, नवीन काही गोष्ट, गाणं, फोटो आलय का माबोवर?

संयुक्याने मराठी भाषा दिवस २०११ निमित्त बालगोपालांसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे पुढची पिढी तयार होतेय हे नक्की! धन्यवाद माबो आणि संयुक्ता!

अरे वा! खुप मस्त!!! Happy बाबा आणि लेकीचे संवाद, अधून मधून छोटुकलीचे हमिंग आणि आईचं हसू, सगळंच एन्जॉय केलं... गार्गी, तुझं गाणं एकदम मस्त गं Happy