एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे?

Submitted by मदत_समिती on 31 March, 2009 - 14:36

गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो. पूर्णपणे काढण्यासाठी तो लेख खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, संपादनात त्या लेखाची स्थिती अपूर्ण ठेवून लेख अप्रकाशित करावा. डिलीट करण्यासाठी प्रशासकांना सांगणे गरजेचे आहे.

इतर विभागातील लिखाण काढून टाकण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधावा.

प्रकाशित लिखाण काढून टाकण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात गेल्यावर सगळ्यात खाली डीलीट असा पर्याय उपलब्ध आहे तो वापरावा. अप्रकाशित लेखन [अपूर्ण] डिलीट करता येत नाही.

कुठल्याही विभागात दिलेला प्रतिसाद डिलीट करण्यासाठी किंवा प्रतिसादात बदल करण्यासाठी त्याच प्रतिसादाखाली असलेल्या संपादन या दुव्याचा उपयोग करावा.

एकदा दिलेला प्रतिसाद संपूर्ण काढून टाकता येत नाही पण त्यातला मजकुर काढून टाकून तिथे रिकामी प्रतिसादाची चौकट ठेवता येते.

स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]

मी गुलमोहरवर काही लिखान केले आहे, पण ते दिसत नाहि. अस का होत? मी ते वर्ड मधे टाइप केल होत. पण या आगोदर ही काही लेखाण मी याच प्रकारे टाकले होते ते मात्र दिसत आहे.

दिसत नाही म्हणजे प्रकाशित केल्यावर रिकामा धागा दिसतो का? की केलेले लिखाण सापडत नाही. दुसरा प्रश्न असेल तर "माझे सदस्यत्व >> पाऊलखुणा >> लेखन" इथे तुम्हाला तुमचे केलेले सगळे लेखन दिसेल. तसेच मदतपुस्तिकेतला लेखनासंबंधी विभागातला "लेखन दिसत नाही" हा धागा पण वाचा.

नमस्कार admin

मी "आज काय बनवु " हे लेखन चुकून "गप्पांचे पान" ह्यावर लिहले आहेत.
त्या लेखाचा प्रकार बदलून 'लेखनाचा धागा' करता येइल का प्लिज

एकदा लिहिलेले कसे काढून टाकायचे..

सोप्प्प्पे आहे.... स्त्रीमुक्ती, धर्म अशा 'वादी' मुद्द्यांवर वादग्रस्त 'संवाद' लिहायचे. अ‍ॅड्मिअन स्वतःच सगळा धागा काढून टाकतात.. Proud

.

विपूसंपादनाचा पर्याय सध्यातरी उपलब्ध नाही आहे. ज्या आयडीची विपू आहे तिला उडवण्यास सांगू शकता. किंवा मग प्रशासकांशी संपर्क साधून उडवू शकता.

निवेदिता तुम्ही स्वतः लिहीलेली कृती असेल तरच हा संपादन पर्याय दिसतो. पाककृतीचा धागा उघडलात की पानाच्या upper right corner ला हा संपादनाचा पर्याय दिसेल.

धन्यवाद नंद्या, लोला, रुनी. रेसिपी सार्वजनिक केली आहे आणि शब्दखुणा अ‍ॅड केल्या आहेत. परत एकदा धन्यवाद.

मी माझे काही लेखनाचे धागे त्यातलं लिखाण उडवून (आत फक्त एक टिंब "." टाकून) अप्रकाशित केले आहेत. माझ्या 'लेखन' वर टिचकी मारल्यावर ते अप्रकाशित असल्याने अर्थातच इतर कुणालाही दिसणार नाहीत, पण सर्वरवर तो डेटा प्रतिसादांसकट तसाच राहील. मला माहित आहे की प्रतिसाद दिले असले तर ते उडवता येत नाही, पण मी लेखनच उडवल्याने ते धागेही कायमचे उडवता येतील का?

मी लिखाण उडवून अप्रकाशित केलेले धागे:

http://www.maayboli.com/node/13887

http://www.maayboli.com/node/20488

http://www.maayboli.com/node/26673

http://www.maayboli.com/node/30113

http://www.maayboli.com/node/27321

http://www.maayboli.com/node/30286

http://www.maayboli.com/node/15798

http://www.maayboli.com/node/15171

http://www.maayboli.com/node/34332

http://www.maayboli.com/node/35410

http://www.maayboli.com/node/35410

http://www.maayboli.com/node/32970

http://www.maayboli.com/node/24367

http://www.maayboli.com/node/21390

.एखादं लिखाण चुकून दोनदा प्रकाशित झाले तर एक डिलीट कसे करायचे. मला डिलीट पर्याय सापडला नाही. गुलमोहर - कथा - अंतराय दोनदा प्रकाशित झाली आहे माझी.

एकाच शीर्षका खाली ३ धागे ?..हे ३ धागे एकत्र नाही करता येणार.म्हणुन मला वाटले की एकच धागा असू द्यावा आणि त्याच धाग्याववर मी नविन कॉफी पेंटिन्ग्स ची चित्रे पोस्ट करेन..

Pages