Submitted by मिल्या on 12 January, 2009 - 02:10
चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले
चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले
दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
गुलमोहर:
शेअर करा
डोहाचा
डोहाचा शेर... अहाहा !
***
The geek shall inherit the earth (BILL 24:7)
संपूर्ण
संपूर्ण गजल छान आहे.
------------------------------
पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती | सगुण रुपाने येऊन स्वामी स्विकारा आरती ||
स्तब्ध आहे
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
>>
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
--
ख त री!! जबरी!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
हाय!
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?...........सुरेख !!
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले........क्या बात है !
दोष हा
दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना
का असे माझ्यावरी माझेच मन रागावले?
हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे
मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले?>>> क्या बात है रे! जियो!
स्लार्ती,
स्लार्ती, अश्विनी, आशू, जयू, श्या - अनेक धन्यवाद
================
मी असा ठिपक्यात होतो विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता
स्तब्ध आहे
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले >>>>
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले >>>>
खल्लास रे
सगळीच छान
सगळीच छान आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
मतला लयी
मतला लयी आवडला.
छान आहे
छान आहे गझल..... आवडली.....
मिल्या छान
मिल्या छान आहे. विडंबनापेक्षा असे काहीतरी गंभीर लिहितं जा..
स्तब्ध आहे
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
वाह !!!
पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
ही कल्पना पण सुंदर आहे.
छान गझल.
शुभेच्छा
>> पत्थराला
>> पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी
>> भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले
मस्त.
]
]
अप्रतिम.
अप्रतिम. मस्त.. छानच. कविता खुप भावली.
डोह,
डोह, विरोधी मुद्दे, मन आवडले.
सर्वांनाच
सर्वांनाच खूप खूप धन्यवाद..
गझल ला एवढे प्रतिसाद बघून खूप छान वाटले...
ह्याचे श्रेय वैभवला पण द्यायला हवे त्याने मायबोलीकरांना नुसती गझल लिहायलाच नाही तर वाचायलाही शिकवली... त्याचा परीणाम आहे हा!
केदार : बरेच दिवसांनी दिसलास
कुलदीपा : तुला विचारपूस वर उत्तर दिलेय रे...
================
मी असा ठिपक्यात होतो विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता
ह्याचसाठी
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
मस्त... वेगळा वाटला हा...
*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!
मस्त.
मस्त. आशयपूर्ण.
मिल्या स्त
मिल्या
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले
दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला
मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले
हे आवडले
मस्त गझल
सुधीर
ह्याचसाठी
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
यावरून
नशीबा सामन्याचा अंत तू आधी ठरवलेला
म्हणूनच एकही चेंडू तुझा मी खेळला नाही…..
हा माझा शेर आठवला.
मस्त आहे
मस्त आहे सगळीच गझल. आवडली.
सर्वांना
सर्वांना परत एकदा धन्यवाद...
================
मी असा ठिपक्यात होतो विखुरलेला
कोण रांगोळीस रेखाटेल आता
जबरी रे!!!!
जबरी रे!!!!
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले>>> विषेष आवडेष!
_________________________
-Impossible is often untried.
मिल्या,
मिल्या, अप्रतिम..
घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले
यातला दुसर्या ओळीतला धक्का सहीच.. मस्त!!
सगळेच शेर झकास.. पण विशेष आवडले ते..
डोह आणि सुखाचे फुल..
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
वा! मुद्दे,
वा!
मुद्दे, सुखाचे फूल आणि लाटा हे शेर तर फार आवडले!!
मिल्या....
मिल्या.... मस्तच रे...
अरे, मी आजच पाहिली ही गझल..
>> घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या
>> वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले
>> ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
>> पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
हे दोन शेर तर खूपच आवडले
ह्याचसाठी
ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा
पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
>>
हे फारच आवडले. सही.
गिरी, किरु,
गिरी, किरु, पुलस्ती, संदिप, भाग्य : धन्यवाद
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
मिल्या, एक
मिल्या, एक न् एक शेर अप्रतिम.. 'डोह' तर अफाट..
Pages