केल्याने भाषांतर - प्रवेशिका २ (अरुंधती कुलकर्णी)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 12:42

कवितेचे शीर्षक : मला काय झाले? मला काय झाले?

मला काय झाले? मला काय झाले?
ममत्व माझ्यातुनी ऐसे हरपले
खुळ्यासारखा मी विचारीत बसतो
सांगाल जन हो, मला काय झाले
हृदयात माझ्या डोकावलो मी
स्वतः नाही उरलो हे मलाही कळाले
तूचि वससी सदा ह्या मम अंतरी
आपादमस्तकी तूचि तू
आत - बाहेर केवळ तू!

--- अनुवाद : अरुंधती कुलकर्णी

मूळ काव्य : मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं
कवी : बुल्ले शाह (इ.स.१६८० ते १७५७)
भाषा : पंजाबी

मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं,
जियों कमली आखे लोकों मैनूं की होया
मैं विच वेखन ते नैं नहीं बण दी,
मैं विच वसना तूं।
सिर तो पैरीं तीक वी तू ही,
अन्दर बाहर तूँ।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छान. Happy

धन्यवाद! Happy

ललिता, पंजाबी भाषेतील शबद रचना सध्या वाचते आहे, त्यामुळे जे शब्द अडतात त्यांचा अर्थ तिथे शोधते. मलाही खूप काही पंजाबी अजूनही समजत नाही, कामचलाऊ कळते! Happy