युनिक फीचर्सची योजना- शाळांना पुस्तके भेट द्या

Submitted by रैना on 21 February, 2011 - 02:45

युनिक फीचर्स या प्रकाशनसंस्थेचा हा उपक्रम आहे. पत्रकारितेमध्ये त्यांचे स्थान आपल्याला ज्ञात आहेच.
http://www.uniquefeatures.in/

त्यांच्या ९ पुस्तकांच्या संच आपण विकत घेऊन महाराष्ट्रातील कुठल्याही शाळेला, अथवा आपल्या शाळेला पाठवू शकता. ते पाठवायची व्यवस्था करतात. ही पुस्तकं साध्या भाषेत लिहीलेली आहेत. किशोरवयीन संस्कारक्षम वयातील मुलांना समाजातील आदर्श, ध्येयप्रेरित लोकांचा परिचय व्हावा या उद्देशाने लिहीलेली आहेत. (खरेखुरे आयडॉल्स, प्रकाशवाटा, करके देखो, अज्ञात गांधी, अर्धी मुंबई वगैरे ९ पुस्तकांचा संच. यातील बर्‍याच पुस्तकांचा परिचय चिनूक्स यांच्या 'अक्षरवार्ता' सदरात त्यांनी मायबोलीवर करुन दिला आहे).

आम्ही हा संच आपापल्या शाळांना भेट दिला. आम्ही दोघेही छोट्या, साध्या शाळांमध्ये शिकलो. शाळेसाठी काहीतरी करायचे होते, पण नक्की काय करावे सुचत नव्हते. ही कल्पना आम्हाला ठिक वाटली.शाळांना पुस्तके मिळाल्याचे फोन आले. शाळांना आणि आम्हालाही आनंद झाला.

या प्रकाशनसंस्थेशी आमचा व्यक्तिगत परिचय नाही. पुस्तके वाचली होती एवढेच.
मायबोलीकर ललिता_प्रीति यांनी सर्वप्रथम त्यांना माझा नंबर दिला आणि मग ते येऊन भेटले.

संपर्क क्रमांक-९८६९७०३८९०- श्री विवेक संत (युनिक फीचर्स)

(कोणाला उपयोगी पडेल म्हणून ही माहिती देते आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, खूप छान माहिती. मीही देईन आता अशी पुस्तके माझ्या शाळेला.
बरं, फक्त मराठीच पुस्तकेच आहेत का इंग्लिशही?

रैना,
चांगला उपक्रम. आणि ही पुस्तकं तुम्ही शाळांना भेट दिलीत, त्याबद्दल अभिनंदन. Happy

शैलजा,
समकालीन प्रकाशनाची सर्व पुस्तकं या दुव्यावर बघता आणि विकत घेता येतील.
http://kharedi.maayboli.com/shop/Samakaaleen-Prakashan/

चिनूक्स, सीबीएससी माध्यमाच्या शाळेसाठी चालू शकतील का ही पुस्तकं असं पाहत होते. तू दिलेल्या दुव्यावरुन तरी सगळी मराठी आहेतसं दिसतं, तेह्वा चालणार नाहीतसं वाटतं, पण माझ्या शाळेसाठी चालतील. Happy

लिंकबदल धन्यवाद.

हो गं शैलजा. सगळी मराठी पुस्तकं आहेत.

लोकहो सातवी ते बारावी पर्यंतच्या मुलांना डोळे झाकुन भेट द्यावी अशी पुस्तके आहेत. अक्षरवार्तामधील उतारे वाचा. (जर वाचले नसतील तर)

रैना खुप खुप धन्स.
आमचा इनरव्हिल क्लब हा नव्यानेच जन्माला आला आहे. आमच्याकडे नगरपालीकेच्या शाळेने लायब्ररीची सोय करुन मागितली आहे. त्यांच्याकडे जागा आहे फक्त पुस्तके हवी आहेत. आमचा क्लब अवघ्या दोन महिन्यांचा असल्याने आमच्याकडे तेवढा फंड नाही. म्हणून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरातील तसेच कोणाकडे मिळतील ती वापरलेली पुस्तके गोळा करुन त्यांना देण्याचे ठरविले आहेत. आम्ही काही पुस्तके कॉन्ट्रीब्युशन काढून विकत घेणार आहोत. ती हीच घेउ आता.

नंदन - अरे यातली बरीचशी पुस्तकं सगळीकडे मिळतात. वर मायबोली खरेदी विभागातही आहेत बघ (चिनूक्सने दिलेली लिंक) अगदी सगळी ९ एखादवेळेस मिळणार नाहीत कदाचीत, पण ५ -६ तरी नक्की मिळतील कुठेही. प्रकाशकांकडुन संच मिळतो. शिवाय ते पोचती करतात.

जागू- त्यांचा फंडा म्हणजे जितक्या सहजपणे सलमानखानछाप newsworthy गोष्टी मुलांच्या डोळ्यासमोर नाचतात तितक्या सहजपणे पॉझिटीव्ह आदर्श नाही. अशावेळेस हा संच उपयोगी व्हावा. Happy
तुमच्या उपक्रमांस शुभेच्छा.

रैना
या उपक्रमाविषयी युनीक फिचर्सच्या वेबसाईटवर काही माहिती सापडली नाही. किती पैसे, कसे-कुठे भरायचे, भारताबाहेरून पाठवायचे असतील तर काय इ.इ. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांचे वेबपेज असेल तर देशील का. मला माझ्या इतर मित्र मैत्रीणींनापण याबद्दल कळवायचे आहे.

छान माहीती रैना.
भारताबाहेरून पाठवायचे असतील तर काय करावे लागेल? मी इथुन ऑर्डर करून भारतातल्या शाळांचा पत्ता दिला तर चालेल का? माझ्या दोन्ही शाळांना आणि गावातल्या लायब्ररीला हि पुस्तके द्यावी असं वाटतय.

--
आताच वेबसाईटवर बघितल्यावर खालील मेसेज येतोय म्हणजे सध्यातरी शक्य नाही असं दिसतय Sad
"सध्या ई-खरेदी चालू नाही. लवकरच आपण समकालीन प्रकाशनची पुस्तके ऑनलाईन विकत घेऊ शकाल.अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा."

रुनी/सावली,

समकालीन प्रकाशन आणि युनीक ची मायबोलीबरोबर पार्टनरशीप आहे. वर चिनूक्सने दुवा दिलाच आहे. http://kharedi.maayboli.com/shop/Samakaaleen-Prakashan/

तुम्ही खरेदीमध्ये ही पुस्तके घेऊ शकता आणि शिपींगचा पत्ता भारतातला दिलात तर आम्ही ती पुस्तके तुमच्या नोटसह तिथे पाठवू शकतो. भारतातला शिपीग पत्ता असेल तर शिपिंगची रक्कम पण कमी असते.

स्वत:करता ही पुस्तके घ्यायची असतील तर खरेदीविभागातर्फे घेता येतील. मात्र रैनाने सांगितलेल्या (जागर या) उपक्रमाअंतर्गत घ्यायची असतील तर त्यांचा व्यक्तिगत संपर्कावर जास्त भर आहे. आपल्यातर्फे ते शाळांना पुस्तकं पाठवतात. ती पुस्तकं मुलांपर्यंत पोचतील याची खातरजमा करतात. त्यासाठी वर्षभराच्या कालावधीनंतर त्या पुस्तकांवर आधारित प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ.चे आयोजन केले जाते.
(माझाही प्रकाशन संस्थेशी व्यक्तिगत परिचय नाही. त्यांच्या परिचितांपैकी एकांनी माझा संदर्भ दिला. माझ्याकडून रेफरन्सेस मागितले तेव्हा मी वाचनाची आवड असलेल्या माझ्या काही नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे फोन नं. त्यांना दिले. त्यात ज्यांना मी व्यक्तिशः ओळखते असे काही मायबोलीकर आहेत.)