केरळ डायरी: भाग ८

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग १: http://www.maayboli.com/node/22402
भाग २: http://www.maayboli.com/node/25445
भाग ३: http://www.maayboli.com/node/25476
मधले भाग अजुन लिहायचे आहेत.
भाग ७: http://www.maayboli.com/node/23569

सकाळी ७ ला पहिल्या बोटीकरता जमलेल्यांची गर्दी टाळत जेटी लगत असलेल्या गाईड्सच्या हट पाशी पोचलो. एक जुजबी फॉर्म भरुन निघालो राजन बरोबर. एका छोट्या तराफ्यावरुन तलावाचा अरुंद भाग ओलांडुन जंगलात प्रवेश केला. तो तराफा मजेशीर होता. त्याच्या दोन बाजुंना दोन दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्यांची दुसरी टोके दोन्ही किनाऱ्यांवरील झाडांना बांधली होती. नुसती दोरी ओढुन पलीकडे जाता येते व कुणा व्यक्तीला नाव परत न न्यावी लागुन दोरी ओढुन तिकडुन अजुन लोक येऊ शकतात. अजुन सुर्य पुरेसा वर आला नव्हता व जंगलही घनदाट होते त्यामुळे पक्षी लगेच दिसायची शक्यता नव्हती. पण हे आदिवासी गाईड्स तरबेज असतात. लगेचच त्याने एक पिट्टा शोधुन काढला. आणि ते या भागात या दिवसात खूप दिसत नसल्यामुळे त्यालाच आनंद झाला. एक-दोन फ्लायकॅचर्सचेही आवाज आले पण दिसले मात्र नाहीत.

sP1010131.jpgsP1281940.jpg

थोडे पुढे गेल्यावर ट्रीपाय (टकाचोर) व हॉर्नबील (धनेश) यांचे आवाज येऊ लागले. धनेश लगेच नाही दिसले, पण टकाचोर मात्र अनेक दिसले. त्यांना शोधतांना चक्क ट्रोगोनही दिसला. या वॉक्सवर अनेक लोक प्राणी पहायला जातात (हत्ती, वाघ). मला मात्र पक्षी पहायचे असल्याने आम्ही घुटमळत फिरु शकत होतो. असे म्हणतात की फिरतांना एका तासात तुम्ही ४-६ कि.मि. जाता, तर पक्षीनिरीक्षणाच्या वेळी ४-६ तासात १ कि.मि. जाता. एका पक्षामागुन दुसऱ्याकडे जातांना तेच होत होते. ट्रोगोनच्या मागे जातांना मला मोट्ठे काळे काहीतरी दिसले - लगेच त्याच्यामागे. तो होता मोठा काळा सुतारपक्षी. आसपास फ्लेमबॅकच्या चोचीचे थडाथड पडलेले घाव ऐकु येत होते. हा मात्र पद्धतशीरपणे एकएक दणकट घाव घालत होता. काही फटक्यांसरशी झाडाच्या सालींचे मोठे तुकडे धरणीकडे धाव घेत होते. तो असलेल्या झाडाच्या जवळच एक झुबकेदार शेपुट वाली मलबार खार पण दिसली. उंच घनदाट वृक्षांमुळे फोटो मात्र मनाजोगते आले नाहीत.

sP1010233.jpgsP1010242.jpg

श्रीलंकन फ्रॉगमाऊथ पहायची इच्छा दर्शविल्यावर ते ज्या प्रकारच्या झाडांवर असतात तिथे राजन घेऊन गेला. पहिल्या ठिकाणी तर दिसले नाहीत पण दुसऱ्या ठिकाणी एक जोडी होती. दोघेही स्तब्ध बसुन होते. निशाचर असल्याने रात्री कीटक खायचे आणि दिवसा झोपा काढायच्या असे यांचे साधे समिकरण. एक तर चक्क डोळे उघडे ठेऊन झोपला होता. आजुबाजुची त्यांना मुळीच फिकीर नाही हे पाहुन ते तिथे प्लांट तर नाही ना केले असेही मला वाटुन गेले. त्याच दरम्यान मला एक साळींदरही दिसली. हे पण प्राणी तसे निशाचर व दिवसा क्वचीतच दिसतात. त्यांची विष्ठा मात्र अनेक ठिकाणी दिसली. हरणांचे केस असलेली जंगली कुत्र्यांची देखील. एका वारुळात केल्या गेलेले एक ताजे बीळ पाहुन राजन ते पॅंगोलीन चे असल्याचे बोलला (खवल्या मांजर).

sP1010260.jpgsP1281944.jpgsP1010251.jpg

केरळच्या अभयारण्यांमध्ये पायी फिरता येते ही एक खूप छान गोष्ट आहे. नाहीतर मध्यप्रदेशातील जंगलांमध्ये त्यांच्या जीपने फिरायचे व खाली पायही नाही ठेवायचा. आम्हाला वाघ दिसला इतपत म्हणायला(च) ते ठीक आहे. पक्षी पहायचे असतील तर फक्त माळरानावरील किंवा पाण्यावरचे. किंवा मग अवैध मार्ग अवलंबायचा. इथे फिरणे स्वस्त नाही, आणि अमर्याद पण नाही, पण जे काही फिरता येते ते भरपुर आनंद देऊन जाते. Leaf bird, White Cheeked Barbet, Yellow Bulbul असे अजुन अनेक पक्षी दिसले. काहींचे नुसतेच आवाज ऐकु आले. उदा. Malabar whistling Thrush, Spidercatcher व Owlet.

जेवणानंतर अरण्यनीवासच्या आसपास पुन्हा भटकलो व अजुन काही पक्षी पदरात पाडुन घेतले उदा. Malabar parakeet, blossom headed parakeet, Loten's sunbird, Chestnut fronted barbet. दुसऱ्या दिवशी सकाळी भरपुर धनेशांचे दर्शन झाले व एक वूली नेक्ड स्टॉर्कही दिसला. फ्लेमबॅक्स, बॅबलर्स, मलबार लंगुर्स वगैरे तर होतेच. या भागात स्ट्रॅंग्लर फिग्स पण बरेच दिसतात. एकुण ही जागा वैविध्यामुळे भारतातील इतर जागांपेक्षा खूप जास्त आवडली. मधल्या बोट-ट्रीपचे वर्णन वगळले आहे ते पुढच्या भागात.

sP1010284.jpgsP1010277.jpgsP1010172_0.jpgsP1010182_0.jpgsP1010196_0.jpgcsP1291978.jpg

भाग ९: http://www.maayboli.com/node/23781

मस्त... Happy

शेवटचा फोटो स्ट्रँगलर फीगचा आहे. एक झाड दुसर्‍याला स्ट्रँगल करते आहे.

स्ट्रँ लिहायला ५ अक्षरे लागतातः स ट र अ‍ॅ ं - अजुन कशाकशाला इतकी लागतात?

अस्चिग छान लेख मित्रा!

रच्याकने तु अगदी १०१% इंग्लिश दिसतोस रे... Happy

मस्त आहे केरळ ची सफर. केरळ की गोवा म्हटले की अजूनही गोव्याचेच बुकिन्ग होते. माकडांची जोडी मस्त आहे . ती पर्णकुटी पण Happy

चातक, शॉर्ट्स घालतो मी कधिकधी, पण जंगलात मात्र नाही जाणार तसा - पँट घातली की किडे, काटे, साप या सर्वांपासुन संरक्षण होते असा माझा दृढ (अंध?)विश्वास आहे.