तू कैफ शांभवीचा......

Submitted by कौतुक शिरोडकर on 14 February, 2011 - 02:38

तू कैफ शांभवीचा, रमतो तुझ्या सवे मी
अन घोट घोट जगणे, जगतो तुझ्या सवे मी...

ये चोरपावलांनी, स्वप्ने कुशीत भोळी
अलवार त्या कळ्यांसम, फुलतो तुझ्या सवे मी...

ते लाघवी उसासे, श्वासात धुंद गाणी
आवेग स्पंदनाचा, झुलतो तुझ्या सवे मी...

नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...

क्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या
तुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वेळ मिळाला तर राजे Happy
आता पुन्हा लिहायला चालु करा Wink
आवडली हे सांगणे नलगे !!!

अहाहा..! कौतुक विश्वास बसत नाही ही तुझी रचना आहे...व्वाह्...अस्सल मराठी! तुझे करावे तितके कमी कौतुक..!

नक़ळे शशी कधी तो, सुर्यास साद घाली
नयनातल्या निशेला, छळतो तुझ्या सवे मी...>>> व्वाह...!

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी........... व्वा,जीवघेणा शेर.

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...

व्वा!
मस्त!!
रामकुमार

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...>>> हा आवडला

कौतुक गझल आवडली.
भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...

क्षण सांगतील सारे, माझ्या नव्या कहाण्या
तुज आठवून कैसा, झुरतो तुझ्या सवे मी...>>> सहीयेत.

भलतीच जीवघेणी, ही रीत प्रीतवेडी
घेऊन घाव गहिरे, हसतो तुझ्या सवे मी...

मस्त...........

सुंदर.

मस्त...