प्रेरणा:-पंतांचा धागा: मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती
लग्नापूर्वी-सगळे अलबेल असतांना:
धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा
लग्नानंतर दारुड्या झालेल्या आणि वेगळ्यात धुंदीत रहाणार्या नवर्याविषयी बायकोचे मनोगत:
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
नवर्याचे त्यावरचे उत्तर:
साकीसे मुहोब्बत होती हैं
हर रोज शिकायत होती हैं
पिने को मेरे पिना ना कहो
युं भी तो इबादत होती हैं
नवर्याच्या ह्या सवयीला कंटाळून बायको घर सोडून जाते. आपले सुखी संसाराचे स्वप्न भंग झाले, या दु:खात गाते:
ना कोई उमंग हैं
ना कोई तरंग हैं
मेरी जिंदगी हैं क्या
इक कटी पतंग हैं
तिकडे घरात एकटा असलेला नवरा गातो:
नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो
बायकोला कोणीतरी व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता कळवतो. तो द्यायला म्हणून ती घरी जाते. नवर्याला वाटते, ती परतलीच. तो गातो:
तुम आ गये हो, नुर आ गया हैं
नही तो चरागोंसे लौ जा रही थी
बायको म्हणते:
आले नाही मी तुम्हाला न्यायला आले
व्यसनमुक्ती केंद्रात धाडायला आले
सुधारणार असाल तर समजवायला आले
तुटणारा संसार सावरायला आले
नवरा म्हणतो:
तू म्हणशील ते ऐकणार आता मी
तू नेशील तिथे जाणार आता मी
तुझ्याशिवाय माझे पान हलत नाही
रममधे माझे मन आता रमत नाही
व्यसनमुक्ती केंद्रात नवर्याची दारु सुटते. त्याला स्वतःची वेगळी ओळख होते. त्याची पूर्वीची प्रतिमा त्याला आता स्पष्ट दिसू लागते. तो म्हणतो:
क्षणभर होतो बहकलेलो जाऊ कशाला साकीकडे
घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे
आता घरात पुन्हा आनंदीआनंद होतो. व्यसनाकडून व्यसनमुक्तीकडे हा प्रवास असा सुफळ संपूर्ण होतो.
ब्रिलियंट! उत्तम कल्पकतेचे
ब्रिलियंट!
उत्तम कल्पकतेचे उदाहरण सानी!
(चुकून 'साकी' लिहिले जाणार होते. -दिवा, चिमणी, मेणबत्ती जे वाटेल ते घ्या)
धन्स बेफिकीरजी
धन्स बेफिकीरजी
सानी, "धुंद येथ मी, स्वैर
सानी,
"धुंद येथ मी, स्वैर झोकितो, मद्याचे प्याले,
त्याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजवीत"
हे गाणे म्हणताना त्या नवर्याची कुठली स्थिती होती? म्हणजे वरच्या क्रमात कुठे बसते हे गाणे?
झक्की काका वरच्या क्रमात
झक्की काका
वरच्या क्रमात तुमचे हे गाणे बसत नाही... वरच्या कथेतल्या त्या जोडप्याला अजूनतरी मुल-बाळ झाल्याचा उल्लेख केलेला नाहीये. 
(No subject)
छान लिहिलय सानी. सर्व कथांचा
छान लिहिलय सानी. सर्व कथांचा असा सुखांत होऊ दे..
धन्स चातक, दिनेशदा
धन्स चातक, दिनेशदा
मस्त आहे !!!
मस्त आहे !!!
सानी लय भारी विडंबन ....
सानी लय भारी विडंबन ....
दिनेशदा ना अनुमोदन. सर्व
दिनेशदा ना अनुमोदन.
सर्व कथांचा असाच सुखांत होऊ दे..
सुंदर!! मुळात हे
सुंदर!!
मुळात हे लिहीण्यामागची मानसिकताच, तू सेंसीबल ह्युमन बिईंग असल्याचा भक्कम पुरावा आहे सानी!!
खुपच छान सानीजी..
खुपच छान सानीजी..
सानुली, खुप मस्त
सानुली,
खुप मस्त लिहले........व्यसनाधिन लोकांनी जरुर वाचावे....
झक्की काका वरच्या क्रमात
झक्की काका वरच्या क्रमात तुमचे हे गाणे बसत नाही... वरच्या कथेतल्या त्या जोडप्याला अजूनतरी मुल-बाळ झाल्याचा उल्लेख केलेला नाहीये.
>>>>>>
साकी.... आय मिन सानी,
तूच तर लिहिलेयेस शेवटी "घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे"

एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय????
की त्या सद्गृहस्थाचं नाव "सतीश तारे" आहे

तूच तर लिहिलेयेस शेवटी "घरात
तूच तर लिहिलेयेस शेवटी "घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे"
एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय????
>> नाही रे भुंग्या, तो पिऊन आल्यामुळे बायकोने त्याच्या मुस्काटात लगावली असेल, तेव्हा त्याच्या डोळ्यांपुढे दिवसा "तारे" चमकले असतील.
भुंग्या... सानी हा चांगला
भुंग्या...

सानी हा चांगला उतारा आहे...
सानी हा चांगला उतारा आहे...
सानी हा चांगला उतारा आहे...
>>>>
सानी, ठमा बघ तुला "चांगला उतारा" म्हणतेय.......

ठमे, झुंजार पत्रकार.... काय स्वल्पविराम स्ट्राईकवर गेले की कॉय???
घरात १ च चांदनी आहे तारे ती
घरात १ च चांदनी आहे तारे ती मदिरा उतरल्याने दिसत असावी
बाकी सानी हे स्वानुभवातुन का?
भुंग्या, अरे तू आत्ताच ते
भुंग्या, अरे तू आत्ताच ते थेंब थेंब काहीतरी पिऊन आलास ना म्हणून अर्थाचा अनर्थ केलास बघ... पॅसिव्ह् ड्रिंकिंग सुरू केलंस की कॉय!!!

सानुली, खुप मस्त
सानुली,
खुप मस्त लिहले........व्यसनाधिन लोकांनी जरुर वाचावे....
व्यसनाधीन होंऊन नंतर का स्मिता
अहो, नवर्याचे नाव नाहि,
अहो, नवर्याचे नाव नाहि, बायकोचे नाव 'तारा' असेल तर तिला आवडीने 'तारे' म्हणत असेल.
ते नै का, राधा ला राधे म्हणतात तसेच हे..
सानुली......
सानुली......

सगळेच इथे अकलेचे तारे
सगळेच इथे अकलेचे तारे तोडताहेत.
सानी, मस्तच. स्मिताला १०००
सानी, मस्तच.
स्मिताला १००० मोदक.
खूपच मस्त लिहिले आहेस सानी
खूपच मस्त लिहिले आहेस सानी !!
मला एकदम ओशोच्या " संभोगातुन समाधीकडे " हा पुस्तकाची आठवण झाली
मला एकदम ओशोच्या " संभोगातुन
मला एकदम ओशोच्या " संभोगातुन समाधीकडे " हा पुस्तकाची आठवण झाली
>>>
पंत , आता त्यावरचा एक धागा काढा......... आपलं अवतारकार्य पूर्णत्वास जाईल....
ओशो वर खरच खूप आहे
ओशो वर खरच खूप आहे लिहिण्यासारखं .
पण सीरीयस विषयांवर लिहायची क्षमता मी गेल्या काही दिवसात गमावुन बसलोय
एका बायकोला "तारे" म्हणायला
एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय????
अरे अरे!!! ही शक्यता मी गृहितच धरली नव्हती...:खोखो:
बाकी सानी हे स्वानुभवातुन का?>>> नाही मुकु... माझ्या सुदैवाने असा अनुभव माझ्या वाट्याला आला नाही. सगळे परानुभवाचे बोल... तुटलेले तारे आयमीन घरे पाहून तोडलेले अकलेचे तारे आहेत हे...
मला एकदम ओशोच्या " संभोगातुन समाधीकडे " हा पुस्तकाची आठवण झाली

पंत, ह्या धाग्याच्या 'विषयाची' प्रेरणा तुमच्याकडून तर शीर्षकाची प्रेरणा ओशोंकडूनच हो!!!
भुंगा म्हणतोय तसं आता त्यावरचाही धागा काढाच... आपलं अवतारकार्य पूर्णत्वास जाईल....
धन्स सगळ्यांना...
पण सीरीयस विषयांवर लिहायची
पण सीरीयस विषयांवर लिहायची क्षमता मी गेल्या काही दिवसात गमावुन बसलोय
मद्याचा अतिरेक
मुकु
मुकु
Pages