व्यसनाधीनतेकडून व्यसनमुक्तीकडे

Submitted by सानी on 8 February, 2011 - 08:11

प्रेरणा:-पंतांचा धागा: मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

लग्नापूर्वी-सगळे अलबेल असतांना:

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

लग्नानंतर दारुड्या झालेल्या आणि वेगळ्यात धुंदीत रहाणार्‍या नवर्‍याविषयी बायकोचे मनोगत:

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

नवर्‍याचे त्यावरचे उत्तर:

साकीसे मुहोब्बत होती हैं
हर रोज शिकायत होती हैं
पिने को मेरे पिना ना कहो
युं भी तो इबादत होती हैं

नवर्‍याच्या ह्या सवयीला कंटाळून बायको घर सोडून जाते. आपले सुखी संसाराचे स्वप्न भंग झाले, या दु:खात गाते:

ना कोई उमंग हैं
ना कोई तरंग हैं
मेरी जिंदगी हैं क्या
इक कटी पतंग हैं

तिकडे घरात एकटा असलेला नवरा गातो:

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

बायकोला कोणीतरी व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता कळवतो. तो द्यायला म्हणून ती घरी जाते. नवर्‍याला वाटते, ती परतलीच. तो गातो:

तुम आ गये हो, नुर आ गया हैं
नही तो चरागोंसे लौ जा रही थी

बायको म्हणते:

आले नाही मी तुम्हाला न्यायला आले
व्यसनमुक्ती केंद्रात धाडायला आले
सुधारणार असाल तर समजवायला आले
तुटणारा संसार सावरायला आले

नवरा म्हणतो:

तू म्हणशील ते ऐकणार आता मी
तू नेशील तिथे जाणार आता मी
तुझ्याशिवाय माझे पान हलत नाही
रममधे माझे मन आता रमत नाही

व्यसनमुक्ती केंद्रात नवर्‍याची दारु सुटते. त्याला स्वतःची वेगळी ओळख होते. त्याची पूर्वीची प्रतिमा त्याला आता स्पष्ट दिसू लागते. तो म्हणतो:

क्षणभर होतो बहकलेलो जाऊ कशाला साकीकडे
घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे

आता घरात पुन्हा आनंदीआनंद होतो. व्यसनाकडून व्यसनमुक्तीकडे हा प्रवास असा सुफळ संपूर्ण होतो.

Happy Happy Happy

गुलमोहर: 

ब्रिलियंट!

उत्तम कल्पकतेचे उदाहरण सानी!

(चुकून 'साकी' लिहिले जाणार होते. -दिवा, चिमणी, मेणबत्ती जे वाटेल ते घ्या)

सानी,
"धुंद येथ मी, स्वैर झोकितो, मद्याचे प्याले,
त्याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजवीत"

हे गाणे म्हणताना त्या नवर्‍याची कुठली स्थिती होती? म्हणजे वरच्या क्रमात कुठे बसते हे गाणे?

झक्की काका Proud वरच्या क्रमात तुमचे हे गाणे बसत नाही... वरच्या कथेतल्या त्या जोडप्याला अजूनतरी मुल-बाळ झाल्याचा उल्लेख केलेला नाहीये. Proud

सुंदर!!

मुळात हे लिहीण्यामागची मानसिकताच, तू सेंसीबल ह्युमन बिईंग असल्याचा भक्कम पुरावा आहे सानी!!

सानुली,
खुप मस्त लिहले........व्यसनाधिन लोकांनी जरुर वाचावे....

झक्की काका वरच्या क्रमात तुमचे हे गाणे बसत नाही... वरच्या कथेतल्या त्या जोडप्याला अजूनतरी मुल-बाळ झाल्याचा उल्लेख केलेला नाहीये.

>>>>>>

साकी.... आय मिन सानी,

तूच तर लिहिलेयेस शेवटी "घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे"
एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय???? Rofl Proud

की त्या सद्गृहस्थाचं नाव "सतीश तारे" आहे Rofl Lol Biggrin

तूच तर लिहिलेयेस शेवटी "घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे"
एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय????

>> नाही रे भुंग्या, तो पिऊन आल्यामुळे बायकोने त्याच्या मुस्काटात लगावली असेल, तेव्हा त्याच्या डोळ्यांपुढे दिवसा "तारे" चमकले असतील.

सानी हा चांगला उतारा आहे...

>>>>

सानी, ठमा बघ तुला "चांगला उतारा" म्हणतेय....... Rofl Proud

ठमे, झुंजार पत्रकार.... काय स्वल्पविराम स्ट्राईकवर गेले की कॉय??? Wink

घरात १ च चांदनी आहे तारे ती मदिरा उतरल्याने दिसत असावी Biggrin

बाकी सानी हे स्वानुभवातुन का? Proud

भुंग्या, अरे तू आत्ताच ते थेंब थेंब काहीतरी पिऊन आलास ना म्हणून अर्थाचा अनर्थ केलास बघ... पॅसिव्ह् ड्रिंकिंग सुरू केलंस की कॉय!!! Wink Biggrin

सानुली,
खुप मस्त लिहले........व्यसनाधिन लोकांनी जरुर वाचावे....

व्यसनाधीन होंऊन नंतर का स्मिता Lol

अहो, नवर्‍याचे नाव नाहि, बायकोचे नाव 'तारा' असेल तर तिला आवडीने 'तारे' म्हणत असेल.

ते नै का, राधा ला राधे म्हणतात तसेच हे.. Proud

मला एकदम ओशोच्या " संभोगातुन समाधीकडे " हा पुस्तकाची आठवण झाली

>>>

पंत , आता त्यावरचा एक धागा काढा......... आपलं अवतारकार्य पूर्णत्वास जाईल.... Proud

ओशो वर खरच खूप आहे लिहिण्यासारखं .

पण सीरीयस विषयांवर लिहायची क्षमता मी गेल्या काही दिवसात गमावुन बसलोय Proud

एका बायकोला "तारे" म्हणायला तो काय परत पिऊन आला की काय????
अरे अरे!!! ही शक्यता मी गृहितच धरली नव्हती...:खोखो:

बाकी सानी हे स्वानुभवातुन का?>>> नाही मुकु... माझ्या सुदैवाने असा अनुभव माझ्या वाट्याला आला नाही. सगळे परानुभवाचे बोल... तुटलेले तारे आयमीन घरे पाहून तोडलेले अकलेचे तारे आहेत हे... Proud

मला एकदम ओशोच्या " संभोगातुन समाधीकडे " हा पुस्तकाची आठवण झाली
पंत, ह्या धाग्याच्या 'विषयाची' प्रेरणा तुमच्याकडून तर शीर्षकाची प्रेरणा ओशोंकडूनच हो!!! Biggrin
भुंगा म्हणतोय तसं आता त्यावरचाही धागा काढाच... आपलं अवतारकार्य पूर्णत्वास जाईल.... Biggrin

धन्स सगळ्यांना... Happy

पण सीरीयस विषयांवर लिहायची क्षमता मी गेल्या काही दिवसात गमावुन बसलोय

मद्याचा अतिरेक Biggrin

Pages