व्यसनाधीनतेकडून व्यसनमुक्तीकडे

Submitted by सानी on 8 February, 2011 - 08:11

प्रेरणा:-पंतांचा धागा: मदिरा प्राशन - पार्श्वभूमी, परिचय, व्यसनमुक्ती , अनुभव व मनःशांती

लग्नापूर्वी-सगळे अलबेल असतांना:

धुंदीत राहू मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

लग्नानंतर दारुड्या झालेल्या आणि वेगळ्यात धुंदीत रहाणार्‍या नवर्‍याविषयी बायकोचे मनोगत:

कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू

नवर्‍याचे त्यावरचे उत्तर:

साकीसे मुहोब्बत होती हैं
हर रोज शिकायत होती हैं
पिने को मेरे पिना ना कहो
युं भी तो इबादत होती हैं

नवर्‍याच्या ह्या सवयीला कंटाळून बायको घर सोडून जाते. आपले सुखी संसाराचे स्वप्न भंग झाले, या दु:खात गाते:

ना कोई उमंग हैं
ना कोई तरंग हैं
मेरी जिंदगी हैं क्या
इक कटी पतंग हैं

तिकडे घरात एकटा असलेला नवरा गातो:

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

बायकोला कोणीतरी व्यसनमुक्ती केंद्राचा पत्ता कळवतो. तो द्यायला म्हणून ती घरी जाते. नवर्‍याला वाटते, ती परतलीच. तो गातो:

तुम आ गये हो, नुर आ गया हैं
नही तो चरागोंसे लौ जा रही थी

बायको म्हणते:

आले नाही मी तुम्हाला न्यायला आले
व्यसनमुक्ती केंद्रात धाडायला आले
सुधारणार असाल तर समजवायला आले
तुटणारा संसार सावरायला आले

नवरा म्हणतो:

तू म्हणशील ते ऐकणार आता मी
तू नेशील तिथे जाणार आता मी
तुझ्याशिवाय माझे पान हलत नाही
रममधे माझे मन आता रमत नाही

व्यसनमुक्ती केंद्रात नवर्‍याची दारु सुटते. त्याला स्वतःची वेगळी ओळख होते. त्याची पूर्वीची प्रतिमा त्याला आता स्पष्ट दिसू लागते. तो म्हणतो:

क्षणभर होतो बहकलेलो जाऊ कशाला साकीकडे
घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे

आता घरात पुन्हा आनंदीआनंद होतो. व्यसनाकडून व्यसनमुक्तीकडे हा प्रवास असा सुफळ संपूर्ण होतो.

Happy Happy Happy

गुलमोहर: 

सानी,
हे जीवनगाणे छान मांडली/रेखाटली आहेस !
Happy

शेवटी,
झाले गेले विसरुन जावे ..पुढे पुढे चालावे !
Happy

सानी, पण व्यसनाधीनतेकडून व्यसनमुक्तीकडे असा चांगला शेवट कित्येकांच्या नशीबात नसतो ...
केवळ योग्य वेळी सल्ला,मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, त्यांना चुकीची जाणीव/पश्च्चाताप होऊनही घराताल्,समाजातील कुणी समजुन न घेतल्यामुळे,तसेच मदत न मिळाल्यामुळे अनेकजण शेवटी अकाली मृत्युला/आत्महत्येला समोर जातात

अनिल...धन्स हं... तुम्ही म्हणता ते खरे आहे.... Sad :सर्वांसाठी सुखांतिकेची प्रार्थना करणारी बाहुली: Happy

STORVI!!!!!!
कित्येक वर्षांनी! काय म्हणते आरोही? शाळेत जायला लागली का? कितवीत? बरेच दिवसात भूकंपाची बातमी नाही, नाच शिकवणे बंद केले का?

मला तेच वाटले, म्हंटले अजून मूलबाळ नाही, संसाराची खरी जबाबदारी सुरु झाली नाही, त्या आधीच दारुडा बनायला काय झाले? नुसते लग्न झाले म्हणजे लगेच दारुडा होण्याइतके होत नाही! फार तर एखाद दिवस प्यावीशी वाटायला लागते, बायकोशी जास्त वेळ बोलल्यास. पण दारुडा!!!
अगदीच घाबरट दिसतो आहे!

Happy Light 1

Pages