तुरीया पात्रा वाटाणा

Submitted by मंजूडी on 12 March, 2010 - 02:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिरा, साल काढलेले मध्यम आकाराचे दोडक्याचे तुकडे - २ वाट्या
मटाराचे दाणे - २ वाट्या
अळूवड्या - एका उंड्याचे तुकडे म्हणजे साधारण दिड वाट्या(उकडलेल्या पण न तळलेल्या)
जिरं (फोडणीत घालण्यासाठी) - १ चहाचा चमचा
आल्याचा कीस - १ चहाचा चमचा
२ हिरव्या मिरच्या
जिरं - १ चहाचा चमचा
धने - १ चहाचा चमचा
हळद - पाव चहाचा चमचा
एका लिंबाचा रस
ओलं खोबरं - ७-८ चमचे
बारीक चिरलेली कोथिंबीर - ३-४ चमचे
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी साजूक तूप - ३ चहाचे चमचे

क्रमवार पाककृती: 

तुरीया म्हणजे दोडका, पात्रा म्हणजे अळूवडी. एरवी दोडक्याची फारशी न आवडणारी भाजी ह्या गुजराथी प्रकाराने केली तर फारच छान लागते.

कढईत धने आणि जिरं कोरडंच भाजून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. मिरच्यांचे बिया काढून मध्ये चीर देऊन अगदी बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईत फोडणीसाठी तूप तापवून घेऊन त्यात जिरं आणि मिरच्यांचे तुकडे घालावेत. आल्याचा कीस घालून जरा परतावे. मग दोड्क्याचे तुकडे घालून कढईवर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. मग झाकण काढून त्यात मटाराचे दाणे आणि २ वाट्या पाणी घालावे. पाणी उकळू लागले की त्यात हळद, धने-जिर्‍याची पावडर घालावी. अळूवड्या घालाव्यात. ४-५ चमचे ओलं खोबरं आणि १-२ चमचे कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे मीठ साखर आणि लिंबाचा रस घालावा. झाकण न ठेवता मंदाग्नीवर भाजी उकळू द्यावी. दोडका शिजला की भाजी तयार झाली. पण ही भाजी अगदी गिच्च शिजवायची नाही. रस सुद्धा अगदी खूप ठेवायचा नाही. कारण तो दाट नसतो. वरून उरलेलं खोबरं - कोथिंबीर पेरून गरम गरम फुलक्यांबरोबर खावी.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांसाठी
माहितीचा स्रोत: 
ही गुजराथी पारंपारीक भाजी एका लग्नात खाल्ली होती. त्याच्या चवीवरून साधारण घटक पदार्थ समजून घेऊन आईने तयार केलेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अळू वड्या करणे हाच एक मुख्य अडथळा आहे. >>> ही भाजी भारताबाहेर राहणार्‍यांसाठी अगदी आदर्श आहे. अमेरिकेत दीप कंपनीच्या पात्रा मिळतात. उकडून कापलेल्या वड्या असतात. अजिबात तिखट नाहीत. अतिशय सुरेख असतात चवीला. त्या वापरुन भाजी एकदम झटपटही होते आणि पार्टीसाठी अगदी यशस्वी मेन्यू.
धन्यवाद मंजूडी Happy

आज मी ही भाजी केली होती.....खूप छान झाली .....कधी सम्पली समजले नाही....धन्यवाद मन्जु...अजुन अळूवड्यान्चा उन्डा आहे...म्हणुन पुन्हा एकदा भाजी करण्याचा विचार आहे....

Pages