लेखनचोरांची ऐशीतैशी........

Submitted by भुंगा on 4 February, 2011 - 02:59

मितानचा "माझे लेख चोरले गेलेत" हे वाचून असा धागा काढायची इच्छा झाली. यापूर्वीही अश्याप्रकारच्या लेखनचोर्‍या इथे उघड झालेल्या आहेत. मायबोलीकरांपुरते हे थांबवायचे असेल तर असा काही तरी उपक्रम राबवायलाच हवाय. कारण बर्‍याचदा आपल्या विरोधात आरडाओरड झाल्यावर सरसकट दुसर्‍याचा लेख चोरणारा तो लेख डिलिट करून नामानिराळा रहायचा प्रयत्न करतो. पुढे मूळ लेखकाला मनस्ताप झाला तरी काहीच करता येत नाही.

निदान मायबोलीवरचे असे लेख दुसर्‍याने कोणी आपल्या नावाने खपवायचे नसतील तर, इथे त्या माणसाची लेखनचोरी जाहिरपणे मांडुयात........ म्हणजे जरी त्याने ते लेख डिलिट केले तरी इथे त्याबद्दलची माहिती कायम स्वरुपात नावासकट आणि लिंकसकट राहील. आणि सदर व्यक्तीने इथे जाहिर दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय इथले त्याचे नाव डिलिट केले जाणार नाही.

कारण जाणते - अजाणतेपणी झाले तरी हे करणार्‍याला पुरेपूर माहित असते की आपण दुसर्‍याचाच लेख किंवा कविता स्वतःच्या नावावर खपवतोय...... ही वृत्ती अतिशय चुकीचीच आहे. निदान मायबोलीवरच्या लेखांची अशी उचलेगिरी थांबवायला हे आपण करू शकतो.....

आणि शक्य तिथे आपण उघड्पणे या धाग्याची लिंक देउया म्हणजे कुठे कुठे इथले लेख उचलले गेलेत याची रितसर नोंद राहील आणि या उचलेगिरीला आळा बसेल......

मितान, अकु..... मला वाटते तुमच्यापासूनच सुरुवात होऊ द्या.
लेख कुठे आणि कोणाच्या नावाने छापला गेला ते उघडपणे लिहा...... त्यानंतर जरी तो लेख्/कविता डिलिट केली असेल तरीही तशी नोंद इथे करा की आता लेख्/कविता डिलिट केलेली आहे.... पण मूळ लिंक आणि व्यक्तीचे नाव मात्र तसेच राहू देत, जोपर्यंत सदर व्यक्ती इथे किंवा मेलने मूळ लेखकाची माफी मागत नाही......

सहज मनात आले म्हणून उपद्व्याप करतोय... कोणाला कितपत पटतायत... तुमच्यावरच सोडतो....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोर म्हणू नका हो... अहो त्यांना माहिती देखील नसेल, हाता खालील लोकांनी केलेल्या चुकीला त्यांना का जबाबदार धरता ? त्यापेक्षा त्यांना कळवा लगेच अ‍ॅक्शन घेतील साईटचे नाव खराब होत आहे असे समजल्यावर Happy

प्लिज "चोर" हा शब्द असा डायरेक्ट वापरू नका, त्यांचे देखील काही अधिकार आहेत.

राजला अनुमोदन..... मी तेच लिहिलय........ कल्प्रिट कोण हे नक्की केल्यावर ते नाव बोल्ड करुया.... आणि लगेच अश्या साईटच्या मालकाला मूळ लेखाचा धागा पाठवून देऊया...... जेणेकरून उगाच निर्दोष साईट मालकाचं नाव खराब नाही होणार????? Sad

मी त्यांना फेबुवर मेसेज टाकलाय.... ते माझ्या फ्रेंड लिस्टमध्येही आहेत, अनेक पत्रकार वगैरे त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये दिसत आहेत.... त्यामुळे ते अशी उचलेगिरी करतील असे वाटत नाही. त्यांना सांगितलं आहे, ज्या व्यक्तीने / आयडीने ते लेख पोस्ट केलेत त्यांच्यावर त्वरित अ‍ॅक्शन घ्यायला. बघूयात....

मला नाही वाटत कुठली साईट, स्वतःच लिहिलेल्या साहित्याबद्दल फारसा आग्रह धरते. मायबोलीच्या अटी आणि शर्ती, बर्‍याच दिवसात वाचल्या नाहीत. पण इथे स्वतःच लिहिलेले साहित्य प्रसिद्ध करावे, अशी फक्त अपेक्षा व्यक्त केलीय (असे वाटते.)
साईटच्या प्रशासनानेच, प्रत्येक लेखकाकडून हे साहित्य / कलाकृति माझीच आहे, अशा टाईपचे ई-प्रतिज्ञापत्र घ्यावे काय ?

मला आत्ता एक मेल आलीये...त्यात

http://mbtest.maayboli.com/node/18128?page=3

योगेशचे हे फोटो आणि त्याचा मजकूर जसाच्या तसा आला आहे.
नशिबाने योने फोटोंवर वॉटरमार्क दिले आहेत. पण पूर्ण मेलमध्ये त्याच्या नावाचा कुठलाही उल्लेख नाही

आशुचँप इमेलमधून अशी फॉर्वर्डस येतच राहतात. जोवर ती साईट राइट क्लिक करून त्यावरील कोणतेही साहित्य सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करण्याची नाकाबंदी करत नाही तोवर ही गोष्ट होतच राहणार! त्यासाठी त्या त्या साइटने तशी खबरदारी घेणेही आवश्यक आहे असे वाटते.
जर ही कॉपी-पेस्ट करण्याची सुविधा बंद केली तर मला नाही वाटत कोणी तो लेख/ कविता आपल्या नावासह पुनश्च टायपायचे कष्ट घेऊन आपल्या नावावर खपवायला जातील असं!

http://mbtest.maayboli.com/node/18128?page=3

This is the original document of this mail. I feel the person who has clicked these snaps and given brilliant captions should get the credit for that. The mail doesn't contain his name. So pls forward this reply who has forwarded to you so that he or she can know that they are doing injustice to the man behind this.

या मेलमध्ये पाठवण्यात आलेले फोटो योगेश जगताप याचे आहेत. आणि फोटोंवरील वॉटरमार्क सोडता त्याच्या नावाचा या मेलमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. तरी कृपया ज्यांनी तुम्हाला ही मेल पाठवली त्यांना हे उत्तर पाठवा जेणेकरून या प्रकाराला आळा बसू शकेल. आपण फॉरवर्ड करताना फार विचार करत नाही पण लक्षात घ्या ज्याने कष्टाने हे फोटो काढलेत आणि त्याला साजेश्या ओळी देण्यासाठी मेहनत घेतली आहे त्यावर आपण नकळत अन्याय करतोय.
=====================================================================

ज्याच्याकडून मला ही मेल आली होती त्याला मी ही अशी मेल पाठवली.

त्याने ती त्याला ज्याच्याकडून आली होती त्याला पाठवली. आणि तासाभराने मला हे उत्तर आले..

---------- Forwarded message ----------
From: Ganesh Datkhile
Date: 2011/2/4
Subject: about yogesh jagtap's photo ---

जो पर्यंत एखादी गोष्ट तुमच्या कडे असते तो पर्यंत तुमचा त्याच्या वर हक्क राहतो.

तुम्ही एकदा ऑन लाईन तुमचे फोटो सबमिट केले किंवा कुठे पब्लिश केले तर तुमचा त्यावर चा हक्क राहत नाही तसेच तुम्ही त्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत की त्यावर आमचे नाव टाकाच असे हि सांगू शकत नाहीत.

नाही तरी त्यावर तुम्ही वाटर मार्क केलेला आहे तसे करण्या पासून तुम्हाला कोणी आक्षेप घेतलेला तर नाहीये ना !!

गणेश दाताखिळे ,
दैनिक पुण्य नगरी, मुंबई.

===================================================================

to datkhile@gmail.com
date Fri, Feb 4, 2011 at 8:28 PM
subject about yogesh jagtap's photo
mailed-by gmail.com

महाशय, आपण सायबर लॉ चा अभ्यास केलेला दिसत नाही. आपण वार्ताहर असूनही असा प्रश्न उपस्थित करावा याचे आश्चर्य वाटते. ऑन लाईन कुठलाही मजकूर, छायचित्र टाकणे म्हणजे ते मुक्त वापरासाठी उपलबद्ध होते असा तुमचा जो गैरसमज आहे तो कृपया काढून टाका. किमान एकदा तरी कॉपीराईट म्हणजे काय हे वाचा.
नाही तरी त्यावर तुम्ही वाटर मार्क केलेला आहे तसे करण्या पासून तुम्हाला कोणी आक्षेप घेतलेला तर नाहीये ना !!
इतके हास्यास्पद वाक्य दुसरे कुठले नसेल. अहो, किमान ते केले म्हणूनतरी लगेच ही चोरी उघडकीला आली. तेही टाकले नसते तर खुशाल आपले नाव टाकायलाही कमी केले नसते या इंटरनेट भुरट्यांनी.
असो, वेळ मिळाल्यास मी जे म्हणालो त्यावर विचार करा.

.

घ्या आता........
आता ह्या दातखिळेची दातखिळी कशी बसवायची???? Angry

वर उद्दामपणे बोलतोय, अर्धवट डोक्याचा पत्रकार........ ह्यांचे लेख तरी असेच इकडून तिकडून दुसर्‍यांचे वाचून ढापलेले नसतील कशावरून???? Angry खपवतायत बिन्धास्त स्वतःच्या नावावर.... !!!

लेख पण इकडचे तिकडचे ढापलेले सापडतात... इथलाच एक लेख लोकसत्तात लेखकाच्या नावाशिवाय दुसर्‍याच व्यक्तीनी छापला होता....

मायविश्व व ग्लोबल मराठी वेबसाईटच्या मालकांचे आत्ताच मला फेबु वर आलेले हे उत्तर :

Mandar Joglekar February 4 at 10:51pm

Namaskar,

Thank you for your message. We will take appropriate action. In mean time please send me link of your article of Maayboli - Sanyukta so that we can let the blogger know about your original link.

Thank you for your support to www.GlobalMarathi.com

Regards,
..Mandar Joglekar
Founder & CEO MyVishwa.

यांना उत्तरादाखल माबोवरची माझ्या लेखाची लिंक पाठवून दिली आहे.

आशु, मनापासुन धन्स रे :-), तुझा इमेल खरच चपराक आहे.

कालच भ्रमरने मला याबद्दल ईमेल केला होता आणि तेच इथे लिहायला आलो असता हे वाचनात आले. यापूर्वीही माझे "भर पावसात......माळशेज घाटात", "जाता सातार्‍याला", "गडकोटांचा महाराष्ट्र माझा" इ. इमेलवरुन इथे तिथे फिरत होते आणि दुर्दैवाने त्यावर मी वॉमा टाकले नव्हते. यापैकी माळशेज घाटातला एक फोटो तर चक्क इ-सकाळच्या "आठवा रंग" या विभागात "धुके" या विषयांतर्गत एका महाभागाने स्वतःच्या नावावर प्रदर्शित केला होता. इ-सकाळ आठवा रंग विभागाच्या प्रमुखाला तीन-चार वेळा इमेलवरून याबाबत मी स्वत: कळवले होते पण त्यांच्याकडुन साधा रिप्लायही आला नाही. माळशेजचेच फोटो एकाने त्याच्या ब्लॉगवर जसेच्या तसे टाकले होते आणि सौजन्य कुणा दुसर्‍याच्या नावाने दिले होते. मायबोलीवर मी त्याची लिंक दिली होती त्यावेळी आपल्या काही मायबोलीकरांनी त्याला इमेल करून खडसावले होते. त्यावर त्याचे मला आलेले उत्तर कि हे फोटो मला फॉर्वर्डेड ईमेल मधुन आले आणि ज्याने पाठवले त्याचे नाव मी सौजन्यमध्ये टाकले आहे. त्या व्यक्तीने ताबडतोब दिलगिरी व्यक्त करून त्या फोटोंखाली माझे नाव टाकले. सध्याही त्याच्या ब्लॉगवर ""भर पावसात......माळशेज घाटात" याच शिर्षकांतर्गत हे सगळे फोटो आहेत पण आता फोटोखाली माझे नाव आहे. Happy

रच्याकने, यापूर्वी मी माझ्या फोटोला वॉटरमार्क टाकत नव्हतो (कारण त्यामुळे कुठेतरी मूळ फोटोच्या सौंदर्याला धक्का लागतो हे माझे मत "होते" :-), पण या सगळ्या प्रकारानंतर मी माझ्या सगळ्याच फोटोंना आता वॉटरमार्क टाकतोय.) Happy

भुंगा, मनापासून धन्स हा धागा उघडल्याबद्दल! राज आणि इतर माबोकरांनी दिलेली माहीती खरंच महत्वपूर्ण आहे.
१ सावधगिरी, लेख माबोवर(कारण लेखकांच्या साहित्यासाठी यापेक्षा सुरक्षित सांकेतिक स्थळ दुसरे अजुनपर्यंततरी मला सापडले नाही आणि यातील जागरूक सहकारी तत्परतेने योग्य ते सहकार्य, सल्ला वेळोवेळी देतच असतात.) किंवा वृत्तपत्रात/ इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित केल्याशिवाय इंटरनेटवर (सोशल मिडीया/ ब्लॉग्ज) टाकूच नये. आणि टाकले तरी माबोवरील वा त्या छापील स्वरूपाचे संदर्भ द्यावेत. थोडातरी आळा बसू शकेल त्यामुळे या प्रकाराला!

फोटोच्या संदर्भात, यापूर्वी मी माझ्या फोटोला वॉटरमार्क टाकत नव्हतो (कारण त्यामुळे कुठेतरी मूळ फोटोच्या सौंदर्याला धक्का लागतो हे माझे मत "होते" >> जिप्सी, माझे अजूनही तेच मत आहे Happy पण दुसर्‍याचे श्रेय परस्पर लाटणार्‍यांची लाटच आहे आणि नेटमुळे ती सर्वदूर पसरण्यास मदतच झाली आहे, त्यामुळे आपणच खबरदारी घेतलेली बरी!

मी वेब एजन्सीत काम करते. ज्या साईटचे मार्केटिंग करायचे, त्यावरील डिझायनर ड्रेसचा त्या मॉडेलसहीत फोटो दुसर्‍या कॉम्पीटेटर कंपनीच्या साईटवर बघितला. मेल टाकलं आमच्या क्लायंटला... पुढे काय प्रोसिजर केली माहीत नाही... आम्ही आधीच सांगितलेलं वॉटरमार्क्स टाका, पण हाय प्रोफाईल शोकेस खराब होईल म्हणून नव्हते टाकू दिले. छोट्या कंपनीतील वेबसाईट डिझायनर्स बहुदा गुगलवरून उचलतात. जरी वॉटरमार्क असेल तरी फोटोशॉपमधल्या स्टँपिंगसारख्या करामतीने तो गायब होतो... त्यामुळे, मेहनतीने जे फोटो काढता त्यावर ते खराब दिसले तरी मध्यभागीच (सेंटर एरिया) वॉटरमार्क टाका कारण तो स्टँप करणं थोडं अवघड जातं. (निष्णात चोर भरपूर वेळ हाताशी असेल तर त्यावरही 'हातकी सफाई' करतो ती वेगळी गोष्ट!!)

ते खराब दिसले तरी मध्यभागीच (सेंटर एरिया) वॉटरमार्क टाका कारण तो स्टँप करणं थोडं अवघड जातं. (निष्णात चोर भरपूर वेळ हाताशी असेल तर त्यावरही 'हातकी सफाई' करतो ती वेगळी गोष्ट!!)
>>>>>सहमत Happy

भुंग्या,
लई भारी !!
तुर्त तुझ्या काही आवडत्ं आणि गाजलेलं लेखन मला पाठवुन दे....वाचण्यासाठी !
Lol

जिप्सी..काय अशक्य अवघड आहेत ही माणसे...
आणि एवढे बोलूनही काय उपयोग नाही...
गेंड्याची कातडी...
हे बघ मला काय रिप्लाय आलाय ते

Ganesh Datkhile
to आशिष फडणीस
date Sat, Feb 5, 2011 at 11:49 AM
subject Re: about yogesh jagtap's photo
mailed-by gmail.com
signed-by gmail.com
hide details 11:49 AM (4 hours ago)
महाशय,
तुम्हाला जर कॉपीराईट आणि सायबर लॉ कायदा वापरायाचाच असेल तर त्या व्यक्ती ची स्वताची वेबसाईट बनवावी नी त्या वर कॉपीराईट आणि सायबर लॉ वापरावा. तुम्ही तुमचे फोटो १०० जणांना फोरवर्ड करणार नी ते १०० जण आणखी १०० जणांना फोरवर्ड करतात.दिवसा ला तुम्हाला शेकडो मेल येत असतील तुम्ही त्या सगळ्यानचे कॉपीराईट चेक करत बसणार का ?
वस्तुतः हि जबाबदारी ज्याची बौद्धिक संपदा म्हणजेच ह्या प्रकरणात फोटोग्राफर ची आहे. तुम्ही १०० X १०० लोकांचा कॉपीराईट पाठपुरावा करणार कसा ?

अरे बाबांनो, सगळे गंगार्पणमस्तू करुन टाका बरं. माझे काय, तूझे काय, सगळे आपलेच.
आता उद्या म्हणाल, योगेशने एखाद्या डोंगराचा फोटो काढला, त्यावेळी त्या डोंगराला विचारले होते का ? त्याचा नाही का हक्क बनत !!

आणि त्या "सौंदर्य" च्या चित्रकाराचा तर धराच पण त्या ललनेचाही नाही का हक्क त्यावर ? योगेशने स्मिता पाटिलचे नाव घेतलेय, म्हणजे उद्या मुन्ना म्हणजे प्रतीक पण वारसाहक्क सांगणार.
झालंच तर चित्रपटनिर्माती म्हणून उषा मंगेशकर, गोनिदा.. अरे बापरे... यादी वाढतच चालली की.

आशु, जाऊ दे सोडुन दे :(, पण खरंच तुझे मनापासुन आभार.

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. Happy

दिनेशदा Proud

सगळे गंगार्पणमस्तू करुन टाका बरं>अगदी अगदी Happy

दिनेशदा नाही पटलं. जर कुठे असे कॉपिराईट इन्फ्रिंजमेंट आढळले तर त्याबद्दल बोलायलाच हवे.
<<आणि त्या "सौंदर्य" च्या चित्रकाराचा तर धराच पण त्या ललनेचाही नाही का हक्क त्यावर >>> आहे तर. म्हणुन तर मॉडेल रिलिज फॉर्म्स असतात.

सावली, पण नेटवरचा प्रसार आवाक्याबाहेर गेलाय आता. अगदी १०० गुणिले १०० काय त्यापेक्षा जास्त प्रसार असतो.
(पण मी वरचे पोस्ट उपहासाने लिहिले होते. एका अर्थाने बघितले तर आशूचँपला आलेल्या इमेलमधे लिहिलेले खरेही आहे. )

माझे जूनेच लेख मला फॉरवर्ड मधून येतात. त्याचा सोर्स ही नाही सांगता येत कारण प्रत्येकजण, सर्वच लिंक फॉरवर्ड करेल असे नाही.
इथे फोटो देताना, आपण थोडे एडीट करुन देतो, मूळ फोटो आपल्याकडेच राहतो, एवढ्यातच समाधानी असतो मी.

तुम्ही तुमचे फोटो १०० जणांना फोरवर्ड करणार >>>>हे फोटो मी मायबोली व्यतिरीक्त कुणालाही फॉरवर्ड केलेले नाहीत, हे त्या महाशयांना सांगितले पाहिजे.

जोवर ती साईट राइट क्लिक करून त्यावरील कोणतेही साहित्य सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करण्याची नाकाबंदी करत नाही तोवर ही गोष्ट होतच राहणार!>>>>>>>यावर अरूंधतीजींचे हे म्हणणे पटते.

अगदी उपयुक्त चर्चा आहे.
ऑनलाईन मिडियामधे ह्या चोरीप्रकरणांना आळा घालणं खरंच खूप कठीण आहे. फोटोग्राफ्स, पॅरेग्राफ्स, आख्खे लेखही सर्रास चोरतात. प्रिन्टमिडियामधेही प्रतिष्ठीत वृत्तपत्रांच्या पुरवण्या, मासिकेही कव्हरस्टोर्‍या जशाच्या तशा उचलतात आणि छापतात. इंग्रजीतलं ढापतात तो भाग वेगळाच पण मराठीतल्या वर्षभरही जुन्या झाल्या नसलेल्या लेखांना चोरतानाही त्यांना काही दिक्कत नसते. अर्थात बरेचदा त्यांना माहीतच नसते आणि लेखक(?) हे कारभार परस्पर करत असतात हेही खरय. पाचसहा वेळा हा अनुभव मला येऊन गेलाय. सुरुवातीला मेल्,कॉल्स वगैरे करुन दाद मागायचा प्रयत्न केला पण दिलगिरी व्यक्त करुन नुसते मोकळे होतात. अधिक पाठपुरावा करायला आपल्याला वेळ होत नाही त्यामुळे मग राहून जातं पुढची कडक अ‍ॅक्शन घ्यायचं. ऑनलाईन मिडियात निदान राईट क्लिकला अटकाव करुन आळा घालण्याची सोय आहे त्याचा जास्तीतजास्त फायदा घ्यायला हवा.

चोरलेला मजकूर सार्वजनिक संकेतस्थळावर आला तरच तूम्हाला दिसणार ना ? खाजगी इमेल्स मधून फिरत राहिला तर ?
माझ्या सख्ख्या मावसआजीच्या शोकांतिकेबद्दल मी मायबोलीवर एक कथा लिहिली होती (झालं ते एका अर्थी ... या नावाची ) त्यात चित्रपटक्षेत्रातील काही व्यक्तीरेखांचा थेट उल्लेख होता. काही वर्षानंतर माझ्याच ऑफिसमधल्या एका मूलीने, त्या कथेबद्दल मला सांगितले. तिला ज्या व्यक्तीने ती कथा पाठवली होती, त्याने स्वतःच्या आजीची कथा म्हणून लिहिली होती.. आता बोला.

कॉपी पेस्ट या अगदी प्राथमिक सोयी आहेत. त्या राहणारच. प्रत्येक पान पी डी एफ प्रमाणे तयार व्हावे, त्यावर मायबोलीचा वॉटरमार्क असावा. आणि तरीही त्याला जास्त जागा लागू नये, एवढे तंत्र विकसित व्हावे लागेल.
पूर्वी काही शूरवीर, दुसर्‍या एका संकेतस्थळावरील मराठी गाणी, त्यांच्या लोगोसकट मायबोलीच्या अनंताक्षरी वर टाकत असत..

कॉपी-पेस्ट होत नाही म्हटल्यावर वाचून टाईप करायचा पर्याय असणारच उचलेगिरी करणारांना.

चोरी ही होणारच, कॉपी थांबवण्यासाठी तुम्ही सगळे म्हणत आहात तसा कोड जरी वापरला तरी इतर पर्याय खूप आहेत, येथे सांगत नाही कारण चोर बुध्दीचा व्यक्ती देखील हे वाचत असेलच व त्याला माहिती असेल की नाही हे माहिती नाही, पण माझ्याकडून त्याला फुकट शिक्षण देऊ मी Wink

बाकी जागृत रहा, एखादा लेख चोरलेला दिसत असेल तर कमीत कमी तेथे लिहा, व लेखकाला कळवा जे जमेल तेवढे नक्की करा.

गजानन, उचलेगिरी करणार्‍याला तेवढा पेशन्स हवा! Wink असो, सीरियसली, इथे प्रकाशित होणारे लेख आधी कोठे प्रसिध्द झालेत का (आंतरजालावर) आणि येथील लेख / कविता अन्य ठिकाणी कॉपी पेस्ट करता येणार नाही अशा तर्‍हेचे सॉफ्टवेअर / सुविधा असल्यास मायबोलीवर त्याचा उपयोग करायला हवा.

बायदवे, मला मंदार जोगळेकर (ग्लोबल मराठी, मायविश्व मालक) यांचा फेबुवर संदेश आलाय की आम्ही त्या माझा लेख स्वतःच्या नावावर खपवणार्‍या ब्लॉगरवर योग्य ती अ‍ॅक्शन घेतोय म्हणून.

वा अकु,
मस्त. चांगली सुरुवात झाली म्हणायची...... निदान एवढी तरी "सजगता" प्रत्येक साईटमालकाने दाखवावी जेणेकरून मूळ लेखकाला श्रेय मिळेल आणि ह्या चोर्‍या काही प्रमाणात (निदान मायबोलीकरांच्या) थांबतील....... Happy
मंदार जोगळेकरांचे आभार.

Pages