लेखनचोरांची ऐशीतैशी........

Submitted by भुंगा on 4 February, 2011 - 02:59

मितानचा "माझे लेख चोरले गेलेत" हे वाचून असा धागा काढायची इच्छा झाली. यापूर्वीही अश्याप्रकारच्या लेखनचोर्‍या इथे उघड झालेल्या आहेत. मायबोलीकरांपुरते हे थांबवायचे असेल तर असा काही तरी उपक्रम राबवायलाच हवाय. कारण बर्‍याचदा आपल्या विरोधात आरडाओरड झाल्यावर सरसकट दुसर्‍याचा लेख चोरणारा तो लेख डिलिट करून नामानिराळा रहायचा प्रयत्न करतो. पुढे मूळ लेखकाला मनस्ताप झाला तरी काहीच करता येत नाही.

निदान मायबोलीवरचे असे लेख दुसर्‍याने कोणी आपल्या नावाने खपवायचे नसतील तर, इथे त्या माणसाची लेखनचोरी जाहिरपणे मांडुयात........ म्हणजे जरी त्याने ते लेख डिलिट केले तरी इथे त्याबद्दलची माहिती कायम स्वरुपात नावासकट आणि लिंकसकट राहील. आणि सदर व्यक्तीने इथे जाहिर दिलगिरी व्यक्त केल्याशिवाय इथले त्याचे नाव डिलिट केले जाणार नाही.

कारण जाणते - अजाणतेपणी झाले तरी हे करणार्‍याला पुरेपूर माहित असते की आपण दुसर्‍याचाच लेख किंवा कविता स्वतःच्या नावावर खपवतोय...... ही वृत्ती अतिशय चुकीचीच आहे. निदान मायबोलीवरच्या लेखांची अशी उचलेगिरी थांबवायला हे आपण करू शकतो.....

आणि शक्य तिथे आपण उघड्पणे या धाग्याची लिंक देउया म्हणजे कुठे कुठे इथले लेख उचलले गेलेत याची रितसर नोंद राहील आणि या उचलेगिरीला आळा बसेल......

मितान, अकु..... मला वाटते तुमच्यापासूनच सुरुवात होऊ द्या.
लेख कुठे आणि कोणाच्या नावाने छापला गेला ते उघडपणे लिहा...... त्यानंतर जरी तो लेख्/कविता डिलिट केली असेल तरीही तशी नोंद इथे करा की आता लेख्/कविता डिलिट केलेली आहे.... पण मूळ लिंक आणि व्यक्तीचे नाव मात्र तसेच राहू देत, जोपर्यंत सदर व्यक्ती इथे किंवा मेलने मूळ लेखकाची माफी मागत नाही......

सहज मनात आले म्हणून उपद्व्याप करतोय... कोणाला कितपत पटतायत... तुमच्यावरच सोडतो....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा चांगला आहे
पण काही जणांचे लेख चोरीला गेलेही असतील, जातीलही परंतु आपल्याला ईतर वेबसाईटवर जायला वेळच कोठे मिळतो.
परंतु मला वाटते कोणी कोणाचे लेख, कविता वाच्यल्यावर त्या लेखकाचे नांव अगोदर लक्षात असल्यास व तेच लिखान दुसर्‍याचे नावावर पाहिले असल्यास तेही कळवावे ही विनंती
धन्यवाद

मामी, इथे फक्त लिंक टाकायच्या..... त्या "चोराच्या" नावासकट. मग स्वाभाविक तो लेख डिलिट करेल, पण इथे माहिती राहिलच......... बघुया ना, जनाची नाय मनाची लाज राखून काही फरक पडतो का???

प्रभावीपणे वापरले आपण, तर नक्कीच फरक पडेल...... Happy

मायबोलीवरचे लेख चोरले तर उघडपणे "ईज्जतीचा पंचनामा" होतो हे जरा पसरू द्या की मार्केटमध्ये Proud आणि या धाग्याच्या लिंक्स फिरवायच्या महाजालावर..... हा.का.ना.का. Happy

मुकू, लेखनचोरी उशीरा लक्षात आली की आपण योग्य ती अ‍ॅक्शन घेतोच, जी मितान, अकु यांनी घेतली....

हा पर्याय म्हणजे त्या जोडीला करायचा आणखी एक उपाय आहे.

ते त्यांचे स्वतःचे लेख चोरीला गेल्यावर लिहीले
पण ईथे दुसर्‍याचे गेले तरी अ‍ॅक्शन घ्यावी ही अपेक्षा

http://www.marathiadda.com/profiles/blog/list

या साईटवर असंख्य लेख चोरलेले आहेत. काही>चे लेखक कवी माझ्या ओळखीचे आहेत. म्हणजे त्यांचे साहित्य मिसळपाव, मीमराठी इथे आधीच प्रकाशित झाले आहे.

आत्ता या क्षणी झेंडा मराठीचा ही कविता जी चार दिवसांपूर्वी मिपावर प्रसिद्ध झाली होती ती स्वतःच्या नावार कोणीतरी छापली आहे. गंमत म्हणजे त्याखालचा प्रतिसाद संपादित करण्याचे कष्टही चोराने घेतले नाहीत !

माझ्या अनुवादित बालकथा मी केलेल्या आरडाओरड्यानंतर डिलीट केल्या आहेत. पण ती पल्लवी शेलार नावाची बाई कोण आहे की अ‍ॅडमिनचाच डु आयडी आहे हे कळायला मार्ग नाही. मी दोन तीन मेल करूनही दिलगिरीचा मेल आलेला नाही.

हा डोमेन (http://www.marathiadda.com) लहु गावडे याच्या नावावर रजिस्टर्ड दिसतोय हु इज लुकअप वरुन त्यावर lahu48@gmail.com असा विरोप पत्ता दिसत आहे.

ही माहिती जरा तुम्हाला उपयोगी पडेल.

आंतरजाल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा

बाकी, कालची शोधाशोध मी जेव्हा सुरू केली तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की मराठीअड्डा हे मुलांनी चालू केलेले संकेतस्थळ आहे त्यांना काही करुन कंटेन्ट हवे होते म्हणून त्यांनी उचलेगिरी केली असावी ( प्राथमिक मत).
पण मायविश्व / ग्लोबल मराठी सारख्या प्रोफेशनल संकेतस्थळावर असे उचलेगिरी केलेल्या लेखांची संख्या खूप आहे याचे नवल वाटले.

मी मराठीवर देखील असे कोणीतरी मध्ये मध्ये येत असतं, दुस-याचे लेखन स्वतःच्या नावावर खपवायला.. पण माझा स्वतःचा वापर अनेक संकेतस्थळावर नियमित असतो त्यामुळे चोरी लगेच पकडली जाते व धागा काढून टाकला जातो. पण तरी ही काही धागे नजर चुकीने राहिले तर ते सदस्यांनी कळवल्यावर लगेच आम्ही कार्यवाही करतोच.. जेवढ्या लवकर होईल तेवढा. तसे ही मी मराठीवर डुप्लिकेट आयडी शोधक प्रणाली असल्यामुळे आम्ही असे डुप्लिकेट आयडी लगेच बॅन करतो हे सागण्याची गरज नसावी.

अजून काही मदतीची अपेक्षा असेल तर मी येथे आहेच.. जरूर विचारा नक्की प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

माझा मायबोलीवर संयुक्ता मधून प्रकाशित झालेला लैंगिक शोषण विषयीचा लेख ग्लोबल मराठी ह्या साईटवर ''राज'' नामक लेखकाच्या नावे दिसत आहे. त्याची ही लिंक : http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5348232073854399108...

हाच लेख माय विश्व नामक साईटवर ''ड्रीम्स फॉरेव्हर ब्लॉग'' मध्ये ''राज'' नामक लेखकाच्या नावे दिसतोय :

http://www.myvishwa.com/public/PublicBlog/readblog/5348232073854399108

अरुंधती, मायविश्व व ग्लोबल मराठी एकच साईट आहे ( मालक एकच आहे)
त्यांचा ईमेल पत्ता हवा आहे का ?

व तो "राज" म्हणजे मी नव्हे बरं का ::D

इथे डॉक्युमेंट करुन ठेवायचे असल्यास त्या लेखाचा स्क्रिन प्रिंट घ्या आणि इथे टाका. म्हणजे त्या चोरीचे प्रुफ सुद्धा इथे राहिल.

पंत, त्यासाठीच हा खटाटोप....

कृपया इथे फक्त लिंक टाका. संबंधित मूळ लेखकाने स्वतःकडे स्क्रीनशॉट्स ठेवावेत.... जशी गरज लागेल तसे ते वापरता येतील.......

राज माझ्या मनात तेच आलं... म्हटलं कहीं ये राज ... वो राज तो नही... Rofl

आमची इतर कुठे शाखा नाही Wink

माझे नियमित दोनच आयडी आहेत जे मी महाजालावर वापरतो. एक राजे अथवा राज जैन D
व तसा ही मी माणसाळलेला असल्यामुळे लपून छपून नसतो... Wink

अरुंधती,

देव भले करतो त्यांचे आता Lol

(अरुंधती यांना माहिती मिळाली आहे व विनाकारण एखाद्याने नाव खराब होऊ नये म्हणून मी स्वत: माझा प्रतिसाद संपादित करत आहे. - धन्यवाद )

अरेच्या, ते पान तर कविता महाजनांच्या फेसबुक प्रोफाईलचं दिसतं आहे........

राज, पुन्हा लिंक द्या बरं.... काहीतरी घोळ आहे!

(अरुंधती यांना माहिती मिळाली आहे व विनाकारण एखाद्याचे नाव खराब होऊ नये म्हणून मी स्वत: माझा प्रतिसाद संपादित करत आहे. - धन्यवाद )

मी जी लिंक दिली आहे तीच लिंक तुम्ही पण दिली आहे, तुम्ही फोटो अल्बमची दिली आहे मी फ्रोफाईलची दिली आहे. वर जे स्क्रीनशॉट दिला आहे डॉक्टर साहेबांनी तेच प्रोफाईल आहे त्यांचे (ग्लोबल मराठीच्या मालकाचे).

भुंग्या,
तुझा उपक्रम चांगला आहे.
महाजालावर साहित्यचोरीचे प्रकार घडत असतात हे अनेकदा ऐकलं आहे.
सतर्कतेने अशा प्रकाराना काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो, हे खरं आहे.

एक नम्र सुचना......

इथे एकदा हमखास लक्षात आलं की "चोर" नक्की कोण की इथे लिहिताना त्या व्यक्तीचे नाव जरा "बोल्ड टाईप" करा......

जरा दुनिया को पता चलने तो दो....... "नावात काय आहे" ते....... Proud Biggrin

(वरच्या बाबतीत साईटमालकाचे नाव बोल्ड नको व्हायला, पण तिथे लेख टाकणार्‍याचे मात्र नक्की करा)

Pages