चित्र संते

Submitted by अजय जवादे on 2 February, 2011 - 11:20

"सर्वांसाठी कला" हे उद्दिष्ट घेउन कर्नाटका चित्रकला परिषद, बंगळूर दरवर्षी चित्र संते (चित्रांचा बाजार) आयोजित करतं. नाव जरी चित्र संते असले तरी इतर कलाक्रुतिही इथे ठेवता येतात. स्थानिक आणि नवीन कलाकरांसाठी ही फारच छान संधी असते. Rs. २५ पासुन Rs. २,००,००० पर्यंत
चित्रे मिळतात. सहसा जानेवारीच्या शेवटच्या रविवारी (एकच दिवस ) हा बाजार असतो.

आणखी माहिति http://www.chitrasanthe.com इथे मिळेल.

या बाजारात, ३० जानेवारी, २०११ ला घेतलेले काही फोटो..

गुलमोहर: 

मस्तच एकदम .
पूर्वी डिसेंबर २५ किंवा ३१ ला होत असे तेंव्हा या प्रदर्शनातून बरीच खरेदी केली आहे. आता तारीख बदलल्यापासून आमची संधी हुकतेय .

इथे कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या आर्ट स्कूलमधली मुलं मुली आपली चित्रं मांडतात. इतर हौशी / निम व्यावसायिक चित्रकार, शिल्पकार असतात. कोल्हापूर, सांगली ची मुलं भेटली होती एक वर्षी. आंध्रा / केरळ मधून सुद्धा काही कलाकार आले होते.

राज्यपाल , मुखमंत्री, सनदी अधिकारी वगैरे पाहणी करायला येतात तेंव्हा थोडा गोंधळ होतो. पण एरवी अतिशय निवांतपणे चित्रं पहाता येतात.

मस्तच.. खूपच छान Happy

असा एखादा बाजार मुंबईत असतो का?>> ५ तारखेपासून काळा घोडा चौकात फिरा म्हणजे अशीच सर्रास चित्रं पहायला मिळतील.. एक आठवडा फेस्टीवल असणारेय..

छान! Happy

अजय, धन्यवाद. अप्रतिम प्रकाशचित्र अन चित्रातली पेंटींग्स सुद्धा. जमल्यास ह्या बाजाराविषयी आणखी माहीती देता येईल काय?

Pages