Submitted by जया एम on 13 January, 2011 - 02:14
गे कांचनमृग मायावी
झोकात मिरवुनी गेले
सीतेचे गहिरे कुंडल
रानात हरवुनी गेले
गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी
राधेय तिच्या हृदयात
धगधगला रक्तखुणांनी
गे उभी कोण काठाला
मोहाच्या ऐन प्रवाही
वनवासी कंथ तियेचा
उर्मिला वाटुली पाही
गे वादळ यमुनातीरी
गोकुळात पाऊस खेळे
राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे
गुलमोहर:
शेअर करा
मस्त जया
मस्त जया
भन्नाट..!!! वनवासी कंथ तियेचा
भन्नाट..!!!
वनवासी कंथ तियेचा >> "कंथ" चा अर्थ काय?? की ते "कंठ" असं आहे.
मस्त.
मस्त.
वेगळीच कविता, कंथ मलाही नाही
वेगळीच कविता, कंथ मलाही नाही कळल...जया सांगणार का?
ते कांत असावं बहुधा. जया?
ते कांत असावं बहुधा. जया?
आवडली
आवडली
शैलजा म्हणते त्याप्रमाणे कांत
शैलजा म्हणते त्याप्रमाणे कांत अस वाचलं.....ब-याच वेळा वाचली आणि कविता प्रचंड आवडलीच
कन्थ याचा अर्थ पती असा आहे.
कन्थ याचा अर्थ पती असा आहे.
ओह, हे नव्हतं माहिती, धन्यवाद
ओह, हे नव्हतं माहिती, धन्यवाद जया.
सुंदर
सुंदर
खुपच छान !!!!!
खुपच छान !!!!!
क्या बात है! सुरेख
क्या बात है! सुरेख कविता!
राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे
हे म्हणजे तर कळसच!
अप्रतिम !
अप्रतिम !
"राधेच्या चिंब मनात कृष्णाचे
"राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे"
....छान
जया एम, पुन्हा एकदा सुरेख
जया एम, पुन्हा एकदा सुरेख कविता. आवडली.
आह! सुरेख! गे पांचालीचे
आह! सुरेख!
गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी '
गे उभी कोण काठाला
मोहाच्या ऐन प्रवाही'
खूप आवडली!
सुरेख, खुप आवडली
सुरेख, खुप आवडली
धन्यवाद. मनापासून आभारी आहे.
धन्यवाद. मनापासून आभारी आहे.
खुप छान आहे
खुप छान आहे
आवडली.
आवडली.
मस्त, आवडली.
मस्त, आवडली.
किती छान लिहितेस ! खूप आवडली
किती छान लिहितेस ! खूप आवडली कविता.
सुरेख!
सुरेख!
वाह!
वाह!
व्वा ! खूप आवडली.
व्वा ! खूप आवडली.
मस्त!!! "शकुनफुलांनी" - हा
मस्त!!!
"शकुनफुलांनी" - हा शब्द आवडला..
सुंदर !
सुंदर !
ही पण छान ! एका दिवसात मी
ही पण छान ! एका दिवसात मी एवढ्या कविता कधी वाचल्या नव्हत्या, ही तुमच्या कवितेची जादु आहे.
अरे काय मस्त...
अरे काय मस्त...
लपलेला खजिना सापडतोय ही पण
लपलेला खजिना सापडतोय ही पण कविता मस्त !!!
Pages