प्रेयस

Submitted by जया एम on 13 January, 2011 - 02:14

गे कांचनमृग मायावी
झोकात मिरवुनी गेले
सीतेचे गहिरे कुंडल
रानात हरवुनी गेले

गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी
राधेय तिच्या हृदयात
धगधगला रक्तखुणांनी

गे उभी कोण काठाला
मोहाच्या ऐन प्रवाही
वनवासी कंथ तियेचा
उर्मिला वाटुली पाही

गे वादळ यमुनातीरी
गोकुळात पाऊस खेळे
राधेच्या चिंब मनात
कृष्णाचे आतुर डोळे

गुलमोहर: 

>>गे पांचालीचे कुंतल
दरवळले शकुनफुलांनी
राधेय तिच्या हृदयात
धगधगला रक्तखुणांनी

एकूणच या विषयावर अशी लिहिलेली कविता आजच वाचतेय्.महान.

चतुरस्त्र पच्चीकारी रचना. प्ररोही गर्भितार्थ एवम शब्दसांभार यांचा ताळ नेटका. ऊठपाय उपांगभूत चरणे एवम चपखल यमकयोजना चलित प्रशंसनीय ! अभिजाय शब्दयोजन सौंदर्यबोधददात भासू देत नाही.

प्रेयस म्हणजे काय ?

खुप विचार केला.

प्रियकर प्रेयकर का नाही

प्रेयसी प्रियसी का नाही

प्रियसी = प्रेयसी

प्रेयस = प्रिय्कर ?

सुंदर कविता.
कवितेचे शीर्षक प्रेयस
म्हणजे आवडते,प्रिय वाटेल असे.
(या जोडीनं येणार शब्द. श्रेयस
म्हणजे प्रिय असेल किंवा नसेल पण हितकर)

सीता, द्रोपदी,उर्मिला आणि राधा
यांची आपापल्या प्रिय व्यक्तीवरील अव्यक्त प्रेमाची व्यथा.
तिची ही नेटकी अभिव्यक्ती..
चौघिंच्या चार छटा...
पण गाभा एकच
प्रेयस.....(पण सामाजिक दृष्ट्या श्रेयस नाही)
झकास....

शकुन फुल
रक्त खुणा
.........ग्रेस आठवला......

अगदी घनव्याकूळ होऊन
चंद्र माधवी प्रदेशात गेलो......

Pages