बालसाहित्य

Submitted by मीन्वा on 11 January, 2011 - 06:10

लहान पणी आज्जीनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवायचा प्रयत्न करत होते..

जावईबुवांची फजिती (काकवीची गोष्ट)
सात आंबोळ्यांची कथा
बोबड्या मुलींची गोष्ट
विसराळू विनूची गोष्ट

सगळ्या इतक्या नीट आठवत नाहीत आणि या कुठल्या पुस्तकात मिळतील तेही माहीत नाहीये.

कुणी लहान मुलांची चांगली विनोदी पुस्तकं सुचवू शकेल का? छोट्या छोट्या विनोदी कथा. ११ वर्षाच्या मुलांसाठी.

मला वाटतं लहान मुलांच्या चांगल्या पुस्तकांची यादीही सध्या उपलब्ध नाहीये. तीसुद्धा इथे करता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिरबलाच्या चातुर्यकथा - राजा मंगळवेढेकर - अनमोल प्रकाशन
इटकू पिटकू - गिरीजा कीर - मेनका प्रकाशन
३०१ हास्यकथा - राजा मंगळवेढेकर - अनमोल प्रकाशन

माझ्याकडे लहानपणी 'दिन्या-मिनीची धमाल' पुस्तक होतं पण दुर्दैवाने आता लेखक आठवत नाहीयेत Sad

माझ्याकडे एक बिट्टू असं कायतरी नाव असलेलं पुस्तक होतं. त्याचंही फारसं काही आठवत नाहीये.
मी लहानपणी "देश नसलेला माणूस" ही गोष्ट ऐकली होती. विनोदी नाहीये पण छान होती. त्याचं पुस्तक नाही बुवा सापडलं कुठे.

ग्रीमच्या परिकथा. अनुवादित ७ पुस्तकांचा संच आहे... प्रकाशन आणि लेखक बघून सांगतो... मस्त गोष्टी आहेत त्यात..

पंचतंत्र
इसापनीती
महाभारत - राजा मंगळवेढेकरांनी लिहिलेले खास लहान मुलांसाठी आहे.
(माझ्याकडे काही एकत्र बाईंड केलेली अशी पुस्तके आहेत.. )

गलिवर
गोट्या
चिंगी
फाफे
टॉम सॉयर
हकलबेरी फिन

ही माझी त्या फेजमधली आवडती पुस्तकं होती. अजून आठवेल तशी लिहिन.

साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी (७-८ पुस्तके आहेत)
>>
मला वाटतं की हा दहा पुस्तकांचा संच आहे. आणि प्रत्येक पुस्तक म्हणजे एक सलग कथा आहे. एका कथेत अनेक प्रकरणे आहेत.

गट्टूला पंख फुटले
अंकल टॉमची केबिन (विनोदी नाहीए.... कृष्णवर्णीय लोकांना अमेरिकेत सुरुवातीला जे अत्याचार सहन करावे लागले त्यांवर बेतलेली कहाणी)
सुंदर वासिलिसा
सूर्यावरचे वारे (विज्ञान माहिती)
हरवलेला रत्नहार
अकबर बिरबलाच्या गोष्टी
तेनालीराम
सिंहासन बत्तिशी
विचित्रविश्व चे अनेक अंक
चंपक, ठकठक, फुलबाग, आनंद, किशोर, चांदोबा ही मासिके
अमरचित्रकथा Happy
चिमणराव व गुंड्याभाऊ (पुस्तकाचे नाव आठवत नाहीए...)