Submitted by कौतुक शिरोडकर on 19 December, 2010 - 05:28
(डॉक्टरांच्या http://www.maayboli.com/node/21999 या गझलेला झब्बू (?))
कागदी घोडे... तया ना खूर आहे
योजना हाती नवी मंजूर आहे
लाभ पॅकेजी.... किती जाहीर झाले
कालचा राजा.... 'बळी' आतूर आहे
कामगारांना कळेना.. काय चुकले ?
बंद गिरण्या अन धुमसता धूर आहे
आज ते 'आदर्श' सारे फोल झाले
ती पहा, दिल्ली.. जवाना दूर आहे
आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे
रे तुक्या, इतुके कसे तुजला गमेना ?
आंधळा दळतोय.... कुत्रा चूर आहे
- कंपाऊंडर कौतुक शिरोडकर
गुलमोहर:
शेअर करा
मस्त जमलंय्...
मस्त जमलंय्...:स्मित:
क्या बात है !!!.... फार
क्या बात है !!!....
फार चांगला झब्बू..... आशयात अक्खी गझल मस्तै...
मस्तच....
मस्तच....:)
ठीकठाक, पण आसवांची पाणथळ हा
ठीकठाक, पण आसवांची पाणथळ हा विडंबनापेक्षा मूळ गझलेसारखा शेर झाला आहे.
अभिनंदन!
-'बेफिकीर'!
आग लावू मी कसा या जीवनाला
आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे
>> हा शेर खूप खूप सुंदर आहे. कौतूक .. अप्रतिम विडंबन.
याला विडंबन म्हणावं का असा
याला विडंबन म्हणावं का असा प्रश्न पडलाय..
असो, मला तरी मूळ गझल जास्ती आवडली.
कौतुक मस्त... आसवांची पाणथळ
कौतुक मस्त...
आसवांची पाणथळ खासच
zabbuu jaast chaaMgalaa
zabbuu jaast chaaMgalaa jamalaay......
तरी म्हणलं आजकाल गुलमोहर ओस
तरी म्हणलं आजकाल गुलमोहर ओस का पडतोय....! कौत्या, ट्पलेलाच असतो ना, एखादी चांगली कविता, गझल पडली रे पडली की याला रान मोकळं
आसवांची पाणथळ साठी भुषणजी आणि
आसवांची पाणथळ साठी भुषणजी आणि मिलींद ह्यांच्याशी सहमत!!
आसवांची पाणथळ - मस्तच आहे शेर
आसवांची पाणथळ - मस्तच आहे शेर हा.
कौत्या, मस्त विडंबन.. पण
कौत्या, मस्त विडंबन..
पण बांडगूळबाजी जास्त करु नकोस रे.
ये बात हुई कौतुक. मला ही
ये बात हुई कौतुक. मला ही सगळ्यात जास्त आवडली रे.
<< कामगारांना कळेना.. काय चुकले ?
बंद गिरण्या अन धुमसता धूर आहे >>
भिडलाच एकदम. प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे असेल कदाचित.
आज ते 'आदर्श' सारे फोल
आज ते 'आदर्श' सारे फोल झाले
ती पहा, दिल्ली.. जवाना दूर आहे
आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे
हे दोन्ही शेर छान आहेत...
actually ही independent गझल म्हणूनच् चांगली आहे...विडंबन as such नको म्हणायला...
विडंबन is not working here
विडंबन म्हणण्यापेक्षा हिला
विडंबन म्हणण्यापेक्षा हिला स्वतंत्र गझल म्हणता येईल..!!
सुरेख..!
आग लावू मी कसा या जीवनाला
आग लावू मी कसा या जीवनाला ?
आसवांची पाणथळ भरपूर आहे >>> खल्लास केलस!!
आणि विडंबन नाहियेच मुळी!
किर्या.