वायफाय का जमाना...

Submitted by जिप्सी on 10 December, 2010 - 00:45

आजच्या लोकसत्ता मध्ये वाय-फाय (वायरलेस फिडेलिटी) सुरक्षिततेवर छान माहिती आली आहे.
सध्या वायरलेस इंटरनेट वापरण्याचे प्रमाण बरेच आहेत आणि त्याचे धोकेही भरपूर आहेत. त्याबाबत हि माहिती मायबोलीकरांसाठी.

सध्या वायरलेस इंटरनेटचा जमाना आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे ठिकठिकाणी वायरलेस इंटनेटचा वापर होऊ लागला आहे. ट्रेन, हॉटेल्स, विद्यापीठे, महाविद्यालये आदी ठिकाणी त्याचा वापर होतोच. त्याचबरोबर एका घरात एकापेक्षा जास्त संगणक किंवा लॅपटॉप असल्याने घरीही वायरलेस इंटरनेटचे प्रमाण वाढले आहे. परंतु, याबाबत अनेक ठिकाणी पराकोटीचा निष्काळजीपणा दाखवला जातो आणि त्यामुळेच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. तुमच्या नेटवर्कमध्ये शिरून त्या नेटवर्कवरून काही मेल पाठविले तर कदाचित काही गुन्हा केलेला नसतानाही तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे हे तंत्रज्ञान कसे काम करते आणि त्याबाबत नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे, हे समजून घेण्याचा हा एक
(लोकसत्ता. दि. १० डिसेंबर, २०१०)

अधिक माहिती:
वायफाय का जमाना...... पण जरा सांभाळून बरं का!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे हां. वाय-फाय वापरणार्‍यांनी काळजी नक्कीच घ्यायला हवी.
जिप्सी, धन्यवाद! Happy

वाराणसी बॉम्बस्फोटासंबंधीचा जबाबदारी ई-मेल अशीच 'वायफाय' टेक्नॉलॉजी हॅक करून पाठवला आहे. Uhoh असे एका न्युज चॅनलवर ऐकण्यात आले.

योगेश धन्स. खरोखर माहितीपुर्ण लेख.

चांगला लेख आहे हा. पण अनेक जण नाही काळजी घेत. मोबाईल, कॅमेराचा फ्लॅश याबाबत पण काही काळज्या घ्यायच्या असतात. त्यापण घेतल्या जात नाहित.

लेख बरा आहे पण एकदमच बेसिक गोष्टी दिल्यात अस वाटतय. वायरलेस सेट-अप करताना नक्की कोणती प्रोटोकॉल/सेक्युरिटी वापरावी ते दिलेले नाही. नितीनचंद्रांना अनुमोदन!!!

खालील लिंकमधे बर्‍यापैकी माहिती असावी,
http://en.wikipedia.org/wiki/Wireless_security
http://technet.microsoft.com/en-us/library/bb878054.aspx