मज्जाखेळ [३-५]: पत्त्यांचे खेळ

Submitted by सावली on 7 December, 2010 - 20:21

पत्ते हे लहान मुलांनी खेळण्याची वस्तू नाही वगरे बरीच मत आमचीपण होती. पण एकदा लेकीच्या डेकेअर मध्ये मुलांना पत्त्यांनी खेळताना बघितले आणि
मग मला जाणवलं कि या असंख्य खेळ खेळता येतील. त्यातले काही इथे लिहितेय.

साहित्य:
एक पत्त्याचा (ट्रम्पकार्ड्स) सेट.

कृती:

लेवल १: अगदी सुरुवातीला ओळख
फक्त रंग आणि आकार ओळखणे. एक एका पत्ता दाखवून विचारयच, कुठला आकार कुठला रंग

लेवल २: निरीक्षण

आकडे सुद्धा बघायचे म्हणजे एका पत्ता दाखवून रंग, आकार आणि अंक सांगायला लावायचं.

लेवल ३: मेमरी गेम

पाच पत्ते सुलटे ठेवायचे. दाखवायचे आणि मोठ्याने बोलायचे हा इस्पिक एक. हा क्लोवर पाचं असं.
मग पत्ते उलटे करायचे. आणि मुलांना विचारायचे क्लोवर पाचं कुठे आहे? किंवा बदाम दहा कुठे असं.
हळूहळू पत्त्यांची संख्या वाढवायची.

लेवल ४: क्रम आणि pattern

आपण बदाम सात खेळतो तसे खेळायचे. १ ते १० बदाम, १ते १० क्लोवहार, १ते१० चौकट, १ते१० इस्पिक असे क्रमाने लावायचे.
आपण सगळ्या पत्त्यांचा संच उलटा ठेवायचा. आणि एक एक पान सुलट करून बघायचे.आणि मुलाने एकं ते १० असे आकडे लावायचे.
सुलट झालेलं पान क्रमात लागतं असेल तर लावायचं नाहीतर स्कीप करायचं. सगळे पत्ते सुलटे झाले कि परत ते उरलेले पत्ते घेऊन सुरु करायचं.
सुरुवातीला राजा, राणी वगरे मुलाना कळत नसेल तर ते वापरायचे नाही.

लेवल ५: मेमरी गेम

सगळ्या पत्त्यांचा संच सुलट करून पसरवायचा बघायचा आणि मग पान उलटी करून त्याचं जागी ठेवायची.
दोघा किंवा जास्त जणांना खेळता येतो. प्रत्येकाने एक एक टर्न घ्यायची.
एक पान उलटायचे ते समजा २ आले तर दुसरे २चे पान कुठे असेल याचा अंदाज बांधून दुसरे पान उलटायचे. दुसरे पान दोनाचं निघालं तर ती पान उचलणाऱ्याकडे ठेवायची (त्याचा डाव.) त्यालाच परत एक टर्न मिळणार.
समजा पान वेगाळी निघाली तर होती त्याचं जागेवर पुन्हा उलटी करून ठेवायची. मग दुसरा टर्न घेणार. हळूहळू कुठली पाने कुठे आहेत हे मुलाना लक्षात रहाते आणि निरीक्षणाची पण सवय लागते.

यात अजुन असंख्य प्रकार होतील. आठवले की प्रतिसादामधे टाकते. तुम्हाला माहीत असलेले पण प्रतिसादात टाका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<पत्ते हे लहान मुलांनी खेळण्याची वस्तू नाही>> बरोबर मी पण म्हणून माझ्या मुलाला ( वय वर्षे ३ ) पत्ते हातात घेतले तरी राग यायचा , पण उगाचच जास्त जबरदस्ती केली तर वेगळाच परिणाम होईल म्हणून मी त्याला सुरूवातीला फक्त रंग ओळखणे, माझा नवरा त्याला मजा म्हणून पत्त्यांचा बंगला बनवून दाखवणे , असे खेळ करायचो.
पण आता तुम्ही दिलेले सगळेच खेळ त्याला शिकवता येतील. Happy