मज्जाखेळ [३-५]: मोठे मणी ओवणे

Submitted by सावली on 7 December, 2010 - 19:34

हा खेळ तुम्ही समोर बसलेले असतानाच खेळायचा. नाहीतर चुकून मुलं तोंडात/नाकात टाकू शकतात. जर तुमचा मुलगा/ मुलगी सगळ्या गोष्टी अजूनही तोंडात घालून बघत असेल तर हा खेळ इतक्यात खेळू नका.

साहित्य:
मोठे आणि मोठ्या भोकाचे मणी.
खूप जाड दोरा. खूप मोठा नको. नाहीतर मुलं गळ्याभोवती गुंडाळून घेतात.

कृती:
- दोऱ्याच्या एका बाजूला एक मणी बांधून टाका म्हणजे ओवलेले मणी पडणार नाहीत.
- आणि मुलांना ओवायाला द्या.
- ओवता येत नसेल नीट, तर दोऱ्याच्या एका बाजूला फेव्हीकोल लावून जरा कडक करा.

अधिक टिपा:
- यातच ओवताना थोडे थोडे अंक मोजून दाखवता येतील.
- patterns करता येतील. म्हणजे चार पिवळे, चार गुलाबी ओव वगरे.

काळजी:
- हा खेळ तुम्ही समोर बसलेले असतानाच खेळायचा. नाहीतर चुकून मुलं तोंडात/नाकात टाकू शकतात.
- याचं कारणासाठी तुम्ही किंवा मुलं झोपालालेली, दमलेली असतील तेव्हा खेळायचा नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा खेळ मला इथल्या डॉलर शॉपमध्ये मिळाला. चक्क शू लेससारखा टोकाला कडक प्लॅस्टिक असलेला दोरा आणि मोठेमोठे वेगवेगळ्या शेप्समधील लाकडी मणी. तोंडात घालायचीही भिती नाही. मुलगा खेळतो अधूनमधून आवडीने Happy

अगो लाकडी मणी रंगित असतील आणि ते चायना मेड अस्तील तर सांभाळुन. चायनाच्या लाकडी खेळण्यांच्या रंगात लेड असल्याच्या बातम्या वाचल्या होत्या.

सावलीला अनुमोदन.
मण्यांऐवजी चिरिओटाईप सिरिअलही वापरु शकता. माझ्या मुलाच्या शाळेत चिरिओ सारखे दिसणारे रंगित सिरिअल द्यायचे. जोडीला मॅनिकोटी, पेने, रिगाटोनी वगैरे पास्ता.