मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल

Submitted by me_surabhee on 11 August, 2008 - 00:30

मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो. मुलाकडे ( आता वय ४ वर्षे ) लक्ष देता यावे म्हणून मी नोकरी सोडली ( घरी सांभाळायला कोणी नाही ) आधी खुप बर वाटल पण आता अस्वस्थ पणा येतो. इतक शिकुन सुद्धा घरी बसलीये असे टोमणे ऐकावे लागतात. घरी कंटाळा येतो मुलगा शाळेत जातो तेव्हा. पुढल्या वर्षी त्याची पुर्ण वेळ शाळा सुरु होईल. तेव्हा आणखीन कंटाळा येईल अस वाटत.
कोणतीही कला नाही की ज्यात मन रमवावे. काही सुचत नाही. पुन्हा नोकरी करायची तर मुलाकडे दुर्लक्ष होईल अस guilty feeling येत. पण मी घरी असल्यापासुन तो जाम खुष असतो. एवढच काय ती जमेची बाजु.
नोकरी करणे किंवा सोडणे निर्णय माझा आहे. नवरा पुर्ण पणे मदत करायला तयार असतो, पण मुलासाठी नोकरी नको वाटते करायला आणि घरी पण बसायला नको वाटत. नशिब नोकरी करायची गरज नाहीये, नाही म्हणटल तरी तो factor पण विचारात घ्यावा लागतो.
मी काय करु? म्हण्जे काय करता येईल की ज्यानी माझा वेळ सार्थकी लागेल ? ( माझ्या आईच्या म्हणण्या प्रमाणे बहुदा सुख मला बोचतय, हेच खर असाव!!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू, बहुधा रूम हीटर्स असतील पण एसी नसेल. असे असावे.

हो बरोबर मैत्रेयी. तसंच आहे.

मुले लहान असतात,तेव्हा खरेच मुलाना पालकांची गरज असतेआणि मुले शाळेत जातात तेंव्हाही.पार्टटाईम जॉब हा सर्वात मस्त उपाय आहे

I dont know I am doing right or wrong

आत्ता काही वेळा पुर्वी मला interview चा call आला, उद्या सकाळी interview आहे. Full Time, 6.5 Hr position with $18/hr and Benefits (15 days Paid leave and 1 Sick leave each month ). ह्या position साठी मी काही महिन्यां पुर्वी Written and Oral Exam देवुन eligibility list वर आले. उद्या चा interview म्हटल तर just formality आहे. मला ८०% खात्री आहे की I will get it पण आम्ही CA तुन NY ला move होतोय. नवर्‍याला तिथे project मिळाला, तो काही दिवसांपुर्वीच NY ला पोहचलाय, तिथे Apartment वैगरे Final झालिय. इथली one month notice 10 Oct 08 ला संपतेय. माझा 10 Oct ला निघण्याचा plan आहे.

गेल्या वर्ष भरात इथे job मिळावा म्हणुन मी खुप प्रयत्न केले पण काही final झाल नाही..... आता इथुन जातेय तर...गेल्या बुधवार पासुन हा ४ job जो मी नाकारला. (आणी काल पासुन हा ३ रा job)

हे सारे job फक्त एक ,interview दुर होते. Application, Resume, Selection for written exam then 1st Oral Interview ह्या पायर्‍या चढुन ज्या last stage ची मी अतुरतेने वाट पहात होते ती आली...४ ठिकाणाहुन पण आता मला ती नाकारावी लागतेय....it is soooo unfair

$15-20/hr जास्त salary नसली तरी to start with its not bad for me...I need 1 break to get started buttt

पैशा पेक्षा नवर्‍या सोबत राहाण हे जास्त महत्वाच वाटतय. आम्हाला ही माझा job असला तर बराच आधार येईल पण नवर्‍याच्या पगारावर काटकसरिने आज वर ३ वर्षे काढलीत पुढेही निघतिल. नोकरी साठी अस दुर दुर रहाण योग्य वाटत नाही काय करु काही सुचत नाही.......एक job असता तर ठिक होत पण ४ job मी नाकारले जाम वैताग येतोय.

Hope NY मध्ये मला job मिळेल आणी आता इथे आणखी Job offer येणार नाही Happy

मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल >>>> नवर्‍या/घरा साठी करियर मध्य केलेले बदल :)..I am very upset Sad Sad Sad

सास,
तुला काय वाटते ते महत्वाचे. NY ला गेल्यावर प्रयत्न करणार असशील तर जास्त विचार करू नकोस.
lease संपल्यावर तुला जर CA मध्ये sharing basis मध्ये राहता येत असेल तर एखाद महिन्यासाठी मिळालेला जॉब करणे उत्तम. त्याचवेळेस तुला NY मध्ये बघता येइल. परत एकदा तुला काय वाटते ते महत्वाचे.

पुन्हा एकदा मदत हवी आहे... घरी बसुन आता जवळजवळ १ वर्ष होईल. परत एकदा जॉब सुरु करावा अस वाटतय. ५,६ महिन्यात मुलाची पूर्ण वेळ शाळा सुरु होईल, मग वेळच वेळ..
एक मोठ्ठा प्रश्न पडलाय... लांब जाऊन मला नोकरी करायची नाहिये.
जवळच्या जवळ मिळेल, पण अगदीच साध प्रोफाईल,( मनाला त्रास होईल ), कमी पगार ( ते चालेल ) अस मिळेल, पण जवळ.
दुसरा विचार येतोय तो फिल्ड बदलायचा. मला ज्यात खूप interest आहे अश्या क्षेत्रात एक कोर्स करायची संधी आहे ( हे माझ्या आत्ताच्या फिल्डशी जरासुद्धा संबंधीत नाहीये ). हा कोर्स केल्यावर मला जस हव आहे तस - जवळपास job मिळू शकेल. काही वर्षांनी मी स्वतः व्यवसाय करु शकेन. आणी २/३ वर्ष काम केल्यावर part time सुद्धा करु शकते.

आता मला प्रश्न पडलाय काय कराव.. हा कोर्सची फी खूपच आहे. तो करून ती recover करायला २ वर्ष तरी जातील.. पण मला खूप आवडेल ह्या क्षेत्रात जायला.

काय करु कळत नाहीये. प्लीज मार्गदर्शन करा...

आवड आहे तर पैशांचा विचार नको करू सुरभी. कोर्स करतांना पैसे परत यायलाच हवे असा हट्ट करू नकोस. आवडीने कोर्स पूर्ण कर. करत असतांनाच त्या फिल्डशी संबंधीत काही करता येत का ते पहा. म्हणजे नोकरीच असे नाही, पण रीलेटेड काम नाहीतर प्रोजेक्ट वगेरे. माझ्या शुभेच्छा..

हे मी कुठेतरी ऐकले आहे. एक मनुष्य असा म्हणाला की जर सरासरी आयुष्यमान ६० वर्षे धरले तर वयाच्या तीसाव्या वर्षी असा विचार करावा की आता हापूस आंबे चाखण्याचे जास्तीत जास्त तीस सीझन शील्लक आहेत Sad या न्यायाने काय करायचे ते ठरवले तर सोपे पडेल Happy

ह्म्म... कालच मी ठरवल की सध्या थांबाव... गेला आठवडाभर विचार करुन
डोक शिणलय अगदी....
फी चा थोडा तरी विचार करायला हवा ( कारण फी ६ आकडी आहे )..

सुरभी, जवळच्या जवळ तुला हवी तशी, साधी नोकरी मिळाली तर सुरुवात कर. कदाचित त्याला थोडा वेळ लागेल पण या गोष्टी लगेच व्हाव्यात असा आग्रह नसावा. थोडे दिवस तुला, तुझ्या घराला, मुलाला तुझ्या नवीन रुटीनची सवय होऊ दे. मग काही दिवसांनी वेळ आणि पैसा याचा विचार करून तुला आवडतो तो कोर्स करायला घे.

आणि जर मुलगा ही तुझी प्रायोरिटी असेल, तर साध्या प्रोफाईल चा मनाला त्रास नको व्हायला. ते काय कायम तसे राहणार नाही. मुलगा अजून थोडा मोठा झाला, की तुला अजून भरपूर स्कोप मिळेल. मुले शाळेत जातात, बाकी ऍक्टीव्हीटीज करतात तेव्हा आपण बर्‍याच गोष्टी करू शकतो. मी स्वानुभावावरून सांगते. माझी मुलं लहान होती तेव्हा मी त्यांना त्रास होणार नाही अशाच नोकर्‍या केल्या. ती शाळेत जायला लागली तेव्हा त्यांच्या शाळेच्या वेळात पार्टटाईम नोकरी धरून पीएचडीला सुरुवात केली.
आता नोकरी पण फुलटाईम आणि चांगली आहे (चांगली म्हणजे पगार भरपूर, प्रचंड मोठी पोस्ट वगैरे नाही पण घराच्या, मुलांच्या शाळेजवळ आहे आणि त्यांच्या सतरा ऍक्टीव्हीटीज सांभाळून, घरकाम इ. करायला वेळ आहे.) आणि पीएचडी होत आलंय.
मुलं अजून मोठी झाली, की अजून जास्त चांगली नोकरी बघेन पण.

सो टेक इट इझी.

>दुसरा विचार येतोय तो फिल्ड बदलायचा. मला ज्यात खूप interest आहे अश्या क्षेत्रात एक कोर्स करायची संधी आहे
कुठलं फिल्ड शोधता आहेत हे सांगता येईल का? तुम्हाला कदाचित त्या फिल्डमधल्या जाणकाराकडून सल्ला मिळू शकेल (तसं कोणी इथे मायबोलीवर असेल तर).

तुम्हाला एखाद्या क्षेत्राबद्दल आवड असणे आणि प्रत्यक्षात तो व्यवसाय/नोकरी म्हणून जमणे यात खूप अंतर असू शकतं (Interest Vs Apptitude)

सहा आकडी फी असेल तर मी ज्यानी प्रत्यक्ष कोर्स केला आहे त्याना विचारल्याशिवाय करणार नाही.

सुरभी
तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच शोधता यावीत म्हणून अजून काही प्रश्न :

त्या आवडीच्या फिल्डमधे सुरवातीला ( ट्रेनिंग नसताना ) कमी पगाराची / अर्धवेळ /इंटर्न अशी नोकरी मिळू शकते का ?

सहा आकडी फी पूर्ण एकदम भरण्याऐवजी काही भाग आता शिकून मग नोकरी शोधून पुढचं ऑन द जॉब शिकता येण्यासारखं आहे का ? त्या शिकवणार्‍या इंस्टिट्युट वाल्यांना 'मी अर्धी फी भरीन अन उरलेली अर्ध्या फीच्या बदल्यात लॅब्स मधे मदत किंवा तत्सम इतर कामे करीन' असे काही सांगता येईल का?

तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते इतर कोणी कमी पैशात शिकवू शकेल का ?

त्या आवडीच्या फिल्ड मधे पुढची २०-२५ वर्षे काम करायची तयारी आहे का ? परत पाच वर्षांनी आवड बदलली तर ? सहा आकडी फी भरून ती वसूल होईल अशी नोकरी मिळणार आहे का ? अन अशा भरमसाठ पगाराची नोकरी मिळाली तर त्याबरोबर असणारी भरमसाठ जबाबदारी ही घर/ मुलं यांच्यासकट पेलवणार आहे का?

वर भाग्याने लिहिलंय ते वाचताना फार सोपं वाटतं. प्रत्यक्षात एक पूर्णवेळ नोकरी अन घर सांभाळणे / मुलांचं संगोपन करणे अन स्वतः काही तरी शिकणे ही फार मोठी तपश्चर्या आहे. याची झळ घरच्या सगळ्यांना लागते. त्याची तयारी आहे का ?

>त्या आवडीच्या फिल्ड मधे पुढची २०-२५ वर्षे काम करायची तयारी आहे का ? परत पाच वर्षांनी आवड बदलली तर ? सहा आकडी फी भरून ती वसूल होईल अशी नोकरी मिळणार आहे का ? अन अशा भरमसाठ पगाराची नोकरी मिळाली तर त्याबरोबर असणारी भरमसाठ जबाबदारी ही घर/ मुलं यांच्यासकट पेलवणार आहे का?

हाच विचार करुन मी विचार बदलला... कदाचीत अस काही कराव हा मी भावनेच्या भरात घेतलेला निर्णय होता. गेल्या काही दिवसात ' अजून घरीच आहेस ??!!! ' हे इतक्या वेळा ऐकलय की मी पुन्हा पूर्वीसारखीच निराश झालीये... काहीतरी करायचच आहे हे डोक्यात भिनल .

तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद.. डोक ठिकाणावर आणायला मदत केलीत.....

अजून घरीच आहेस ?? >>> हा प्रश्न फारसा मनावर नसतो घ्यायचा. मी दहा महिन्याची सुट्टी घेतली होती इशान झाल्यावर. अनेक जणांनी (ज्यात मी नोकरी शोधायला मदत केलेली पण एक होती) इतक्या वेळा हा प्रश्न विचारला. अरे, मी गेली आठ/नऊ वर्ष न थांबता नोकरी करते आहे, राहिले घरी वर्षभर तर काय त्रास आहे Wink आणि आश्रर्य म्हणजे ह्यातलीच काही मंडळी आता, "घरी होतीस तेव्हा इशानची तब्येत छान होती. आता वाळला आहे." असे म्हणतात Uhoh

सुरभी
तु योग्य तेच करते आहेस. निराश होउ नको. मी हि मुलगि झाल्यवर नोकरी सोदली.आता घरीच शेअर्स घेने, विकने करते नेत वर.पुस्तके आहेतच.मुलगि अत्यन्त खुश आहे.नवरा प्रोजेच्त मुले फिरतिवर असतो.आमचे दोघिन्चे स्वताचे एक जग झाले आहे.comp mgt chi PG degree असुन जोब नाहि याचे कधि कधि फील होते.'अजून घरीच आहेस ??!!! ' असे प्रश्न , घरकाम व मुल सन्गोपन याला कमि समजने हे सगले मान्य करुनहि मी म्हनेन कि आपल्या नवरा/मुले व आपन जर यात समाधानी असु तर बाकी सगल्याना मार गोली.
काही वेल धीर धर.मन्दी त खर्चिक कोर्स करने व्यवहार्य आहे का तो ही विचार कर.
माझ्या शुभेच्छा.

सगळ शांतपणे चालल असतांना गोंधळ हवाच असतो न काहीतरी, तसच माझ झाल असाव... अभी सब ठिक है ! Happy धन्यवाद.

कालच्या चतुरंग मध्ये हा लेख वाचला आणी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली अस वाटल,
http://www.loksatta.com/daily/20090307/ch04.htm
तुम्ही पण जरुर वाचा.

ह्या वर्ष अखेरीस 'सेकन्ड इनिंग्स' खेळण्याचा विचार आहे... तो पर्यंत च्या काळात मी आणखीन काय काय करु शकते जे मला पुन्हा नोकरी मिळवायला उपयोगी होईल?? म्हणजे एखादा कोर्स वगैरे... कोणी सांगेल का? माझ्याकडे functional knowledge आहे. तर एखादा computer course करावा का?

माझा प्रश्ण जरा वेगळा आहे. मी पण एका MNC मधे काम करत होते as a software developer. पण लग्न झल्यावर ते भयानक hectic होत होत. म्हणुन Jan मधे job सोडला. तस मला करियर हि change करयच होत. in software only but not as a developer something different. त्या नन्तर मी तसा course हि केला. पण अता job शोधतेय तर मनासरखा नाहि मिळत आहे. कुठलितरि लहनशि company, कमि salary असे mail येतात.

job सोडल्यच वाइट नाहि वाटत पण अता मिळत नाहिये याचा त्रास सुरु झालाय. सगळ कळतय कि मन्दि सुरु आहे, परत पहिल्या पासुन सुरुवात म्हनजे salary कमिच मिळणार(तशी पैशाचि गरज नाहिये पण तरी), पण वळत नाहिये.

depress होत चाललिये हळु हळु. कहि सुचत नहिये.

गेल्या दहा मार्चला मला माझ्या चालू नोकरीत पन्धरा वर्षे पूर्ण झाली! Happy
अनेकानेक कारणान्नी, नेमक्या वेळेस सन्धी येऊनही मी जॉबमधे बदल केला नाही! कारण अर्थातच, कुटुम्बाची जबाबदारी, वाढत्या वयामुळे अन एकखाम्बी तम्बुमुळे धोका पत्करण्याची तयारी नसणे इत्यादी!
याक्षणी, मला नोकरी बदलणे अत्यावश्यक वाटते आहे!
तर, अशा माझे, बदलच न केल्याचे अनुभव देखिल इथेच लिहायचे का?
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

मी अमेरिकेत 2.5 वर्षंपसून H4 वीसा वरआहे. घरिबसुन खूप कनटाळले आहे. (मी बीई एलेक्ट्रॉनिक्स आहे आणि software testing मधे जॉब करत होते भारतात.)
प्राइवेट यूनिवर्सिटीटून MS करयाचा विचार आहे .हि ऑनलाइन डिग्री आहे.
याचा भारतात उपयोग होइल का ? ईथे H4 साठि जो MS चा कोटा असतो त्यात ही डिग्री कन्सिडर हो ते का ?
कोणाला माहिती असेल तर प्लीज़ सांगा. मी द्विधा मँस्थितित आहे. खर्च ही खूप आहे.
Is it worth to do this ? pls help me

Thanks
Rakhee

अहाहा, तुम्हा सर्वांपेक्षा मी कितीतरी सुखी! माझी सौ. मुंबईतल्या कुठल्यातरी प्रसिद्ध कॉलेजातून होम सायन्स नावाचा गूढ विषय घेऊन पास झाली. पास झाल्यानंतर तीन महिन्यांनी ती अमेरिकेत आली. मी तिला विचारले, तू कॉलेजमधे काय शिकलीस? तिने उत्तर दिले जे काय शिकले असेन ते पास झाल्यावर विसरून गेले. आता मला काही येत नाही, काही शिकायची इच्छा नाही. मी तुम्ही मिळवाल तितक्या पैशात घर व्यवस्थित चालवीन. आणि खरोखरच एकूण १८ वर्षे पूर्ण वेळ घरी राहून घर चालवले. मुलांवर चांगली नजर ठेवल्याने तीं पण उत्तम तर्हेने पास झाली, कुठल्याहि वाईट सवयी त्यांना लागल्या नाहीत. माझ्या अतिखर्चिक स्वभावावर नियंत्रण ठेवले. स्वतःचे नसते लाड ठेवले नाहीत.

त्या वेळात, माझी छोटी मुलगी ११ वर्षाची झाली नि तीच म्हणाली, आई, हे काय? मी घरी आले की तू पण घरी असतेस? इतरांच्या आया कुठे कुठे जातात, मग आम्हा मुलींना एकमेकींच्या घरी राहून मज्जा करायला मिळते. म्हणून तिने एकदाची नोकरी धरली!

नाही म्हंटले तरी एकामागून एक मुले अतिशय महागड्या कॉलेजात गेल्याने व सौ. ने पूर्वीसारखेच काटकसरीचे धोरण चालू ठेवल्याने, आज माझी दोन्ही मुले उत्तम प्रकारच्या नोकरीत आहेत. दर आठवड्यात न चुकता आईला फोन करतात, इथे आले की आईशी गप्पा मारतात. आम्हाला सतत सांगतात, की तुम्ही चैन का करत नाही? मर्सिडिज का घेत नाही? क्रुजेसना का जात नाही. आमच्याजवळ आत्ताच तुम्ही साठवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे आहेत, तुमच्यानंतर तुमच्या पैशाची आम्हाला गरज नाहीये!!

आता सौ. नोकरी करते, तिथे आनंदी आनंद आहे म्हणून ती नोकरी अशीच चालू ठेवणार आहे. तिथे तिच्याच वयाच्या सर्व बायका आहेत, इन्शुरन्स कं असल्याने काम जवळ जवळ नाहीच. मग कुणाच्या मुलीची सासू कशी वाईट्ट आहे, नि माझी सून कशी काSही काम करत नाही हो, नि पर्वा मी नवीन प्रकारचा केक केला, काय गंमत सांगू? वगैरे वगैरे. तिला सुट्टीही घ्यायला आवडत नाही. त्यामुळे माझे पण फावते. कारण मी घरीच एम बी ए करत बसलेला आहे गेली आठ वर्षे.

आता आमच्याजवळ तुम्हा लोकांइतके पैसे नाहीत, पण मुले म्हणतात त्याप्रमाणे जे हवे ते घेण्यापुरते पैसे आहेत, भारतात जातो, क्रूजला जातो, लग्नांना जाण्यायेण्याच्या निमित्ताने इकडे तिकडे हिंडतो, बी एम एमला जातो. अजून काय पाहिजे?

थोडक्यात म्हणजे माझी सौ. तुम्हा सर्वांच्या मानाने काहीच शिकली नसेल, पण जे करायचे ते तिने व्यवस्थित केले. नि आता आम्ही सुखात!

म्हणून असे वाटते की उन्हाळ्यात सगळ्या मा. बो. करांना आपल्या घरी बोलवावे, सर्व काही आपण विकत आणून ठेवावे, मा.बो.करांनी नि त्यांच्या मुलामुलींनी नुसती धम्माल करावी!!

झक्की Happy सगळ्यानी अवश्य वाचलच पाहिजे अस पोस्ट. आणि तुमच्या सौ "ग्रेट " असणार आहेत याबद्दल शंकाच नाही.
Oprah म्हणते तस " SAHM's job is the MOST Difficult JOB in entire World"

झक्की Happy
तुमच्या सौन्ना पण सेम असेच वाटते का Wink

माझ्या मनात हाच प्रश्न आला होता Wink पण उन्हाळ्याची आयडीया भारी असल्याने विचारला नाही Proud
झक्की, लाडवाक्का लाडु आणातीलच पण माझ्या लेकाला लाडु ज्युसमधे बुडवुन खायचे असतात तेव्हा ऑरेंज ज्युस नक्की आणा Happy

हो अन गेल्यावेळसारखी वांग्याच्या कापांवर बोळवण करू नका, जरा कोंबड्या वगैरे आणा बार्बेक्यूला Proud

अहो सिंड्रेला, मैत्रेयी, तुम्ही काय पार्ल्याच्या बा. फ. वर आलात असे वाटले काय तुम्हाला?
हे पार्ल्याचे लोक! जिथे जाईल तिथे खा खा!:दिवा:

<<तुमच्या सौन्ना पण सेम असेच (?!)वाटते का >>

निदान ती म्हणते तर खरे, की तिचे चांगले चालले आहे! शक्यतो मी जवळपास नसलो, किंवा तिच्याशी बोललो नाही तर नक्कीच छाSन चालले असते तिचे. कदाचित् हेही सुखी संसाराचे रहस्य असावे, की काही वर्षांनी दोघांनीहि आपापल्या आवडी निवडी सांभाळाव्यात. मी मायबोलीवर तर ती तिच्या संगणकावर हिंदी मराठी सिनेमे गाणी किंवा काय वाटेल ते बघत बसते.

Pages