रडण्यात अर्थ नाही

Submitted by वर्षा_म on 5 December, 2010 - 23:41

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21668

===================================

नाटकीही आता मी, हसण्यात अर्थ नाही
वरवर हे नुसते, बोलण्यात अर्थ नाही

नाही जवळी आता तू, आयुष्य रुक्ष भासे
वाटही आता तुझी, पहाण्यात अर्थ नाही

गेलीस ग सखे तू, सोडुनी डाव अर्ध्याने
नवा डाव आता, मांडण्यात अर्थ नाही

मन बेचैन होते, तुझ्याच विचारांनी
आठवांना जरी आता, उजळण्यात अर्थ नाही

आले डोळे भरुनी, पुसण्यास ना उरले कुणी
एकांतात अश्रु आता, ढाळण्यात अर्थ नाही

वेडा मी पार झालो, सखे तुझ्या अभावाने
तुझ्याविना आता, जगण्यात अर्थ नाही

गुलमोहर: 

आले डोळे भरुनी, पुसण्यास ना उरले कुणी
एकांतात अश्रु आता, ढाळण्यात अर्थ नाही

फार आवडली ही द्विपदी,,.....हे विडंबन जरा गंभीर आहे. Happy

छान. Happy

छान बाई

मस्त. Happy

......................
माझा एक झब्बू शेर...

वेडा मी आरपार झालो, सखे तुझ्या स्वभावाने
तुझ्यासोबत आता, जगण्यात अर्थ नाही

मस्त वर्षे
वर्षीनी केलेल्या विडंबनांव्यतिरिक्त
दुसरी विडंबने वाचण्यात, अर्थ नाही

संबंधित व्यक्तींनो प्लीज Light 1 .. :दिवे: घ्याच

आले डोळे भरुनी, पुसण्यास ना उरले कुणी
एकांतात अश्रु आता, ढाळण्यात अर्थ नाही

ह्या शेराला माझा झब्बू.... Happy

नाकात भरुन आले,पुसण्यास ना टिश्यूही
भिंतीवरी असे ,शिंकरण्यात अर्थ नाही

मुटे सर माझे अहो भेटले होते की काय तुम्हाला Uhoh Lol

हमनाम Proud

डॉक्टर तरीच दवाखान्यातील भिंती चमकत आहेत Rofl

धन्यवाद लोक्स Happy

वर्षे... "कविडंबन" आवडले Happy

प्लिजच नोट : "कविडंबन" हा शब्द कॉपिरायटेड आहे... माझ्या नावावर Proud

Biggrin

नाही जवळी आता तू, आयुष्य रुक्ष भासे
वाटही आता तुझी, पहाण्यात अर्थ नाही

आवडले !छान !!