मरण्यात अर्थ नाही

Submitted by अभय आर्वीकर on 5 December, 2010 - 00:46

मरण्यात अर्थ नाही

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे
.....................................................

गुलमोहर: 

छान.
एका वाचनात पहिल्या शेराच्या बरोब्बर विरोधाभास बाकी सगळ्या
शेरांमध्ये वाटला. परत वाचल्यावर त्यातील गहन अर्थ समजला.
सुंदर.

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

मुटेजी,
या गझलेत खुप ताकत दिसते मला !
Happy
यावरुन संघर्ष हेच जीवन ...हे वाक्य आठवलं !

पहिल्यांदा मी 'अफाट रचना' असे वाचले, त्यामुळे हवेत उडायला लागलो होतो.

नंतर कळले की ते 'सपाट रचना' आहे, त्यामुळे पाय जमिनीवर आलेत. Happy