ग्रँड कॅनीयन, हुवर डॅम आणी लास वेगस भाग १

Submitted by आवळा on 30 November, 2010 - 18:11

जुगार म्हणटले की अंगावर काटा ऊभा राहतो..
आज २ वर्षा पुर्वी असेच एकदा peoria च्या कसीनो ला (जुगार अड्डा नाही म्हणनार Happy ) अगदी गंमत म्हणुन मित्रांसोबत रॉलेट आणी ब्लॅकजॅक खेळायला गेलो होतो.... ६० डॉ. चे नुकसान झालेच वरुन मनस्ताप/पश्चताप का काय म्हणतात तो सर्व प्रकार झाला.. तेंव्हा पासुन जुगार अर्थात कसीनोचे सर्व रस्ते बंद करुन टाकले..
अध्यात मध्यात ऑफिसमधे कुणीना कूणीतरी वेगस ला जाऊन आल्याचे कळायचे..
कसीनो मध्ये पैशे हारल्याचा प्रत्येकाचा अनुभव सारखाच होता..

सर्व साधारण वेगस ट्रीप मधे १००० डॉ. कमीत कमी खर्च येतो असे ऐकीवात होते .
म्हणजे आताचे भारतीय ४५००० रु.
हा आकडा समोर ऊभा राहिल्या मुळे वेगस ट्रीप तेंव्हाच मनातुन काढुन टाकली..

आणी अचानक एके दिवशी .. अमेरिकेतल्या एकांतवासाला कंटाळलेल्या २ बॅचलर (त्यातील १ फोर्सड बॅचलर)
नी एकच वाक्य बोलले "ठंड सुरु होनेवाली है.. वेगस जाके आते है.. वैसेभी ईधर पकने ही वाला है अगले ६ महिनोतक"
बस्स मनातील संकल्प ऊध्वस्त करायला एवढे वाक्य खुप होते..
तरीपण कसीनो खेळायचा नाही हा निश्चय केला..
मग नेहमी प्रमाने .. एक्सपेडीया, ट्रॅव्हेलॉसीटी, साऊथवेस्ट, चीप ओ ऐअर, कयाक, ऑर्बीट्झ अश्या अनेक साईटस पिंजुन काढल्या तरीसुध्दा स्वस्त deal मिळाली नाही
अगदी वैताग आला होता.. शेवटी अ‍ॅलीजीयंट ह्या स्वस्त ऐअर लाईन चे नाव ऐकुन होतो.. तिकडे सगळ्यात स्वस्त deal सापडली २७४$ जाऊन येऊन(मन भरुन आले एवढी स्वस्त किंमत पाहुन)..
तिकडे बुकींग करायला गेलो.. तर टॅक्स, सर्व्हीस चार्ज, अ‍ॅडमीन फी, सीट बुकींग फी, एक्स्ट्रा फी असे फी चे कित्येक रकाने भरुन आले.. आणी शेवटी किंमत आली ३८०$...
हे म्हणजे .. असेच झाले.. हत्तीचे खायचे दात वेगळे आणी दाखवायचे वेगळे..
ह्या फ्लाईट चा एक प्लस पॉईंट म्हणजे peoria वरुन लास वेगस ला तीन तासा मधे पोहचते ते पण non stop म्हणून ही फ्लाईट मिळावी असे मनोमन वाटत होते.. पण cost "टु मच" होती.
पुन्हा स्वारी सोबत ३ जन परत ईकडे तिकडे स्वस्त तिकीट साठी शोधाशोध करत होती..
सगळीकडे एकच बोंब.. एकतर शिकागो वरुन जा (जर non stop फ्लाईट हवी आहे तर म्हणजे १२० माईल्स ड्राईव्ह) नाहीतर सोपा ऊपाय म्हणजे peoria येथुन जाणे(फक्त ४० माईल्स ड्राईव्ह).. पण किंमत ईतकी जास्त मोजने परवडनार नव्हते.
अथक महतप्रयास करुन स्वस्त डील सापडलीच नाही शेवटी ट्रीप पोस्ट्पोन होते का ते बघितले.. पण त्यात काही जणांचे ईंडीया ट्रीप आडवी आली..
शेवटी अ‍ॅलीजीयंट नीच जायचे ठरवले...
ईतका अ‍ॅडव्हर्‍टाईजींग डेटा त्यांनी वेब्साईट वर भरला आहे की विचारता सोय नाही.. तसेच जेंव्हा तिकीट घेतो.. तेंव्हा by default ते आपल्याला एअर पोर्ट शटल.. प्राओरीटी बोर्डींग/ सीटींग असे पण चार्ज लावतात..
ते सर्व ऑप्शनस ५ फुट लांब असलेल्या एका वेबपेज वरुन manually शोधुन शोधुन remove करावे लागते.. ते करुन सुध्दा शेवटच्या बुकींग पेज वर पण तोच कार्यक्रम repeat करावा..
सरते शेवटी तिकीट किंमत झाली ३३०$(म्हणजे ३८०$ चे ३३०$ झाले.. फुकटचे ५०$ खायची idea मस्त होती अ‍ॅलीजीयंट्ची)

ठरल्याप्रमाने.. शुक्रवारी संध्याकाळी फ्लाईट नी जायला निघालो..
आणी peoria internation airport ला संध्या. ७ वा. पोहचलो... आणी प्रत्यक्ष भारत दर्शन चा अनुभव आला
हा खालील फोटो स्वछ जरी दिसत असला.. तरी अतिशय मळकट झालेली फ्लोर कार्पेट.. त्यावर जमा
झालेला किंवा पसरलेला कचरा.. तसेच मोडीस आलेल्या खुर्च्या ... आणी अतिशय कंजेस्टेड अशी seating arrangements हे सर्व पाहुन पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानक ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही..
फुकटामधे भारत भ्रमन करुन दिल्याबद्दल peoria internation airport स्वछता विभागाचे विषेश आभार मानले... कुठल्याच द्रुष्टीकोनातुन हे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे वाटत नाही.

अ‍ॅलीजीएंट फ्लाईट चे नावलौकीक ऐकुन होतोच अगदी त्याप्रमानेच फ्लाईट होती... सर्वसमानाधिकार का काय म्हणतात तशी.. अगदी आपल्या लाल डब्ब्या सारखे फ्लाईट .. कुणालाही स्पेशल आसन नाही.. (हो ह्या फ्लाईट मधे नो बिझनेस क्लास)
सगळ्यासाठी बसायला सारखीच आसने.. असो ते पण ठीक आहे.. पण हे आसने विचित्र असतील हे मला माहीतच नव्हते.. कारण आसने मागे किंवा पुढे सरकतच नव्हती(परत एकदा लाल डब्बा आठवला :फिदी:)

विमानाने take off केल्यावर काही वेळाने रेस्टरुमला जायचे होते.. जागेवरुन ऊठून रेस्टरुम कढे निघालो तर एका म्हातार्या द्वारपाल बाईने आडवले .. "you can't go inside until seat belt sign is off"
मी आवासुन तिच्याकडे बघतच राहिलो.. तिने मला शेजारच्या सीटची ऑफर दिली..
थोडावेळ गेल्या नंतर सुध्दा seat belt sign बंद होतच नव्हते.. शेवटी कसे आहे ना..
रेस्टरुमला जावेच लागणार ईथपर्यंत परिस्थीती बिकट झाली...
रेस्टरुम ला seat belt sign on असताना कसे जायचे म्हणुन मी तिला विचारले.. "what if it's urgent"
तिकडुन ऊत्तर "what is urgent"
हा प्रश्न शेवटचा मला मी ८ वी मधे असताना विचारला गेलेला.. आणी त्या गावातील शाळेतल्या संस्कारामुळे मी निमुटपणे उजव्या हाताची करंगळि तिला दाखवली..

"what????" तिने जवळ्पास ओरडले.. कदाचीत तिला अर्थ समजला नसावा.. (अमेरिकेमधे करगंळी दाखवतात की नाही हे मला माहीत नाही)..
मी: Restroom
आजीबाई(म्हातार्या एअर होस्टेस) : go and come quickly ("जावा आण या लवकर" अश्या गावंढळ भाषेत ऊत्तर दिले असे मला तरी वाटले.. )

असो तर ताठकळत का होत नाही व्हेगास (गावठी भाषेत व्हेगास आणी अमेरिकन ईंग्रजी प्रमाणे वेगस) एकदाचे आले.. एअर पोर्ट ला ऊतरुन..
पिझ्झा हट ब्रेड स्टीक्स नंतर स्ट्रीप वर सबवे फुट लाँग असा डिनर करुन
५ जणांची वरात रेंटल कार घेऊन ग्रँड कॅनीयन साठी त्याच रात्री (शुक्रवारी) रवाना झाली...
ड्राईव्ह होता साधारण २७५ माईल्स चा म्हणजे जवळपास ५.५ तास.. तो अस्मादिकांनी एकट्यानी पुर्ण करायचा पराक्रम करुन दाखवला ते पण non stop full night Drive
अर्धा रस्ता बर्या पैकी व्यवस्थीत होता कारण स्पीड लिमीट ७५ Miles per hr असे होते.
त्यावर गाडी ८५ MPH नी चालवु शकलो... पण शेवटी शेवटी चा रस्ता फारच सुमसान (अगदी एकसुध्दा गाडी रोड वर नव्हती शेवटच्या ८० माईल च्या प्रवासात) त्यात भर म्हणजे रस्ता अगदी सुमार होता आणी रात्र असल्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती..
पहाटे ५:३० मी. ग्रॅन्ड कॅनीयन व्हिलेज ला आगमन झाले..
एन्ट्री ला २५$ फीस आहे.. सकाळी ५:३० म्हणजे अगदी अवेळी आमचे आगमन झाले असल्यामुळे टोलवर फीस घ्यायला कूणीच नव्हते.. टोल बुथ वर फीस द्यायला शोधले तर कुणीच सापडले नाही त्यामुळे गाडी तशीच पुढे व्हिलेज मधे घेतली .. मस्त पैकी एका रेस्ट रुम मधे फ्रेश होऊन खालील फोटोग्राफी केली..
सकाळी ६ वाजल्या पासुन चे फोटोज आहेत.. ते पण -१ डी.से. तापमान असताना.. त्यामुळे चु.भु. द्या. घ्या.

ग्रँड कॅनीयन ची पहाट ... south rim

ग्रँड कॅनीयन ऊगवत्या सुर्यनारायनाच्या प्रतिक्षेत ... south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

ग्रँड कॅनीयन -- south rim

हम पांच

क्रमश:
ऊर्वरीत भागात ..
return to Hoover dam & Las vegas strip & Casinos...

गुलमोहर: 

.

अरे मी लासवेगासहुन peoriaला फ्रिक्वेन्ट फ्लायर आहे. डीयर आमची क्लायंट आहे. अलेजिअन्ट एकदम बरी पडते पण किंमत अशीच असते.

शेवटी तुम्ही कॅसिनो मध्ये न खेळने अशक्य आणि नीट खेळलात तर वेगास मध्ये जिंकण्याचे चान्स मकाउ, अटलांटिक सिटी किंवा न्युऑरलिन्सपेक्षा जास्त आहेत कारण gaming board ८३% पैसे परत खेळणार्यांना कंम्पलसरी द्यायला लावते.

निलिमा-अनुमोदन..मलाही असेच वाटते.. Happy वेगास इज फन!!
आह्हा, मस्त फोटो.. काही वर्षांपूर्वी छोट्या विमानातून राईड घेतली होती ग्रॅण्ड कॅनियनची.. ती दृष्ये अजून मनात घर करून आहेत..